Samsung ही एक मोबाईल उत्पादक कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी सॅमसंग हे नवनवीन स्मार्टफोन्स लाँच करत असते. नवनवीन फीचर्स आणत असते. या सॅमसंग ने आपला एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. सॅमसंग ने ५जी चा प्रचार करण्यासाठी Galaxy A14 5G आणि A23 5G हे स्मार्टफोन विकण्यास सुरुवात केली आहे. हे स्मार्टफोन्स Samsung.com आणि इतर ऑनलाइन स्टोअर्सवर विक्रीसाठी उपलब्ध आहे.

“सॅमसंगच्या 5G-प्रथम धोरणाचा भाग म्हणून, Galaxy A14 5G आणि A23 5G हे देशातील सर्वाधिक वितरित 5G स्मार्टफोन असतील. भारतात 5G तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यासाठी आम्ही आमच्या 4G आणि 5G स्मार्टफोनसाठी समान हफ्त्याची सुविधा देखील देत आहोत,” असे सॅमसंग इंडियाचे मोबाइल बिझनेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष राजू पुलन म्हणाले.

Vivo company New Smartphone T3x 5G launch in India on Know About design and price range of this upcoming model
50MP कॅमेरा अन् फास्ट चार्जिंग सपोर्टसह विवोचा ‘हा’ स्मार्टफोन होणार लाँच; किंमत फक्त…
Motorola launches Edge 50
बाकी कंपन्यांची उडाली झोप, मोटोरोलाचा जबरदस्त डिस्प्लेसह स्मार्टफोन देशात दाखल, मिळताहेत भरमसाठ ऑफर्स
restaurant inside metro coach nmrc introduces unique metro coach restaurant at sector 137 station know seating capacity read all details
आता मेट्रोमध्ये करु शकता पार्टी अन् मीटिंग; ‘या’ ठिकाणी सुरू होतेय मेट्रो कोच रेस्टॉरंट
spmcil recruitment 2024 jobs in security printing and minting corporation of India ltd
नोकरीची तयारी : सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेसमधील संधी

हेही वाचा : Flipkart Sale 2023: मोठी सुट, २७ हजारांचे Airpods Pro फक्त १,१५० रुपयांत; जाणून घ्या फीचर्स

Galaxy A14 5G चे काय आहेत फीचर्स ?

Galaxy A14 5G हा स्मार्टफोन प्रीमियम डिझाईनमध्ये येतो. तसेच यात ६.६ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले येतो. यामध्ये ५० मेगापिक्सलचा ट्रिपल लेन्स कॅमेरा सेटअप येतो आणि १३ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा येतो. Galaxy A14 5G गडद लाल, हलका हिरवा आणि काळ्या रंगात येतो. या स्मार्टफोनमध्ये ८जीबी रॅम येते. या फोनच्या बॅटरीची क्षमता ५०००mAh इतकी आहे.

Galaxy A23 5G चे काय आहेत फीचर्स ?

Galaxy A23 5G स्मार्टफोनमध्ये ५जी स्मार्टफोन आहे. तसेच ६.६ एफएचडी प्लस आणि फ्लुइड स्क्रीन ट्रांझिशन स्क्रीनचा डिस्प्ले येतो आणि १२० Hz रिफ्रेश रेट येतो. Galaxy A23 5G स्मार्टफोनमध्ये ५जी स्मार्टफोन आहे. तसेच ६.६ एफएचडी प्लस आणि फ्लुइड स्क्रीन ट्रांझिशन स्क्रीनचा डिस्प्ले येतो आणि १२० Hz रिफ्रेश रेट येतो. तसेच या फोनमधील कॅमेरा हा ५० मेगापिक्सलचा क्वाड रिअर कॅमेरा येतो. अल्ट्रा वाईड, आणि मॅक्रो लेन्सअसे फीचर्स या कॅमेरात येतात. या फोनच्या बॅटरीची क्षमता ५०००mAh इतकी आहे. Galaxy A23 5G सिल्व्हर, ऑरेंज आणि लाइट ब्लू रंगांमध्ये येतो.

हेही वाचा : Apple च्या भारतात होणाऱ्या उत्पादनावर केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचं मोठं विधान; म्हणाले…

Galaxy A14 5G ची किंमत

Galaxy A14 5G या फोनमध्ये ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी इंटर्नल स्टोरेज असणाऱ्या फोनची किंमत १६,४९९ रुपये आहे. तसेच ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटर्नल स्टोरेज या फोनची किंमत १८,९९९ रुपये आहे. ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज असणाऱ्या फोनची किंमत ही २०,९९९ रुपये आहे. SBI, IDFC and ZestMoney यावरून हा फोन खरेदी करताना १५०० रुपयांचा कॅशबॅक मिळत आहे.

Galaxy A23 5G ची किंमत

Galaxy A23 5G या स्मार्टफोनमध्ये ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटर्नल स्टोरेज असणाऱ्या फोनची किंमत २२,९९९ रुपये आहे. तर ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटर्नल स्टोरेज या फोनची किंमत २४,९९९ रुपये इतकी आहे. SBI, IDFC and ZestMoney यावरून फोन खरेदी केल्यास २,००० रुपयांचा कॅशबॅक मिळत आहे.