Samsung ने काल झालेल्या Galaxy Unpacked इव्हेंटमध्ये Galaxy S23 या सिरीजचे लाँचिंग केले. सॅमसंग ही एक दक्षिण कोरियाची कंपनी आहे आणि ती स्मार्टफोन्स, लॅपटॉप्स आणि अन्य उपकरणांचे उत्पादन करते. काल लाँच केलेली फ्लॅगशिप सिरीज ही आधीच्या सिरिजपेक्षा अपग्रेड आहे. ज्यामध्ये Galaxy S23 Ultra मध्ये जास्त मेगापिक्सलचा कॅमेरा मिळत आहे. Galaxy S22 सिरीजप्रमाणेच हे फोनसोबत चार्जर येत नाही. काल लाँच झालेल्या सिरीजमधील फोनचे फीचर्स आणि किंमत काय आहे ते जाणून घेऊयात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Samsung Galaxy S23 चे फीचर्स

हा सॅमसंग गॅलॅक्सी सिरीजमधील Galaxy S23 हा सर्वात कॉम्पॅक्ट आणि परवडणारा हँडसेट आहे. या फोनमध्ये लेटेस्ट स्नॅपड्रॅगन 8 Gen 2 चिपसेटचे कस्टम व्हर्जन देण्यात आले आहे. या फोनमध्ये ६.१ इंचाचा फुलएचडी प्लस एमओलईडी डिस्प्ले येतो.तसेच यामध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. तसेच यात १० मेगापिक्सल टेलीफोटो लेन्स व १२ मेगापिक्सल अल्टरवाईड लेन्स आहेत. तर सेल्फी कॅमेरा हा १२ मेगापिक्सलचा आहे. Galaxy S23 स्मार्टफोनला ८ जीबी रॅम असून हा फोन १२८जीबी , २५६ जीबी आणि ५१२ जीबी या प्रकारामध्ये उपल्बध असेल. २५ वॅटचा चार्जिंग सपोर्ट सह याची बॅटरीची क्षमता ही ३९००mAh इतकी आहे. तसेच हा फोन वायरलेस आणि रिव्हर्स वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करतो.

हेही वाचा : Samsung Galaxy S23 Series १ फेब्रुवारीला करणार मार्केटमध्ये एंट्री, ‘हे’ असतील तगडे फीचर्स

Galaxy S23 Plus चे फीचर्स

Galaxy S23 Plus या फोनमध्ये ६.६ इंचाचा फुलएचडी डिस्प्ले येतो. तसेच AMOLED स्क्रीन देखील मिळते. स्क्रीनचा टच सॅम्पलिंग रेट 240Hz आहे आणि त्यात स्नॅपड्रॅगन 8 Gen 2 चिपसेटची कस्टमाइज व्हर्जन देण्यात आले आहे. तसेच Galaxy S23 प्रमाणे S23 Plus ५० मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा येतो. ट्रिपल रियर कॅमेराचा सेटअप देखील यामध्ये मिळतो. वापरकर्त्यांना १२ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा वापरायला मिळतो. Galaxy S23 Plus या स्मार्टफोनमध्ये ८ जीबी रॅम अणि २५६ जीबी व ५१२ जीबी इंटर्नल स्टोरेज येते. या फोनच्या बॅटरी क्षमता ही ४७००mAh इतकी आहे. हा फोन फक्त अर्ध्या तासात ६५ टक्के चार्ज होऊ शकतो असे सॅमसंग कंपनीचे म्हणणे आहे. या फोनचे वजन सुमारे १९६ ग्रॅम इतके आहे. हा हँडसेट वायरलेस आणि रिव्हर्स वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करतो.

हेही वाचा : Samsung Galaxy Unpacked 2023 ईव्हेंटचा घरबसल्या घ्या लाईव्ह आनंद, जाणून घ्या कसं पाहता येणार?

Galaxy S23 Ultra चे फीचर्स

Galaxy S23 Ultra हा स्मार्टफोन या सिरीजमधील सर्वात प्रीमियम आणि महागडा स्मार्टफोन आहे. यामध्ये Snapdragon 8 Gen 2 चे अपग्रेड व्हर्जन देण्यात आले आहे. वापरकर्त्यांना ६.८ इंचाचा QHD +AMOLED डिस्प्ले मिळणार आहे.या फोनचे वजन हे २३४ ग्रॅम आहे. यामध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप येतो. तसेच याचा कॅमेरा या २०० मेगापिक्सलचा आहे. हे या फोनचे सर्वात महत्वाचे फिचर आहे. यात 3x आणि 10x ऑप्टिकल झूम सह १२ मेगापिक्सल अल्ट्रावाइड आणि दोन १० मेगापिक्सलच्या टेलीफोटो लेन्स आहेत. १२ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा यामध्ये मिळणार आहे. या फोनमधून दिवसा आणि रतरी काढण्यात आलेल्या फोटोंची क्वालिटी ही चांगलीच असणार आहे. कमी प्रकाशामध्ये फोटो काढण्याची समस्या यामुळे दूर होणार आहे.

Samsung Galaxy S23 सिरीजची विक्री भारतामध्ये १७ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. सध्या भारतात या सिरीजमधील फोनच्या किंमती काय असतील याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नाही. याबाबतचे अपडेट्स सॅमसंग आज शेअर करणार आहे. मात्र हे स्मार्टफोनचे भारतात प्री-बुकिंग सुरु आहे.

काय असणार या स्मार्टफोन्सची किंमत ?

Samsung Galaxy S23 या स्मार्टफोनमधील ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटर्न स्टोरेज असणाऱ्या फोनची किंमत $७९९ (सुमारे ६५,५००रुपये )आहे. Galaxy S23 Plus च्या ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी इंटर्नल स्टोरेज असणाऱ्या फोनची किंमत ही $९९९ (सुमारे ८१,९०० रुपये ) असणार आहे. सर्वात प्रीमियम आणि महागडा फोन असणाऱ्या Galaxy S23 Ultra या फोनची किंमत $११९९ (सुमारे ९८,३०० रूपये ) असणार आहे. यामध्ये ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी इंटर्नल स्टोरेज इतकी क्षमता वापरकर्त्यांना मिळणार आहे. हा स्मार्टफोन फँटम ब्लॅक, क्रीम, ग्रीन आणि लॅव्हेंडर या रंगांमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Samsung galaxy s23 series launched with great features and price tmb 01
First published on: 02-02-2023 at 09:05 IST