सॅमसंगने आपल्या फ्लॅगशिप स्मार्टफोनसाठी नवीन ऑफर जाहीर केल्या आहेत. दक्षिण कोरियाच्या कंपनीने आपल्या Galaxy S22 सीरिजमधील फोन आणि Galaxy Z Fold 3 5G, Galaxy Z Flip 3 5G च्या खरेदीवर नो-कॉस्ट EMI प्रदान करण्याबाबत माहिती दिली आहे. सॅमसंगचे हे फ्लॅगशिप फोन आता २४ महिन्यांसाठी नो-कॉस्ट EMI वर मिळू शकतात.


नवीन नो-कॉस्ट EMI ऑफरसह, युजर्स हे प्रीमियम फोन २४ महिन्यांपर्यंत EMI वर घेऊ शकतील. म्हणजेच Galaxy S22 स्मार्टफोन ३०४२ रुपयांच्या EMI वर घेतला जाऊ शकतो. तसंच हाय-एंड Galaxy S22 Ultra फोन ४,५८४ रुपयांच्या नो-कॉस्ट EMI वर मिळू शकतो. सॅमसंगने एचडीएफसी बँकेसोबत भागीदारी करून ही ऑफर उपलब्ध करून दिली आहे आणि देशभरातील रिटेल आउटलेटवर याचा लाभ घेता येईल.

Galaxy S22 ची किंमत ७२,९९९ रुपयांपासून सुरू होते तर Galaxy S22+ ची किंमत ८४,९९९ रुपयांपासून सुरू होते. Samsung Galaxy S22 Ultra स्मार्टफोनची किंमत १,३४,९९९ रुपयांपासून सुरू होते. सॅमसंगच्या फोल्डेबल स्मार्टफोन्सबद्दल बोलायचे झाल्यास, Galaxy Z Fold 3 आणि Galaxy Z Flip 3 ची किंमत अनुक्रमे १,४९,९९९ आणि ८४,९९९ रुपये आहे.
२४ महिन्यांसाठी नो-कॉस्ट EMI ऑफर व्यतिरिक्त, Galaxy S22 Ultra स्मार्टफोनच्या खरेदीवर ग्राहकांना Galaxy Watch 4 फक्त २,९९९ मध्ये मिळू शकेल. दुसरीकडे तुम्ही Galaxy S22 Plus किंवा Galaxy S22 खरेदी केल्यास तुम्हाला Galaxy Buds 2 फक्त २,९९९ मध्ये मिळेल.

आणखी वाचा : पुढील आठवड्यात Samsung, Realme, Poco आणि Tecno च्या पॉवरफुल फोन्सची मार्केटमध्ये एन्ट्री, सर्व काही जाणून घ्या

Samsung Galaxy S22 specifications
Samsung Galaxy S22 स्मार्टफोन Android 12 आधारित One UI ४.१ सह येतो. फोनमध्ये ६.१ इंच फुलएचडी + डायनॅमिक एमोलेड डिस्प्ले आहे. स्मार्टफोनमध्ये ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन ८ Gen १ प्रोसेसर, ८ GB रॅम आणि २५६ GB पर्यंत इनबिल्ट स्टोरेज आहे. हँडसेटमध्ये ५० मेगापिक्सेल प्रायमरी, १२ मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड आणि १० मेगापिक्सेल टेलिफोटो सेन्सरसह ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. सेल्फी आणि व्हिडीओंसाठी, Samsung Galaxy S22 मध्ये १० मेगापिक्सेलचा टेलिफोटो सेन्सरआहे. फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि ३७०० mAh बॅटरी आहे.


Samsung Galaxy S22+ specifications
Samsung Galaxy S22+ स्मार्टफोन Android 12 आधारित One UI ४.१ सह येतो. यात ६.६ इंच फुलएचडी + डायनॅमिक एमोलेड २ एक्स डिस्प्ले आहे. हँडसेटमध्ये Snapdragon ८ Gen १ प्रोसेसर, ८ GB रॅम आहे. फोनला पॉवर देण्यासाठी ४५०० mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी ४५ W वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करते. Galaxy S22 चे पुढील आणि मागील फीचर्स फोनमध्ये उपलब्ध आहेत.

आणखी वाचा : तुमचा इंटरनेट डेटा संपणार नाही! Jio च्या धांसू रिचार्ज पॅकमध्ये २५२ GB, अनलिमिटेड कॉल आणि फ्री ऑफर्स


Samsung Galaxy S22 Ultra specifications
Samsung Galaxy S22 Ultra स्मार्टफोनमध्ये ६.८ इंचाचा EDGE QHD+ डायनॅमिक AMOLED 2X डिस्प्ले आहे. फोन Android 12 आधारित One UI ४.१ सह येतो. स्मार्टफोनमध्ये Snapdragon ८ Gen १ प्रोसेसर आणि १२ GB रॅम देण्यात आली आहे. फोनमध्ये ५१२ GB पर्यंत इनबिल्ट स्टोरेजचा ऑप्शन उपलब्ध आहे. हँडसेटमध्ये १०८ मेगापिक्सेल प्रायमरी, १२ मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड आणि १०  मेगापिक्सेल टेलिफोटो सेन्सर आहे. फोनच्या पुढील बाजूस १० मेगापिक्सेलचा टेलिफोटो सेन्सर उपलब्ध आहे. सेल्फी आणि व्हिडीओसाठी Samsung Galaxy S22 Ultra मध्ये समोर ४० मेगापिक्सेलचा फ्रंट सेन्सर आहे. फोनला पॉवर देण्यासाठी ५००० mAh बॅटरी दिली आहे, जी ४५ W वायर्ड आणि १५ W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते.