सकाळच्या अलार्मपासून ते रात्रीच्या सोशल मीडिया सर्फिंग पर्यंत आपल्या हातात सतत मोबाईल असतो. म्हणजेच आपल्या प्रत्येक दिवसाची सुरूवात आणि शेवट मोबाईलनेच होतो. दिवसभरातील अनेक महत्वाची काम करण्यासाठी आपण मोबाईलचा आधार घेतो. म्हणजे एकुणच काय तर आपल्या दैनंदिन आयुष्यातील मोबाईल हा एक अविभाज्य घटक झाला आहे. आपल्यासाठी इतके महत्वाचा असणारा हा मोबाईल कधी कधी अचानक हळू काम करायला लागतो किंवा मध्येच हँग होतो. तेव्हा आपण काही तांत्रिक बिघाडामुळे असे होत असेल असे समजुन दुर्लक्ष करतो. मात्र हे मोबाईल हॅक होण्याचे संकेत देखील असु शकतात. त्यामुळे असे संकेत दिसत असतील तर वेळीच सावध होण्याची गरज आहे. मोबाईल हॅक झाला आहे ते कसे ओळखायचे जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मोबाईल हॅक झाला असेल तर ते आपल्याला कसे कळणार? हा प्रश्न पडणे साहजिक आहे. कारण फोन हॅक झाला हे सहजरित्या समजत नाही. परंतु फोन हॅक झाल्यावर काही विशिष्ट संकेत दिसतात त्यावरून हे ओळखणे सोपे होते. हे संकेत जर तुम्हाला दिसले तर तुमचा फोन हॅक झाला आहे हे लगेच स्पष्ट होईल.

आणखी वाचा – वर्षभरासाठीचा जिओचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन कोणता? जाणून घ्या

मोबाईल हॅक झाला आहे हे ओळखण्याचे संकेत

मोबाईलची बॅटरी लगेच संपते

जेव्हा मोबाईल हॅक होतो तेव्हा त्यात मालवेअर किंवा फ्रॉड इन्स्टॉल होण्याची शक्यता असते. हे ॲप मोबाईल वापरात नसताना देखील म्हणजे स्क्रीन ऑफ असताना देखील चालू राहून डेटा चोरी करत असतात. त्यामुळे सामान्य स्थितीपेक्षा लवकर मोबाईलची बॅटरी संपते. म्हणजेच मोबाईलची बॅटरी लगेच संपणे हा मोबाईल हॅक झाल्याचा एक संकेत आहे.

मोबाईलची स्पीड कमी होणे

जर तुमचा मोबाईल नेहमी पेक्षा हळू काम करत असेल तर हे मोबाईल हॅक झाल्याचे लक्षण असु शकते. फोन हँग झाल्यामुळे फोनची स्पीड कमी झाली आहे असे वाटते. पण याचे कारण मोबाईल हॅक होणे देखील असु शकते.

Smartphone Price Hike: लवकरच स्मार्टफोन होणार महाग; जाणून घ्या कारण

ऑनलाईन अकाउंटस चेक करा

जर तुम्हाला सतत ऑनलाईन अकाऊंट मध्ये लॉगिन करण्याचा मेसेज येत असेल, तर हे मोबाईल हॅक झाल्याचे लक्षण आहे. याशिवाय सोशल मीडिया ॲप्स देखील चेक करा. जर त्यावर ‘अननोन लॉगिन’ (Unknown login) असा मेसेज सतत येत असेल तर याचा अर्थ तुमचा मोबाईल हॅक झाला आहे.

अननोन कॉल आणि मेसेज

जर तुम्हाला सतत अननोन कॉल आणि मेसेज येत असतील, तर हे फोन हॅक झाल्याचे संकेत असु शकतात. हॅकर्सद्वारे फ्रोजन मेसेजमधुन फोन हॅक केला जातो. याशिवाय तुमच्या कॉन्टॅक्टमधील व्यक्तींचा फोन हॅक होण्याची देखील शक्यता असते. त्यामुळे एखाद्या अननोन नंबरवरून शेअर झालेली लिंक ओपन करू नये.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Smartphone hacks use these tricks to know if someone has hacked your phone pns
First published on: 28-08-2022 at 11:03 IST