आज प्रत्येकाकडे अँड्रॉइड स्मार्टफोन आहे. अँड्रॉइड स्मार्टफोन वापरणाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. जोकर मालवेअर Google Play Store वर परत आला आहे. जोकर मालवेअर सायबर अटॅकसाठी ओळखले जाते. आता या मालवेअरने गुगल प्ले स्टोअरपर्यंत पोहोचण्यासाठी आपली ओळख बदलली असून लाखो यूजर्सना त्याचा बळी बनवले आहे. जोकर नंतर हार्ली मालवेअर देखील यूजर्सना बळी पाडू लागला आहे आणि तो अनेक मार्गांनी अधिक धोकादायक असल्याची माहिती आहे.

कॅस्परस्कीच्या म्हणण्यानुसार, हार्ले मालवेअर १९० हून अधिक अँड्रॉइड अॅप्समध्ये सापडले आहेत आणि हे अॅप्स लाखो वेळा डाउनलोड केले गेले आहेत. डीसी कॉमिक्स युनिव्हर्समध्ये, बॅटमॅन मालिकेतील खलनायक ‘जोकर’ आणि त्याच्या मैत्रिणीचे नाव ‘हार्ले क्विन’ आहे. या अतिशय लोकप्रिय पात्राच्या नावावरून नवीन मालवेअरचे नाव देण्यात आले आहे. आता हार्ले नावाच्या मालवेअरने अँड्रॉइड इकोसिस्टममध्ये प्रवेश केला आहे आणि Google Play वरून इन्स्टॉल अॅप्ससह डिव्हाइसेसना इनफेक्ट करू शकतो.

आणखी वाचा : विश्लेषण : जगभरात हेरगिरीसाठी आता ‘पेगॅसस’ नाही, तर ‘हरमिट’ स्पायवेअरची चर्चा; नेमकं काय आहे प्रकरण?

हार्ली मालवेअर जोकरपेक्षा वेगळा

जोकर मालवेअर डिव्हाइसवर वास्तविक दिसणारे अॅप इन्स्टॉल केल्यानंतर मालिशियस कोड डाउनलोड करतो. तर, हार्ली मालवेअर स्वतःच मालिशियस कोड आणतो आणि त्याला रिमोटली कंट्रोल करण्याची आवश्यकता नाही.

हार्ली मालवेअर अशा प्रकारे करतो फसवणूक

हार्ली मालवेअर यूजर्सना त्यांच्या माहितीशिवाय पेड सब्सक्रिप्शन सेवांसाठी साइन अप करण्यास प्रवृत्त करते. एकदा डिव्हाइसचा भाग झाल्यानंतर, मालवेअर गुप्तपणे महागड्या सेवांचे सब्सक्रिप्शन घेतो, यूजर्सद्वारे बिल केले जाते आणि त्याच्या माहितीशिवाय खाते रिकामे करते. हा मालवेअर एसएमएस किंवा फोन कॉल व्हेरिफिकेशनच्या मदतीने साइन-अप करतो आणि फोन कॉल देखील करू शकतो.

अशा प्रकारे करा बचाव

मालवेअर टाळण्याचा मार्ग म्हणजे अॅप्स डाउनलोड करताना काळजी घेणे. प्ले स्टोअर वरून अॅप डाउनलोड करा आणि त्याचे रिव्यू तपासा. शंका असल्यास तुम्ही अॅपची तक्रार देखील करू शकता.