आपण शाळेत असताना किंवा आपले आई वडील शाळेत असताना वही,पेन आणि पाटी पेन्सिलने अभ्यास करत होतो. मात्र आता हळूहळू काळ बदलत आहे. तसेच कॉलेज आणि शाळांमध्ये आता आधुनिक तंत्रज्ञान येत आहे. आता टॅबलेट आणि पीसीवर काम होत असल्यामुळे आता पाटी पेन्सिल वापरावी लागत नाही. आता असेच काही स्मार्ट पॅड्स बाजारात आले आहेत. ते रायटिंग पॅड्स कोणते आहेत हे जाणून घेऊयात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्मार्ट रायटिंग पॅड कसे काम करतात ?

एलसीडी ड्रॉईंग टॅबलेटमध्ये अनेक स्तरांवर प्रतिरोधक स्क्रीन असते ती प्रेशरमुळे स्पर्श ओळखते. याचा एक लेयर हा लिक्विड क्रिस्टलचा तयार करण्यात आलेला आहे. स्क्रीनच्या इलेक्ट्रोडच्या मध्ये असणारी गॅप कमी करतात. त्यामुळे स्क्रीनवर जे काढले जाते ते पॅडवर दिसते.

हेही वाचा : BSNL ने आणले ‘हे’ जबरदस्त फिचर, आता सेटअप बॉक्सशिवाय पाहता येणार टीव्ही

स्मार्ट रायटिंग पॅडचे काय आहेत फायदे ?

आताच्या काळात स्मार्ट पॅड्स हे अत्यंत स्वस्त आहेत की खरेदी केल्यावर आपले बरेच पैसे वाचतात. कारण आपला कागदपत्रे, पेन्सिल आणि इरेझरवर अधिक खर्च होत नाही. बहुतेक स्मार्टपॅड्स हे अजिबात प्रकाश सोडत नाहीत. त्यांची स्किन आपल्याला खेडं कागदासारखी नैसर्गिक दिसते. थोडक्यात ते Amazon च्या लोकप्रिय ई-रीडर Kindle प्रमाणेच काम करतात.

या स्मार्ट पॅड्सचे वजन फक्त १५० ग्राम इतके असते. ते पोर्टेबल प्रकारातले असते. त्यामुळे ते शाळेच्या दप्तरामध्ये आणि हॅन्डबॅगमध्ये ठेवता येते. आपल्या वहीपेक्षा स्लिम असतात.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Smart writing pads have come in market and available in market at cheap prices tmb 01
First published on: 25-01-2023 at 11:38 IST