Samsung Galaxy M04 : सॅमसंग प्रिमियम फोनसह बजेट फोन देखील उपलब्ध करतो आणि तेही चांगल्या मूलभूत फीचर्ससह. त्यामुळे या कंपनीचे फोन्स ग्राहकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत. आता सॅमसंगने आपली नवीन गॅलक्सी एम सिरीज भारतात लाँच केली आहे. या सिरीजमधील Samsung Galaxy M04 ९ डिसेंबर रोजी लाँच झाला असून त्याची विक्री १६ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. या फोनचे फीचर्स आणि किंमत काय? याबाबत आपण जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फीचर

फोन मिंट ग्रीन, व्हाइट, गोल्ड आणि ब्ल्यू या चार रंग पर्यायांमध्ये उपलब्ध करण्यात आला असून तो १६ डिसेंबरपासून अमेझॉनवर खरेदीसाठी उपलब्ध होणार आहे. फोनमध्ये ६.५ इंच एचडी + रेझोल्युशन स्क्रीन, मीडिया टेक हेलिओ पी ३५ चिपसेट, रॅम प्लस फीचरसह ८ जीबी पर्यंत रॅम आणि १२८ जीबी स्टोअरेज मिळते जी १ टीबी पर्यंत वाढवता येऊ शकते.

(टाटाचे मोठे पाऊल, बनवणार ‘हे’ उपकरण, चीनवर अवलंबून राहावे लागणार नाही)

कॅमेऱ्याबाबत बोलायचे झाल्यास, फोनच्या मागील बाजूस १३ आणि २ एमपी कॅमेरा आणि सेल्फीसाठी ५ एमपी कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये ५००० एमएएच बॅटरी देण्यात आली आहे. फोनमध्ये ४जी व्हीओएलटीई, वायफाय, ब्लूटूथ, जीपीएस, यूएसबी सी पोर्ट आणि ३.५ एमएम ऑडिओ जॅक मिळतो.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Samsung galaxy m04 launch in india check price and features ssb
First published on: 10-12-2022 at 10:56 IST