scorecardresearch

फ्लिपकार्ट सेलमध्ये सॅमसंगच्या ‘या’ 5 जी फोन्सवर मिळणार ५७ टक्क्यांपर्यंत सूट, जाणून घ्या फीचर

कंपनीचा दमदार फोन galaxy f13 पासून ते galaxy s22 plus पर्यंत सर्व फोन्सवर ५७ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे.

फ्लिपकार्ट सेलमध्ये सॅमसंगच्या ‘या’ 5 जी फोन्सवर मिळणार ५७ टक्क्यांपर्यंत सूट, जाणून घ्या फीचर
सॅमसंग फोन (pic credit – samsung)

कमी किंमत आणि उत्तम फीचर अशी लोकांमध्ये सॅमसंग बद्दलची ओळख आहे. सॅमसंगच्या स्मार्टफोन्सवर फ्लिपकार्टच्या Big billion day सेलमध्ये मोठा डिस्काउंट मिळणार आहे. कंपनीचा दमदार फोन galaxy f13 पासून ते galaxy s22 plus पर्यंत सर्व फोन्सवर ५७ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे.

१) सॅमसंग गॅलक्सी एस २२

Samsung galaxy s22+ क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८ जेन १ या शक्तीशाली प्रोसेसरसह येतो. या फोनची किंमत १ लाख १ हजार ९९९ इतकी आहे. मात्र, फ्लिपकार्ट बिग बिलियन डे मध्ये हा फोन ५९ हजार ९९९ रुपांमध्ये विकत घेता येणार आहे. हा ५ जी फोन असून त्यात ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी रोम आहे. रिअर कॅमेरा ५० मेगापिक्सेलचा असून सेल्फीसाठी १० मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

(बिग बिलियन डे पूर्वीच फ्लिपकार्टकडून मोठी सूट, १५ हजाराच्या आत मिळत आहेत ‘हे’ ३२ इंच स्मार्ट एलइडी टीव्ही)

२) सॅमसंग गॅलक्सी एफ २३ ५ जी

Samsung galaxy f 23 5g हा फोन सेलदरम्यान १० हजार ९९९ रुपयांमध्ये मिळणार आहे. या फोनची लिस्टेड किंमत २२ हजार ९९९ इतकी आहे. या फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ७५० जी प्रोसेसर असून फोनमध्ये ४ जीबी रॅम आणि १२८ जीबी रोम आहे. फोनमध्ये मागे ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला असून ८ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

३) सॅमसंग गॅलक्सी एस २१ एफइ ५ जी

Samsung Galaxy S21 FE 5G या फोनवर कंपनी सर्वात मोठी सूट देत आहे. ही सूट कंपनी गॅलेक्सी एस २१ फॅन एडिशनवर देत आहे. या फोनची लिस्टेड किंमत ७४ हजार ९९९ रुपये इतकी आहे. मात्र, त्यास ३१ हजार ९९९ रुपयांमध्ये विकत घेता येईल. फोनमध्ये ८ जीबी रॅम असून १२८ जीबी रोम आहे. ६.४ इंचचा फूल एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनमागे १२ मेगापिक्सेलचे दोन आणि ८ मेगापिक्सेलचा एक कॅमेरा आहे. फोनचा पुढील कॅमेरा ३२ मेगापिक्सेलचा आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Samsung galaxy phones will get upto 57 percent disount on flipkart big billion day sale ssb

ताज्या बातम्या