Stock Market Tips: शेअर मार्केटला अनेक जण गंमतीत सोन्याचं अंड देणारी कोंबडी म्हणतात, खरं पाहायला गेलं तर कमी वेळात अधिक नफा मिळवून देणारं हा एक कमाल मार्ग आहे. पण जर का गुंतवणूक करताना आपण नाही काही गोष्टींकडे नीट लक्ष दिले नाही तर शेअर मार्केट तुमचं सर्वात वाईट स्वप्न सुद्धा खरं करू शकतं. आपल्याही आजूबाजूला असे अनेकजण असतील जे रोज पैसे गुंतवतात व रोज शेअर विक्री करून पैसे कमावतात. तर काही निवडक जण अधिक काळासाठी पैसे गुंतवण्याला प्राधान्य देतात, खरंतर शेअर मार्केट तज्ज्ञांच्या माहितीनुसार अधिक काळासाठी पैसे गुंतवणे हे अधिक फायद्याचे ठरते . जर आपणही शेअर मार्केट मध्ये एक लॉन्ग टर्म इन्व्हेस्टमेंट करू इच्छित असाल तर आज आपण काही महत्त्वाच्या टिप्स पाहणार आहोत, ज्या तुम्हाला नुकसानापासून वाचवतील..

Edu91 चे संस्थापक आणि लर्न पर्सनल फायनान्सचे सह- संस्थापक नीरज अरोरा यांनी सांगितल्याप्रमाणे शेअर मार्केट मध्ये लॉन्ग टर्म इन्व्हेस्टमेंट करताना तुम्ही एक ध्येय ठेवून पैसे गुंतवा. असे करताना या गोष्टी लक्षात ठेवा…

fssai to examine mdh and everest spices banned recently in singapore and hong kong
मसाल्यावरील बंदीच्या  सिंगापूर, हाँगकाँगच्या निर्णयाची तपासणी; एफएसएसएआय, मसाला मंडळाचे पाऊल
canada student visa (1)
कॅनडाच्या ‘त्या’ निर्णयाने भारतीय विद्यार्थी अडचणीत, स्टडी व्हिसाऐवजी व्हिजिटर व्हिसावर कॅनडाला जाण्याच्या प्रयत्नात; कारण काय?
restaurant inside metro coach nmrc introduces unique metro coach restaurant at sector 137 station know seating capacity read all details
आता मेट्रोमध्ये करु शकता पार्टी अन् मीटिंग; ‘या’ ठिकाणी सुरू होतेय मेट्रो कोच रेस्टॉरंट
indigrid cio meghana pandit talks about future Investment flow in invit
‘इन्व्हिट्स’मध्ये गुंतवणूक ओघ वाढत जाणार ! इंडिया ग्रिड ट्रस्टच्या मुख्य गुंतवणूक अधिकारी पंडित यांचे प्रतिपादन  
  • कंपनीची निवड बारकाईने करा. जर आपण तृतीय पक्षाकडून पैसे गुंतवणार असाल तर मध्यस्थ कंपनीची नीट तपासणी करा.
  • ज्या कंपनीचे शेअर विकत घेणार आहात त्या मालक कंपनीची सुद्धा माहिती काढा.
  • कंपनीला मिळणारे फंडिंग, त्याचे व्यवहाराचे मार्ग, सध्याची बाजारातील स्थिती, कंपनीवरील कर्ज या सगळ्याविषयी माहिती घ्या.
  • तुम्ही ज्या कंपनीमध्ये शेअर घेत आहेत त्याचे अपडेट्स ३ ते ६ महिन्यांनी तपासत रहा. कंपनीचा नफा- तोट्याचा आलेख तपासा.
  • जर वारंवार तुम्हाला बातम्यांमध्ये कंपनीच्या कारभाराविषयी असमाधानकारक माहिती दिसत असेल तर तुम्ही तुमची गुंतवणूक वेळेपूर्वी सुद्धा विकू शकता.
  • नीरज यांनी सांगितल्याप्रमाणे, काही कंपनीचे बाजारमूल्य अस्थिर असण्यामागे विविध कारणे असू शकतात, पण त्यामुळे लगेच गुंतवणूक काढून घेण्याची घाई करू नका. यासाठी कंपनी काय ठोस पाऊलं उचलतेय हे तपासून पहा.

खातेदारांचे Savings धोक्यात टाकणाऱ्या ‘या’ 8 बँकांना RBI चा दणका; तुमचे अकाउंट तर नाही ना? पहा यादी

शेअर मार्केट मध्ये तुम्ही कोणत्या कंपनीत पैसे गुंतवता हे तुम्ही किती पैसे गुंतवता याहून अधिक महत्त्वाचे आहे. कारण जरी तुम्ही कमी रक्कम गुंतवली पण त्या कंपनीला नेहमीच अधिक फायदा होत असेल तर तुमची कमी रक्कम सुद्धा दुपटीने वेगात वाढू शकते. त्यामुळे वर दिलेल्या मुद्द्यांचा आधारे कंपनीचे परीक्षण करायला विसरू नका.