सॅमसंग कंपनी ५ जुलै रोजी आपल्या मिड-रेंज स्मार्टफोन सीरीज Galaxy M चा नवीन फोन लाँच करणार आहे. सॅमसंगचा हा स्मार्टफोन ५ जुलैला दुपारी १२ वाजता लाँच होईल. सॅमसंग गॅलेक्सी M१३ ५G स्मार्टफोनची बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षा केली जात होती. सॅमसंगने मे महिन्यात Galaxy M13 स्मार्टफोनचा ४G प्रकार लाँच केला होता. आता लवकरच सॅमसंग गॅलेक्सी M१३ स्मार्टफोनचा ५G प्रकार लवकरच भारतात सादर केला जाईल. मिळालेल्या माहितीनुसार, भारतात लवकरच सॅमसंग गॅलेक्सी M१३ ५G चे उत्पादन सुरू होईल. यासोबतच फोनच्या मागील पॅनलची लाईव्ह इमेज देखील कंपनीने शेअर केली होती. आगामी सॅमसंग गॅलेक्सी M१३ ५G स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन देखील FCC सर्टिफिकेशन वेबसाइटवर शेअर केले गेले आहेत. चला तर मग जाणून घेऊया आगामी सॅमसंग गॅलेक्सी एम-सीरीज स्मार्टफोनची किंमत आणि बरंच काही..

Samsung Galaxy M-series Smartphones

सॅमसंगने ट्विटरवर एक पोस्ट शेअर करून माहिती दिली आहे की तो लवकरच नवीन गॅलेक्सी एम-सीरीज स्मार्टफोन लाँच करणार आहे. हा सॅमसंग फोन ५ जुलै रोजी लाँच होणार असल्याची माहिती या पोस्टमध्ये देण्यात आली आहे. सॅमसंगने आपल्या पोस्टमध्ये गॅलेक्सी एम सीरीजचा कोणता स्मार्टफोन असेल याची माहिती दिलेली नाही. असा अंदाज आहे की तो सॅमसंग गॅलेक्सी(Samsung Galaxy M13 5G) असू शकतो. सॅमसंगचा हा स्मार्टफोन निळा, तपकिरी आणि हिरव्या रंगाच्या पर्यायांमध्ये सादर केला जाऊ शकतो.

Mephedrone Pimpri-Chinchwad
पिंपरी-चिंचवडमध्ये आढळले दोन कोटी रुपयांचे मेफेड्रोन, आरोपीला अटक
pakistani singer shazia manzoor slaps sherry nanha in the live show after asking honeymoon
“थर्ड क्लास माणूस…” संतापलेल्या गायिकेने लाईव्ह शोमध्येच कॉमेडियनच्या वाजवली कानाखाली; पाहा video
job opportunity in indian coast guard
नोकरीची संधी : इंडियन कोस्ट गार्डमधील संधी
job opportunity in indian navy
नोकरीची संधी : इंडियन नेव्हीमधील भरती

सॅमसंग गॅलेक्सी(Samsung Galaxy M13 5G) तपशील

  • ६.५ इंचाचा FHD+ LCD डिस्प्ले
  • मीडियाटेक डायमेन्सिटी ७००प्रोसेसर
  • ५००० mAh बॅटरी
  • १५W चार्जिंग
  • ६GB रॅम / १३८GB स्टोरेज
  • ५०MP + २MP ड्युअल रिअर कॅमेरा
  • ५MP सेल्फी कॅमेरा

सॅमसंग गॅलेक्सी(Samsung Galaxy M13 5G) स्मार्टफोनमध्ये ६.५ इंचाचा फुल-एचडी + एलसीडी डिस्प्ले पॅनल आहे. या सॅमसंग फोनमध्ये मीडियाटेक डायमेंसिटी ७०० प्रोसेसर देण्यात आला आहे. सॅमसंगच्या या फोनमध्ये ५०००mAh ची बॅटरी आहे. हा सॅमसंग फोन १५W चार्जिंगसह ऑफर केला जाईल. या सॅमसंग फोनमध्ये ६GB पर्यंत रॅम आणि १२८GB स्टोरेज दिले जाईल. सॅमसंग गॅलेक्सी(Samsung Galaxy M13 5G) स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल. या सॅमसंग फोनमध्ये ५०MP प्राथमिक कॅमेरा आणि २MP दुय्यम कॅमेरा सेन्सर आहे. या सॅमसंग फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी ५MP कॅमेरा आहे.