स्मार्टफोन हा आपल्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग बनला आहे. आपल्या फोनमध्ये वेगवेगळे अ‍ॅप्स असतात. आता प्रत्येक कामासाठी वेगवेगळे अ‍ॅप्स आहेत. सध्या असा अहवाल समोर आला आहे, ज्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. धोकादायक स्पायवेअर वेळोवेळी गुगल प्ले स्टोरवर एक नवा धोका उत्पन्न करतात. सायबर सुरक्षा कंपनी ट्रेंड मायक्रोच्या ताज्या अहवालात असे सूचित केले आहे की प्ले स्टोअरवरील २०० हून अधिक अँड्रॉईड अ‍ॅप्समध्ये फेसस्टीलर नावाचा धोकादायक स्पायवेअर आहे, जो केवळ वापरकर्त्यांचा वैयक्तिक डेटाच नाही तर फेसबुक पासवर्ड आणि इतर अनेक तपशील देखील चोरू शकतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ट्रेंड मायक्रोला फेसस्टीलर स्पायवेअरसोबतच २०० पेक्षा जास्त अ‍ॅप्स, तसेच ४० हून अधिक बनावट क्रिप्टोकरन्सी मायनर अ‍ॅप्स सापडले जे क्रिप्टो पैसे चोरण्याचा आणि वापरकर्त्यांच्या परवानगीशिवाय संवेदनशील माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करत होते. अहवालात असे म्हटले आहे की त्यापैकी काही अ‍ॅप्स १००,००० हून अधिक लोकांनी इंस्टॉल केले होते. काही अ‍ॅप्स अनवधानाने वापरकर्त्याची संवेदनशील माहिती गोळा करत होते.

आता अ‍ॅप न उघडताच होणार पेमेंट; जाणून घ्या Google Pay चे नवे फीचर

‘हे’ ७ अ‍ॅप्स आहेत सर्वात धोकादायक

  • डेली फिटनेस ओएल (Daily Fitness OL)
  • पॅनोरमा कॅमेरा (Panorama Camera)
  • बिजनेस मेटा मॅनेजर (Business Meta Manager)
  • स्वॅम फोटो (Swam Photo)
  • एन्जॉय फोटो एडिटर (Enjoy Photo Editor)
  • क्रिप्टोमायनिंग फार्म युअर ओन कॉइन (Cryptomining Farm Your own Coin)
  • फोटो गेमिंग पझल (Photo Gaming Puzzle)

DigiLocker WhatsApp Services : आता व्हॉट्सअ‍ॅपवरून डाउनलोड करता येणार पॅन आणि आधारकार्ड; जाणून घ्या तपशील

या सर्व अ‍ॅप्स हजारो लोकांनी इंस्टॉल केले आहेत. अहवालानुसार, गूगल ने या स्पायवेअरची दखल घेतली आणि लगेचच फेसस्टिलरवरून संक्रमित अ‍ॅप्स काढून टाकले. तथापि, ज्या वापरकर्त्यांनी यापैकी कोणतेही अ‍ॅप्स त्यांच्या स्मार्टफोनमध्ये इंस्टॉल केले आहेत ते ताबडतोब काढून टाकावे जेणेकरुन त्यांनी तुमची कोणतेही वैयक्तिक माहिती गोळा करू नये.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Smartphone users should be careful in time these 7 apps are stealing your personal information uninstall now pvp
First published on: 25-05-2022 at 23:02 IST