Samsung ने Galaxy Unpacked इव्हेंटमध्ये Galaxy S23 या सिरीजचे लाँचिंग केले. सॅमसंग ही एक दक्षिण कोरियाची कंपनी आहे आणि ती स्मार्टफोन्स, लॅपटॉप्स आणि अन्य उपकरणांचे उत्पादन करते. लाँच केलेली फ्लॅगशिप सिरीज ही आधीच्या सिरिजपेक्षा अपग्रेड आहे. मात्र या सिरीजमधील Galaxy S23 Ultra या फोनची भारतातील मागणी ही अपेक्षेपेक्षा जास्त आहे. ज्यांनी या फोनची प्री ऑर्डर केली आहे त्यांचे सॅमसंगने आभार मानले आहेत. अल्ट्रा प्रीमियम स्मार्टफोनची सेगमेंट जागतिक स्तरावर वाढत आहे. Apple आणि OnePlus कंपन्यांचे विस्तारत असलेले क्षेत्र पाहता एस२३ अल्ट्रा हा स्मार्टफोन संगसंगला बाजारपेठ कव्हर करण्यासाठी मदत करेल.
Galaxy S23 सिरीजसाठी एका दिवसाचे प्री-बुकिंग १,००,०० ते १,४०,००० आहे असे सॅमसंग इंडियाचे वरिष्ठ संचालक, मोबाईल बिझनेस, आदित्य बब्बर यांनी indianexpress च्या मुलाखतीमध्ये सांगितले. सॅमसंग फायनान्स प्लस त्याचा विस्तार , डिजिटल कर्ज देण्याचे प्लॅटफॉर्मसोबतच लहान लहान शहरांमध्ये स्मार्टफोनचा अनुभव घेण्यासाठी टचपॉईंट वाढले आहेत. या टचपॉइंटने कंपनीला देशात प्रीमियम स्मार्टफोनचे दुप्पट उत्पादन करण्यासाठी मदत केली आहे असे आदित्य बब्बर म्हणाले.
सॅमसंग फायनान्सचे ८० टक्के ग्राहक टायर ३ आणि त्या खालील विभागामधील आहेत. त्यापैकी ५० टक्के ग्राहक क्रेडिटसाठी नवीन आहेत. ज्यांनी कधीही कर्ज घेतलेले नाही किंवा त्यांना कर्ज मिळू शकत नाही अशांचा यात समावेश आहे. Galaxy S23 च्या प्री ऑर्डरला एवढा प्रतिसाद मिळण्याचे कारण हे सोप्या आर्थिक सुविधा हे कारण आदित्य बब्बर यांनी सांगितले.
Galaxy S23 Ultra चे फीचर्स
Galaxy S23 Ultra हा स्मार्टफोन या सिरीजमधील सर्वात प्रीमियम आणि महागडा स्मार्टफोन आहे. यामध्ये Snapdragon 8 Gen 2 चे अपग्रेड व्हर्जन देण्यात आले आहे. वापरकर्त्यांना ६.८ इंचाचा QHD +AMOLED डिस्प्ले मिळणार आहे.या फोनचे वजन हे २३४ ग्रॅम आहे. यामध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप येतो. तसेच याचा कॅमेरा या २०० मेगापिक्सलचा आहे. हे या फोनचे सर्वात महत्वाचे फिचर आहे. यात 3x आणि 10x ऑप्टिकल झूम सह १२ मेगापिक्सल अल्ट्रावाइड आणि दोन १० मेगापिक्सलच्या टेलीफोटो लेन्स आहेत. १२ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा यामध्ये मिळणार आहे. या फोनमधून दिवसा आणि रतरी काढण्यात आलेल्या फोटोंची क्वालिटी ही चांगलीच असणार आहे. कमी प्रकाशामध्ये फोटो काढण्याची समस्या यामुळे दूर होणार आहे.