Sleep during the train journey the train itself will call you to wake you up when you reach the station | Loksatta

रेल्वे प्रवासात बिनधास्त झोपा, स्टेशन आल्यावर तुम्हाला जाग करण्यासाठी रेल्वेच करणार फोन; जाणून घ्या काय आहे सुविधा

भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी ‘डेस्टिनेशन अलर्ट’ आणि ‘वेकअप अलार्म’ची सुविधा सुरू केली आहे

रेल्वे प्रवासात बिनधास्त झोपा, स्टेशन आल्यावर तुम्हाला जाग करण्यासाठी रेल्वेच करणार फोन; जाणून घ्या काय आहे सुविधा
प्रवाशांसाठी रेल्वेची भन्नाट सुविधा! प्रवासादरम्यान बिनधास्त झोपा (Photo : Indian Express)

आपल्यापैकी जवळपास प्रत्येकाने रेल्वेने प्रवास केला आहे. मुंबईसारख्या शहरात तर रेल्वे म्हणजे जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे. त्यामुळे रेल्वे आणि भारतीयांचे नातं वेगळ्या शब्दात सांगण्याची गरज नाही. मात्र, रेल्वेतून लांबच्या पल्ल्याचा प्रवास करत असताना आपल्याला एका गोष्टीची भीती असते ती म्हणजे प्रवासात रात्रीच्या वेळी झोप लागली आणि स्टेशन चुकलं तर काय करायचं? अनेक लोकांसोबत असं होतं की, झोपल्यामुळे त्यांना पुढच्या स्टेशनवर उतरावं लागतं आणि त्यामुळे अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं.

पण जर तुमचं स्टेशन आल्यानंतर रेल्वेनेच फोन करुन जागं केलं तर, अविश्वसनिय वाटतंय ना पण हे खरं आहे. रेल्वेने आता आपल्या प्रवाशांना झोपेतून उठवण्यासाठी चक्क फोनची सुविधा सुरु केली आहे. भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी ‘डेस्टिनेशन अलर्ट’ आणि ‘वेकअप अलार्म’ची सुविधा सुरू केली आहे.

हेही वाचा- अपघात टाळा पैसेही वाचवा! Google चे ‘हे’ अ‍ॅप तुमची कार स्पीड लिमिट क्रॉस करताच देईल इशारा

या सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. त्यानंतर तुमचे स्टेशन येण्यापूर्वीच तुमच्या मोबाइलवर रेल्वेकडून एक मेसेज येईल आणि अलार्म वाजेल ज्यामुळे तुम्ही झोपेतून जागे व्हाल. ‘डेस्टिनेशन अलर्ट’ आणि ‘वेकअप अलार्म’चा लाभ कसा घ्याल ते जाणून घेऊया.

रात्री ११ ते सकाळी ७ पर्यंत सुविधा-

भारतीय रेल्वेने आरक्षण असलेल्या प्रवाशांसाठी डेस्टिनेशन अलर्ट आणि वेकअप अलार्मची सुविधा सुरु केली असून या सेवेचा लाभ देण्यासाठी तुम्हाला १३९ नंबर डायल करावा लागेल त्यानंतर IVR ने सांगितलेल्या काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. या स्टेप फॉलो करताच तुम्ही स्टेशनवर पोहोचण्याआधी, तुम्हाला एका मेसेजद्वारे अलर्ट केलं जाईल. ही सुविधा रात्री ११ ते सकाळी ७ पर्यंत उपलब्ध असेल. शिवाय तुम्ही १३९ या नंबरला फोन करुनही अलार्म सेट करु शकता.

वेकअप अलार्म कसा सेट कराल –

हेही वाचा- Airplane Mode म्हणजे काय? फ्लाइट मोड चालू करणं कधी असतं गरजेचं? जाणून घ्या

वेकअप अलार्म सुरु करण्यासाठी १३९ नंबर डायल करा. त्यानंतर तुमची भाषा निवडा, भाषा निवडल्यानंतर IVR मेनूमध्ये जाऊन ७ नंबर दाबा. त्यानंतर IVR ने दिईल त्या सूचनांनुसार १ दाबा त्यानंतर तुम्हाला तुमचा १० अंकी PNR नंबर टाकावा लागेल. तो नंबर टाकला की १ दाबून तो कनफर्म करा. त्यानंतर तुम्हाला १३९ वरून कन्फर्मेशन मेसेज येईल आणि तुम्हाला ज्या ठिकाणी जायचं आहे त्या स्टेशनची नाव सांगायचं आहे. दरम्यान, तुमचे नियोजित स्टेशन यायाच्या २० मिनिटं आधीच मोबाईलवर वेकअप अलार्म वाजायला सुरुवात होईल.

डेस्टिनेशन अलर्ट कसा सेट कराल ?

  • सर्वात आधी १३९ नबंर डायल करा.
  • तुमची भाषा निवडा आणि ७ हा पर्याय निवडा.
  • आत्मसात पर्याय निवडल्यानंतर २ दाबा.

हेही वाचा- इमारतीच्या छतावर विटा नेण्यासाठी कामगारांनी शोधली भन्नाट आयडीया; नेटकरी म्हणाले, ‘क्रिएटीव्हीटीला सलाम’

  • तुमचा १० अंकी PNR नंबर टाका आणि १ दाबा.
  • डेस्टिनेशन अलर्टचा मेसेज मिळेल. त्यामध्ये तुमच्या स्टेशनचे नाव लिहा.
  • वरील प्रक्रिया पुर्ण होताच तुमचे स्टेशन यायच्या २० मिनिटं आधी अलर्ट मेसेज येईल.

मेसेजद्वारे सुविधेचा लाभ घ्या –

कॅपिटल अक्षरांमध्ये अलर्ट (ALERT) लिहा. त्यानंतर स्पेस द्या आणि तुमचा पीएनआर नंबर लिहा. तो मेसेज १३९ नंबरवर पाठवा. त्यानंतर तुम्हाला उतरायचे आहे त्या स्टेशनचे नाव लिहून मेसेज पाठवा.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-12-2022 at 12:32 IST
Next Story
अंबानींकडून रिलायन्स जिओ प्रीपेड ग्राहकांना खास गिफ्ट; २२२ रुपयाचा ‘हा’ नवा रिचार्ज प्लॅन वाचवेल खर्च