scorecardresearch

Premium

५० मेगापिक्सलचा कॅमेरा आणि जबरदस्त प्रोसेसरसह सॅमसंगने लॉन्च केला ‘हा’ स्मार्टफोन; VIDEO एकदा पाहाच

सॅमसंगच्या या नवीन फोनमध्ये वापरकर्त्यांना ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप मिळणार आहे.

samsung galaxy s23 fe launch in india in single varient
सॅमसंग गॅलॅक्सी S23 FE मध्ये ६.३ इंचाचा एफएचडी + OLED डिस्प्ले मिळणार आहे. (Image Credit-@SamsungIndia/X)

सॅमसंग एक लोकप्रिय मोबाइल उत्पादक कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी कंपनी नवनवीन फीचर्स आणि अपडेट्स असलेले स्मार्टफोन्स लॉन्च करत असते. आज देखील भारतात कंपनीने नवीन स्मार्टफोन्स लॉन्च केला आहे. सॅमसंगने Galaxy S23 FE लॉन्च केला आहे. सॅमसंग गॅलॅक्सी S23 FE हा फोन गॅलॅक्सी S22 FE च्या पुढचे अपडेटेड मॉडेल आहे. नवीन फॅन एडिशन फ्लॅगशिप गॅलॅक्सी S23 सिरीजमध्ये एक लहानसे व्हर्जन आहे. जे या वर्षीच्या सुरुवातीला सादर करण्यात आले होते. या नवीन फोनची किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल अधिक जाणून घेऊयात.

सॅमसंग गॅलॅक्सी S23 FE: फीचर्स

नवीन सॅमसंग गॅलॅक्सी S23 FE मध्ये वापरकर्त्यांना ६.३ इंचाचा एफएचडी + OLED डिस्प्ले मिळणार आहे. डिस्प्लेचा रिफ्रेश रेट हा १२० Hz इतका असणार आहे. डिस्प्लेमध्ये मध्यभागी पंच कटआऊट बघायला मिळतो. या फोनचे बॅक पॅनलचे डिझाइन फ्लॅगशिप S23 सिरीजप्रमाणे आहे. या फोनमध्ये विशेष करून भारतात Exynos 2200 या चिपसेटचा सपोर्ट देण्यात आला आहे. याबाबतचे वृत्त India Today ने दिले आहे.

Samsung launched Galaxy Fit3 fitness tracker in India claimed battery life thirteen days With Reasonable Price
स्वस्त स्मार्टवॉच कंपन्यांना सॅमसंगची टक्कर! गॅलॅक्‍सीचा नवीन फिटनेस ट्रॅकर लाँच; पाहा जबरदस्त फीचर्स
cards
रिझर्व्ह बँकेने कार्ड नेटवर्कवर निर्बंध का घातले? तुमच्यावर काय परिणाम होणार? वाचा सविस्तर…
Google Maps live location new feature can help you find your stolen or recover lost smartphone
स्मार्टफोन हरवला आहे? तर गूगल Maps च्या मदतीने मिनिटांत शोधा तुमचा फोन, फॉलो करा ‘या’ स्टेप्स
Lava launches new smartphone with Three Colour Variants and Two Storage Options Price only 6799 rupees
Lava ने भारतात लाँच केला ‘हा’ स्वस्त स्मार्टफोन; फीचर्स पाहून तुम्हीही पडाल प्रेमात! किंमत फक्त…

हेही वाचा : VIDEO: Vivo ने लॉन्च केले १८ मिनिटांमध्ये ५० टक्के चार्ज होणारे स्मार्टफोन्स; ५० मेगापिक्सलच्या कॅमेऱ्यासह मिळणार…, एकदा पाहाच

सॅमसंग गॅलॅक्सी S23 FE च्या कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाल्यास यात वापरकर्त्यांसाठी ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यामध्ये OIS सह ५० मेगापिक्सलचा कॅमेरा, १२ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड सेन्सर आणि ८ मेगापिक्सलचा टेलीफोटो कॅमेऱ्याचा समावेश आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यामध्ये १० मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळणार आहे. तसेच या फोनमध्ये इन डिस्प्ले फिंगरप्रिंट देण्यात आले आहे. हूड अंतर्गत या फोनमध्ये ४५०० mAh क्षमतेची बॅटरी मिळणार आहे. तसेच याला २५ W च्या फास्ट चार्जिंगचा सपोर्ट देण्यात आला आहे. कदाचित हे खरेदी करणाऱ्यांसाठी एक समस्या असू शकते कारण हल्ली स्मार्टफोनला कमीत कमी ८० W चे चार्जिंग सपोर्ट मिळतो. सॅमसंग या फोनच्या बॉक्समध्ये चार्जर देत नाही. कंपनीने हा फोन ३० मिनिटांमध्ये ५० टक्के चार्ज होतो असा दावा केला आहे. यामध्ये वाय-फाय, जीपीएस, एनएफसी आणि ब्लूटूथ ५.३ सारखे कनेक्टिव्हिटीसारखे फीचर्स मिळतात.

हेही वाचा : ICC Cricket World Cup 2023: आता मॅचेस बघताना मिळणार नवीन अनुभव; Disney+ Hotstar ने लॉन्च केले ‘हे’ भन्नाट फिचर

भारतातील किंमत आणि उपलब्धता

सॅमसंग गॅलॅक्सी S23 FE हा फोन ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेजमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. याची भारतातील सुरुवातीची किंमत ४९,९९९ रुपये इतकी आहे. डिव्हाइसची मूळ किंमत ५९,९९९ रुपये आहे. मात्र या डिव्हाइसवर HDFC बँकेकडून १० हजारांच्या डिस्काउंट ऑफरनंतर या फोनची किंमत ४९,९९९ रुपये इतकी कमी झाली आहे. खरेदीदार आजपासून हा स्मार्टफोन Amazon च्या माध्यमातून खरेदी करू शकणार आहेत. याची डिलिव्हरी ७ ऑक्टोबरपासून सुरु होईल. हा फोन खरेदीदार मिंट, क्रीम, ग्रेफाइट आणि पर्पल रंगात खरेदी करू शकतात.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Samsung launch galaxy s23 fe india with hdfc bank offer and 50 mp ois camera check price and features tmb 01

First published on: 04-10-2023 at 16:38 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×