Samsung ने आपल्या Galaxy S22 स्मार्टफोनचा नवीन कलर व्हेरिएंट लॉंच केला आहे. Samsung Galaxy S22 आता बोरा पर्पल कलरमध्ये देखील उपलब्ध असेल. सॅमसंग गॅलेक्सी S22 ‘बोरा पर्पल’ एडिशनमध्ये कंपनीने कॅमेरा मॉड्युलही याच रंगात रंगवला आहे. हा फोन व्हॉयलेट रंगात देखील उपलब्ध आहे जो कॉन्ट्रास्ट कलरसह कॅमेरा मॉड्यूलसह ​​येतो. सध्या हा व्हेरिएंट भारतात उपलब्ध करण्याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. सॅमसंगचे म्हणणे आहे की नवीन कलर व्हेरिएंटची विक्री निवडक बाजारपेठांमध्ये १० ऑगस्टपासून सुरू होईल.

नवीन बोरा पर्पल कलरबद्दल बोलायचे तर कोरियामध्ये बोरा हा शब्द पर्पलसाठी वापरला जातो. या महिन्यात नवीन बोरा पर्पल कलरची माहिती लीक झाली होती आणि अशी अपेक्षा आहे की S22 सीरीजचे सर्व फोन या रंगात आणले जातील. सॅमसंगने गॅलेक्सी सीरिजमध्ये आपले फोन पर्पल कलरमध्ये उपलब्ध करून दिले आहेत. यामध्ये Galaxy S9 Lilac Purple आणि Lavender Galaxy Z Flip 3 यांचा समावेश आहे.

jaguar land rover
लवकरच जग्वार लँड रोव्हरचे भारतात उत्पादन; टाटा मोटर्सचे नियोजन; तमिळनाडूमध्ये उभारणार १ अब्ज डॉलरचा प्रकल्प
Pune model of co-working space From start-ups to large companies everyone is getting preference
को- वर्किंग स्पेसचे पुणेरी मॉडेल! स्टार्टअपपासून मोठ्या कंपन्यांपर्यंत सर्वांचीच मिळतेय पसंती
indigrid cio meghana pandit talks about future Investment flow in invit
‘इन्व्हिट्स’मध्ये गुंतवणूक ओघ वाढत जाणार ! इंडिया ग्रिड ट्रस्टच्या मुख्य गुंतवणूक अधिकारी पंडित यांचे प्रतिपादन  
sebi introduced t0 settlement plan for share buying and selling from today
शेअर खरेदी-विक्रीची ऐतिहासिक ‘टी प्लस शून्य’ प्रणाली आजपासून; स्टेट बँक, बजाज ऑटोसह २५ समभागांत एकाच दिवसांत व्यवहारपूर्तता शक्य  

आणखी वाचा : घरबसल्या Aadhaar Card वर दोन मिनीटात बदला नाव-पत्ता, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप

Samsung Galaxy S22 आणि Galaxy S22+ स्मार्टफोन ग्रीन, फँटम ब्लॅक, फँटम व्हाइट आणि पिंक गोल्ड रंगांमध्ये उपलब्ध आहेत. Galaxy S22 Ultra बरगंडी, ग्रीन, फँटम ब्लॅक आणि फँटम व्हाईट रंगांमध्ये येतो.

Samsung Galaxy S22 Specifications
स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाले तर नवीन Samsung Galaxy S22 बोरा पर्पल व्हेरिएंट मूळ मॉडेल प्रमाणेच आहे. या सॅमसंग फोनमध्ये ६.१ इंचाचा फुलएचडी + डायनॅमिक AMOLED 2X डिस्प्ले आहे जो ४८-१२० Hz च्या व्हेरिएबल रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. फोनमध्ये संरक्षणासाठी Gorilla Galsa Victus+ पॅनल देण्यात आले आहे. सॅमसंगच्या या फ्लॅगशिप फोनमध्ये ४ nm ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन ८ Gen 1 प्रोसेसर आहे. फोनमध्ये ८ GB रॅम देण्यात आली आहे. Samsung Galaxy S22 मध्ये २५६ GB पर्यंत इनबिल्ट स्टोरेज उपलब्ध आहे. या सॅमसंग फोनमध्ये २५ W वायर्ड आणि १५ W वायरलेस चार्जिंगसह ३७०० mAh बॅटरी आहे.

आणखी वाचा : भारतात लॉंच झाला सर्वात स्वस्त स्मार्टफोन Itel A23S, जाणून घ्या किंमत आणि सर्व स्पेसिफिकेशन्स

Galaxy S22 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनमध्ये ऍपर्चर F/१.८ आणि ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशनसह ५० मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आहे. याशिवाय १२ मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड आणि १० मेगापिक्सलचा टेलीफोटो सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडिओसाठी या सॅमसंग फोनमध्ये १० मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे ज्यामध्ये अपर्चर F/२.२ आहे.

कनेक्टिव्हिटीसाठी, Samsung Galaxy S22 मध्ये 5G, 4G LTE, Wi-Fi 6, Bluetooth 5.2, GPS/A-GPS आणि USB Type-C पोर्ट आहे. एक्सलेरोमीटर, अॅम्बियंट लाइट, बॅरोमीटर, गायरो, हॉल, मॅग्नेटोमीटर आणि प्रॉक्सिमिटी सेन्सर्स स्मार्टफोनमध्ये उपलब्ध आहेत. हँडसेटमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आहे. फोन IP68 रेटिंगसह येतो आणि डस्ट, वॉटर रेजिस्टेंट आहे.