स्लो WiFi मुळे कामात येत आहे अडथळा? या टिप्सचा वापर करून वाढावा इंटरनेट स्पीड

गेल्या २ वर्षांच्या काळात सगळीकडेच वर्क फ्रॉम होमची पद्धत सुरु झाली आहे. यासाठी बहुतेकांनी आपल्या घरात वायफाय (WiFi) राउटर लावून घेतले आहे.

wifi router pixabay
राउटर नीट काम करत नाही, याचा थेट परिणाम इंटरनेटच्या स्पीडवर होतो. (Photo : Pixabay)

आजचं जग हे इंटरनेटवर चालणारे जग आहे. आजच्या काळात आपण जवळपास सर्वच कामांसाठी इंटरनेटवर अवलंबून आहोत. त्याच्याशिवाय आपले कोणतेच काम पूर्ण होऊ शकत नाही. त्यातच गेल्या २ वर्षांच्या काळात सगळीकडेच वर्क फ्रॉम होमची पद्धत सुरु झाली आहे. यासाठी बहुतेकांनी आपल्या घरात वायफाय (WiFi) राउटर लावून घेतले आहे ज्यामुळे पूर्ण घरात इंटरनेटची सुविधा प्राप्त होते. परंतु अनेकदा असे होते की राउटर नीट काम करत नाही. याचा थेट परिणाम इंटरनेटच्या स्पीडवर होतो. आज आपण अशा काही टिप्स जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही तुमच्या वायफाय राउटरची स्पीड वाढवू शकता.

योग्य ठिकाणी वायफाय सेट करावा

वायफायच्या चांगल्या स्पीडसाठी वायफाय राउटर घराच्या अशा ठिकाणी असावा जिथून याची रेंज घराच्या प्रत्येक कोपऱ्यापर्यंत पोहचू शकेल. राउटर जमिनीवर किंवा भिंतीवर लावू नये. सोबतच याच्या आजूबाजूला कोणतीही धातूची वस्तू नसेल याची काळजी घ्यावी. आपल्या घरातील वायफाय राउटरच्या सिग्नलवर घरातील भिंती आणि मोठ्या धातूंच्या वस्तूंमुळे परिणाम होतो.

शट डाउन, स्लीप की हायबरनेट? जाणून घ्या तुमच्या लॅपटॉपसाठी कोणत्या मोडची कधी असते गरज

वायफाय राउटर वेळोवेळी अपडेट करावा

स्मार्टफोनप्रमाणेच वायफाय राउटरसुद्धा वेळोवेळी अपडेट केल्याने त्याची स्पीड चांगली राहील. तुमच्याकडे ज्या कंपनीचा राउटर असेल त्याच्या वेबसाइटवर जाऊन लेटेस्ट अपडेटबाबत माहिती मिळवू शकता.

अँटीना

अनेक वायफाय राउटरचा अँटीना खराब होतो, यामुळे वायफायच्या स्पीडमध्ये फरक पडतो. असे अनेक राउटर आहेत ज्यांचे अँटीना बदलले जाऊ शकतात आणि तुम्हाला चांगली वायफाय स्पीड मिळू शकते. तसेच, कधी हा अँटीना राउटरच्या आत असतो तर कधी बाहेर असतो. जर तुमचा वायफाय सिग्नल कमकुवत असेल तर तुमच्या राउटरच्या अँटीनाची स्थिती बदलून बघा.

रिपीटर्स

जर तुमच्या वायफायचा सिग्नल तुमच्या एखाद्या खोलीत किंवा घराच्या एखाद्या कोपऱ्यात पोहचत नसेल तर तुम्ही रिपीटर्सचा वापर करू शकता. यामुळे तुमच्या वायफायच्या सिग्नलची रेंज वाढू शकते.

Google Mapsच्या मदतीने पत्ता शोधणे होणार सोपे; ‘Plus Codes’चा वापर करून सर्च करा अ‍ॅड्रेस

सेटिंग्जमध्ये बदल

वायफायचा वापर करताना जर एखादी वेबसाइट उघडण्यास खूप वेळ लागत असेल तर आपल्याला वायफायच्या सेटिंग्जमध्ये काही बदल करावे लागतील. तुम्ही वायफाय राउटर सेटिंग्जमध्ये जाऊन दुसरा डीएनएस वापरू शकता. तसेच, तुम्ही गुगलचा सार्वजनिक डीएनएस वापरू शकता. यानंतर तुमची वेबसाइट वेगाने उघडेल.

वायफाय राउटरपासून इलेक्ट्रॉनिक वस्तू लांब ठेवा

जेव्हाही तुम्ही तुमच्या घरात वायफाय राउटर बसवून घ्याल तेव्हा हे लक्षात ठेवा की ते इतर कोणत्याही सिग्नल इलेक्ट्रॉनिक उपकरणाच्या अगदी जवळ ठेवू नये. कारण एकमेकांना भिडल्यानंतर हे सिग्नल कमकुवत होतात आणि यामुळे तुमची इंटरनेट स्पीड कमी होऊ शकते.

उंच ठिकाणी वायफाय राउटर फिट करावे.

वायफाय राउटर बसवताना, ते तुमच्या घरात उंच ठिकाणी फिट करावे. असे केल्याने इंटरनेट सर्वांपर्यंत सहज पोहोचेल आणि सिग्नलमध्ये कोणताही व्यत्यय येणार नाही.

नव्या स्मार्टफोनमध्ये का नसतो रिमुव्हेबल बॅटरीचा पर्याय? जाणून घ्या या मागचं कारण

कोणते वायफाय राउटर विकत घ्यावे ?

जर तुमचा वायफाय राउटर जुना झाला असेल आणि तुम्ही नवीन वाय-फाय राउटर घेणार असाल तर ड्युअल बँड राउटर घ्या. ते तुम्हाला घराच्या प्रत्येक कोपऱ्यात वायफाय सिग्नल मिळवून देऊ शकतात.

या सोप्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही तुमच्या घरातील वायफाय राउटरचा स्पीड वाढवू शकता.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Slow wifi interrupts work use these tips to increase internet speed pvp

Next Story
मोबाईल वापरकर्त्यांसाठी खुशखबर! आता २८ नाही, तर ३० दिवसांचा असेल रिचार्ज प्लॅन; TRAIचे टेलीकॉम कंपन्यांना निर्देश
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी