Samsung Galaxy Unpacked 2023: कोरियन कंपनी Samsung आज १ फेब्रुवारी रोजी एक मोठा कार्यक्रम घेणार आहे, ज्याला कंपनीने ‘Samsung Unpacked Event 2023’ असे नाव दिले आहे. कंपनी या कार्यक्रमात Galaxy S23 मालिका सादर करेल. या अंतर्गत कंपनी Samsung Galaxy S23, Galaxy S23 Plus आणि Galaxy S23 Ultra लाँच करणार आहे. माहितीनुसार, कंपनी या इव्हेंटमध्ये अपडेटेड डिझाइनसह नेक्स्ट जनरेशन गॅलेक्सी नोटबुक्सही सादर करू शकते. तुम्हाला हा कार्यक्रम घरी बसून पाहायचा असेल, तर या कार्यक्रमाचा आनंद कसा घेता येईल, चला तर पाहूया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Samsung Galaxy Unpacked 2023 मध्ये काय असेल खास?

या दरम्यान, कंपनी Galaxy S23, Galaxy S23+ आणि Galaxy S23 Ultra लॉन्च करेल. याशिवाय, असे मानले जाते की कंपनी आपल्या पुढील पिढीतील गॅलेक्सी नोटबुक्स अद्ययावत डिझाइन आणि सुधारित कामगिरीसह सादर करू शकते.

(हे ही वाचा : आर्थिक रसातळाला गेलेल्या पाकिस्तानमध्ये कोणता स्मार्टफोन वापरतात माहितेय कां? जाणून घ्या )

लुकबद्दल बोलायचे झाले तर, Galaxy S23 सीरीजचा लूक Galaxy S22 सीरीज, विशेषत: अल्ट्रा मॉडेलपेक्षा फारसा वेगळा असू शकत नाही. Galaxy S23 Ultra ला २००-मेगापिक्सेल सेन्सरसह मागे वक्र डिझाइन आणि कॅमेरा देखील दिला जाऊ शकतो. याशिवाय, अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आणि ड्युअल १०MP टेलिफोटो लेन्स १००x पर्यंत हायब्रिड झूम सपोर्टसह प्रदान केले जाऊ शकतात.

Galaxy S23 आणि Galaxy S23+ मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. तिन्ही फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ८ जनरल २ प्रोसेसर दिला जाऊ शकतो. Galaxy S23 आणि Galaxy S23+ मध्ये ८GB रॅम आणि १२८GB इंटरनल स्टोरेज दिले जाऊ शकते. Galaxy S23 Ultra मध्ये किमान १२GB RAM आणि २५६GB इंटरनल मेमरी दिली जाऊ शकते.

(हे ही वाचा : नव्या स्मार्टफोनला रंगीत किंवा डिझायनर कव्हर लावताय? व्हा सावध, अन्यथा होतील ‘हे’ दुष्परिणाम )

Galaxy S23 लाइनअप Android 13 OS आधारित कस्टम OneUI ४.१ सह ऑफर केली जाऊ शकते. या तिन्ही स्मार्टफोन्समध्ये किमान तीन मोठे अँड्रॉइड अपडेट्स दिले जातील. कंपनी Galaxy S23 आणि Galaxy S23+ आणि अल्ट्रा व्हेरियंटवर ऑफर देखील जाहीर करू शकते.

Samsung Galaxy Unpacked 2023 Event घरबसल्या असं पाहा लाईव्ह

तुम्ही कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून Samsung Galaxy S23 इव्हेंट पाहू शकता. त्याचे थेट प्रक्षेपण येथे केले जाईल. याशिवाय कंपनीच्या ट्विटर, फेसबुक आणि यूट्यूबवर तुम्ही घरबसल्या हे लाईव्ह इव्हेंट्स पाहू शकता. आज भारतीय वेळेनुसार रात्री ११.३० वाजता कार्यक्रम सुरू होईल.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Samsung galaxy unpacked 2023 event how you will be able to watch sitting at home three great phones will be launched pdb
First published on: 01-02-2023 at 12:15 IST