Samsung ही मोबाईल उत्पादन करणाऱ्या कंपन्यांमधील एक कंपनी आहे. सॅमसंग फेब्रुवारी महिन्यातील पहिल्या आठवड्यातील Galaxy S23 सिरीज लाँच करणार असल्याच्या ज्या चर्चा सुरु आहे त्या केवळ अफवा आहेत. मात्र सॅमसंगच्या आगामी येणाऱ्या स्मार्टफोन्समध्ये २०० मेगापिक्सलचा कॅमेरा , सॅटेलाईट कनेक्टिव्हिटी तसेच आणखी नवीन फीचर्स असण्याची शक्यता आहे. दक्षिण कोरियातील कंपनी Galaxy S सिरीज मधील १२८जीबी असलेले बेस मॉडेल स्क्रॅप करू शकते असा दावा टिपस्टर क्वाइडरचा आहे.
१२८ जीबी असलेले Samsung Galaxy S22 आणि Samsung Galaxy S22+ हे बेस व्हेरिएन्ट मॉडेल म्हणून ओळखले जातात. Apple ची नसून आयफोन सिरीजमध्ये सुद्धा १२८ जीबी स्टोरेज युजर्सना वापरायला मिळते. लीकस्टरच्या म्हणण्यानुसार सॅमसंग कंपनी १२८ जीबी स्टोरेजचे मॉडेल ड्रॉप करून त्याऐवजी Galaxy S23 सिरीज मध्ये २५६ जीबी स्टोरेज असलेले मॉडेल्स बाजारात येऊ शकतात.
ही बातमी सॅमसंग युजर्सना आश्चर्यचकित करणारी आहे. मात्र मोबाईल फोनचे स्टोरेज वाढले तर त्याची किंमत देखील वाढू शकते हे युजर्सनी लक्षात घेतले पाहिजे. सध्या बाजारात असणाऱ्या Samsung Galaxy S22 ची किंमत ७२,९९९ इतकी आहे. यानंतर येणाऱ्या Samsung Galaxy S23 सिरीज मधील मोबाइल्सची किमंत अधिक असण्याची शक्यता आहे.
Samsung Galaxy S23 सिरीज नवीन तीन स्मार्टफोन युजर्ससाठी बाजारात आणू शकते. ते तीन स्मार्टफोन Samsung Galaxy S23, Samsung Galaxy S23+ आणि Samsung Galaxy S23 Ultra असे असू शकतात. सॅमसंगने जाहीर केलेल्या पोस्टरमध्ये Galaxy S23+ चा फर्स्ट लुक तसेच Samsung Galaxy S23 Ultra डिझाईन आणि कलर दाखवण्यात आले आहेत. Samsung Galaxy S23+ गुलाबी रंगाचाअसून, ट्रिपल कॅमेरा सेन्सर्स आहेत. आणि यापुढील असणारे अल्ट्रा हे मॉडेल हिरव्या रंगात असणार आहे. Samsung Galaxy S23 सिरींजमधील स्मार्टफोन्समध्ये Qualcomm च्या स्नॅपड्रॅगन ८ जनरेशन ओक्टा कोअरचे प्रोसेसर असणार आहेत. Apple आयफोन १४ या सिरीजप्रमाणेच सॅमसंगचे स्मार्टफोन्स सॅटेलाईट कनेक्टिव्हिटी असलेले लाँच होऊ शकतात.