scientist found answer of is their ocean inside earth question | Loksatta

पृथ्वीखाली महासागर आहे का? दुर्मिळ हिऱ्याने दिली माहिती

पृथ्वीच्या आत काय आहे, पोकळी आहे का, की पाण्याचे मोठे भांडार आहे. या गोष्टी शास्त्रज्ञांसाठी नेहमीच कुतुहलाचा विषय ठरला आहे. यावर माहिती मिळवणे सुरूच असून आता याविषयी एक मोठी बातमी समोर आली आहे

पृथ्वीखाली महासागर आहे का? दुर्मिळ हिऱ्याने दिली माहिती
पृथ्वी (source – pixabay)

पृथ्वीच्या आत काय आहे, पोकळी आहे का, की पाण्याचे मोठे भांडार आहे. या गोष्टी शास्त्रज्ञांसाठी नेहमीच कुतूहलाचा विषय ठरल्या आहेत. यावर माहिती मिळवणे सुरूच असून आता याविषयी एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये शास्त्रज्ञांना पृथ्वीखाली पाण्याचा मोठा साठा सापडला आहे. हा साठा पृथ्वीच्या पृष्ठभागाखालील सर्व महासागरांच्या आकारमानाच्या तिप्पट आहे. फ्रॅन्कफर्ट येथील संशोधकांनी याविषयावर आभ्यास केला. यातून ही माहिती समोर आली.

हा पाण्याचा साठा पृथ्वीच्या आतील भागातील अप्पर आणि लोअर मॅन्टलच्या मधात असणाऱ्या ट्रान्झिशन झोनमध्ये सापडला आहे. संशोधकांना एका दुर्मिळ हिऱ्याचा तपास केल्यानंतर ही माहिती मिळाली आहे. हा हिरा आफ्रिकेतील आहे. त्याची निर्मिती ही पृथ्वीच्या आत ६०० किमी खोलात ट्रान्झिशन झोन आणि लोअर मॅन्टल जिथे मिळतात त्या ठिकाणी झाली होती. या ठिकाणी रिंगवुडाईट नावाचा खनिज मोठ्या प्राणात असतो.

(भारताच्या मंगळ मोहिमेला ब्रेक? ‘या’ मोठ्या समस्येमुळे मंगळयानाशी संपर्क तुटला)

हिऱ्यामध्ये रिंगवुडाईट असल्याचे समोर आले आहे. रिंगवुडाईटमध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असते. शिवाय हिऱ्याची रासायनिक रचनेची देखील माहिती मिळाली आहे. तसेच जगातील कुठल्याही बेसाल्ट खडकामध्ये आढळणाऱ्या मॅन्टल दगाडासारखाच हा हिरा आहे. यातून हा हिरा पृथ्वीच्या मॅन्टलमधील सामान्य तुकड्यापासून निर्माण झाला आहे, हे स्पष्ट होते.

संशोधनातून पृथ्वीखालील ट्रान्झिशन झोन हा सुका भाग नसून त्यात मोठ्या प्रमाणात पाणी असल्याचे स्पष्ट होते, असे फ्रँकफर्टमधील गोएथे विद्यापीठातील इन्स्टिट्यूट फॉर जिओसायन्सेसचे प्राध्यापक फ्रँक ब्रेंकर यांनी सांगितले. याने जुल्स वर्ण यांच्या पृथ्वीखालील समुद्राच्या कल्पनेच्या जवळपास अपण पोहोचलो आहे. मात्र फरक इतकाच की, पृथ्वीखाली महासागर नाही, पण जलयुक्त खडक आहेत, असे ब्रेन्कर म्हणाले.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
आता टिकटॉकप्रमाणे ट्विटरवर पाहता येणार व्हिडीओ! काय आहे नवे फीचर जाणून घ्या

संबंधित बातम्या

अबब! ५०० दशलक्ष व्हॉट्सअ‍ॅप युजर्सचा डेटा विक्रीला काढला, हॅकरने इतकी लावली किंमत, ‘या’ देशांतील युजर्सचा समावेश
Best Recharge Plan: मस्तच! ३९५ रुपयांमध्ये अमर्यादित कॉलिंग आणि डेटाचा लाभ घ्या; तीन महिन्याच्या वैधतेसह उपलब्ध
मस्तच! Google चा ‘हा’ भन्नाट फीचर्स व्हॉट्सअॅपसारखं करेल काम; आता मजा होणार दुप्पट, पाहा काय आहे तुमच्यासाठी खास…
भारतात लॉंच झाला सर्वात स्वस्त स्मार्टफोन Itel A23S, जाणून घ्या किंमत आणि सर्व स्पेसिफिकेशन्स
Flipkart Irresistible Infinix Days Sale: १० हजारांपेक्षा कमी किंमतीत घरी न्या ‘हे’ स्मार्टफोन; कॅमेऱ्यासह मिळेल बरंच काही, पाहा ऑफर

व्हिडिओ

ताज्या बातम्या
Tips To Reduce Electricity Bill: मस्तच! वीजबिल बिल येईल कमी; ताबडतोब घरात बसवा ‘हे’ डिव्हाइस
लोणावळ्यात बंगल्यातील जलतरण तलावात बुडून बालिकेचा मृत्यू
पुणे: नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाला ई-रजिस्ट्रेशन प्रणालीसाठी राष्ट्रीय पुरस्कार
विक्रम गोखलेंच्या निधनाने बिग बी भावूक, पोस्ट शेअर करत म्हणाले “भूमिका निभावली आणि हा मंच…”
“किचनचा दरवाजा लावून तो…” अजय देवगणच्या ‘या’ सवयीबद्दल काजोलचा खुलासा