Samsung Galaxy A07 5G launch: तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सतत नवे बदल आणि सुधारणा करणारी सॅमसंग कंपनी भारतीय बाजारात आपले स्थान अधिक मजबूत करत आहे. कमी किमतीत चांगले आणि आधुनिक फीचर्स देण्यावर सॅमसंगचा भर असल्यामुळे A सीरिजचे स्मार्टफोन ग्राहकांना मोठ्या प्रमाणात आवडत आहेत.
अशातच सॅमसंग लवकरच भारतात आपला नवा 5G स्मार्टफोन लाँच करणार आहे. गॅलेक्‍सी A सीरिजमधील हा फोन दमदार फीचर्स देणार आहे. फोटोग्राफी, बॅटरी आणि डिस्प्लेवर खास भर देण्यात आला आहे. हा फोन विशेषतः तरुण आणि डिजिटल कंटेंट आवडणाऱ्यांसाठी डिझाइन करण्यात आला आहे.

मोठा डिस्प्ले आणि आकर्षक डिझाइन

Galaxy A07 5G मध्ये ६.७ इंचाचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेला 120Hz रिफ्रेश रेट आहे, त्यामुळे स्क्रोलिंग करताना किंवा व्हिडीओ पाहताना खूपच स्मूद वाटेल. बजेट फोन असूनही स्क्रीनची ८०० निट्सपर्यंत ब्राइटनेस असल्याने उन्हातसुद्धा डिस्प्ले स्पष्ट दिसतो. फोनच्या सुरक्षिततेसाठी सॅमसंगने रेनफोर्स टेम्पर्ड ग्लास दिला आहे, जो स्क्रॅचपासून संरक्षण करतो.

कॅमेरा

Galaxy A07 5G मध्ये 50MP ऑटोफोकस प्रायमरी कॅमेरा देण्यात आला असून यामुळे फोटो अधिक शार्प, डिटेल्ससह आणि नैसर्गिक रंगांमध्ये कॅप्चर होतात. f/1.8 अपर्चरमुळे कमी प्रकाशातसुद्धा स्पष्ट आणि चांगला फोटो घेता येईल. याशिवाय 2MP डेप्थ कॅमेरा पार्श्वभूमी ब्लर करून आकर्षक इफेक्टसह पोर्ट्रेट फोटो देतो. सोशल मीडियासाठी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 8MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला असून तो कमी नॉइज सोबतच क्लिअर सेल्फीज कॅप्चर करण्याचा अनुभव देतो.

मोठी बॅटरी आणि जलद चार्जिंग


Galaxy A07 5G मध्ये 6000mAh ची मोठी बॅटरी आहे, त्यामुळे फोन एकदा चार्ज केला की तो दिवसभर आरामात वापरता येतो. मागील मॉडेल्सपेक्षा ही बॅटरी सुमारे २० टक्के जास्त ताकदवान असल्याने जास्त वेळ टिकते. 25W फास्ट चार्जिंगमुळे फोन लवकर चार्ज होतो, त्यामुळे सतत चार्जर शोधण्याची गरज पडत नाही. यूट्यूबवर व्हिडीओ पाहणे, सोशल मीडिया वापरणे किंवा रोजची कामं करण्यासाठी हा फोन उपयोगी ठरेल. सॅमसंगने स्मार्ट पॉवर मॅनेजमेंट बॅटरीचा वापर योग्य पद्धतीने करत फोनचा अनुभव आणखी चांगला बनवला.

किंमत


सॅमसंग Galaxy A07 5G हा फोन सर्वसामान्य ग्राहकांच्या बजेटमध्ये बसेल या किमतीत लाँच होण्याची शक्यता आहे. फोनमधील मोठा डिस्प्ले, दमदार कॅमेरा, 5G सपोर्ट आणि मोठी बॅटरी पाहता त्याची किंमत साधारणपणे १२,००० ते १५००० रुपयांदरम्यान असू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे, त्यामुळे कमी बजेटमध्ये चांगले फीचर्स असलेला 5G स्मार्टफोन शोधणाऱ्या ग्राहकांसाठी हा फोन आकर्षक पर्याय ठरू शकतो.