पुढचा आठवडा मोबाईल फोन इंडस्ट्रीत मोठा धुमाकूळ गाजणार आहे. गेल्या काही आठवड्यांमध्ये काही नवीन फोन लाँच करण्यात आली आहेत. पण आता पुढील आठवड्यात Samsung, Tecno, Realme आणि Poco सारख्या कंपन्या त्यांचे स्मार्टफोन लॉंच करणार आहेत. यापैकी Tecno चा फोन फिलीपिन्समध्ये आधीच लॉन्च झाला आहे आणि आता २० जून रोजी भारतात दाखल होईल. तर Realme, Poco आणि Samsung फोन भारतात सर्वप्रथम लॉंच केले जातील. पुढच्या आठवड्यात लॉंच होणार्‍या या फोन्सबद्दल सर्व काही जाणून घ्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१. Tecno Pova 3
हा स्मार्टफोन फिलिपिन्समध्ये मे च्या उत्तरार्धात लाँच झाला होता. आता हा फोन भारतात २० जून रोजी लॉंच होईल. कंपनी एका प्रेस रिलीज आणि सोशल मीडिया पोस्टद्वारे दुपारी १२ वाजता फोन देशात रिलीज करेल.

Tecno Powa 3 चे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये दिलेली मोठी ७००० mAh बॅटरी आहे. ही बॅटरी ३३ W फास्ट चार्जिंग आणि १० W रिव्हर्स चार्जिंगला सपोर्ट करते. या हँडसेटमध्ये ६.९ इंच फुलएचडी + ९० Hz डिस्प्ले (LCD) आहे. हा स्मार्टफोन MediaTek Helio G88 प्रोसेसर, ६ GB पर्यंत रॅम आणि १२८ GB इनबिल्ट स्टोरेजद्वारे समर्थित आहे. हँडसेटमध्ये ५० मेगापिक्सेल प्रायमरी, २ मेगापिक्सल आणि २ मेगापिक्सल सेन्सर्ससह ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. हँडसेटमध्ये ड्युअल स्टीरिओ स्पीकर, z-अॅक्सिस लिनियर व्हायब्रेशन मोटर आणि अँड्रॉइड ११  सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

आणखी वाचा : रंग बदलणाऱ्या Vivo V23 5G स्मार्टफोनवर १४ हजार रुपयांपर्यंत बचत करण्याची संधी, जाणून घ्या सविस्तर

२. Realme C30
Realme C30 स्मार्टफोन भारतात २० जून रोजी लॉंच होईल. दुपारी १२.३० वाजता फोनसाठी जागतिक लॉंचसह थेट लाईव्ह इव्हेंट असेल.

Realme C30 स्मार्टफोनमध्ये मल्टीपल स्ट्रिपसह नवीन डिझाइन दिसेल. हँडसेटच्या मागील पॅनलवर १३ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा दिला जाईल. फोनमध्ये Unisoc T612 चिपसेट आणि ५००० mAh बॅटरी उपलब्ध असेल. याशिवाय रिअॅलिटीच्या या फोनमध्ये ६.५८ इंच फुलएचडी + डिस्प्ले, ड्यूड्रॉप नॉच, ५ मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा, मायक्रोयूएसबी पोर्ट, ३.५ मिमी हेडफोन जॅक, अँड्रॉइड गो एडिशन आणि १० डब्ल्यू चार्जिंग सारखी फीचर्स मिळतील.

३. Samsung Galaxy F13
Samsung Galaxy F13 स्मार्टफोन २२ जून रोजी भारतात लॉंच होईल. सॅमसंगने दुपारी १२ वाजता फोन लॉंच केल्याची पुष्टी केली आहे. कंपनी लाइव्ह स्ट्रीम किंवा प्रेस रिलीज पाठवून या फोनच्या लॉंचची घोषणा करू शकते.

फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास Samsung Galaxy F13 स्मार्टफोनमध्ये Exynos 850 प्रोसेसर, ५० मेगापिक्सेल वाइड, ५ मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड, २ मेगापिक्सेल डेप्थ सेन्सरसह ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप असू शकतो. फोनमध्ये ८ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा असण्याची शक्यता आहे. दक्षिण कोरियाच्या कंपनीने खुलासा केला आहे की हा फोन फुलएचडी + एलसीडी स्क्रीन, ६००० mAh बॅटरी आणि १५ W चार्जिंगसह लॉंच केला जाऊ शकतो.

आणखी वाचा : Gmail मध्ये साइन इन होत नाही? तुमचं Account कसं कराल रिकव्हर, पाहा सोपी प्रोसेस

४. Poco F4 5G

Poco F4 5G पुढील आठवड्यात होणार्‍या सर्वात मोठ्या लॉंचपैकी एक आहे. हा स्मार्टफोन भारतासह अनेक बाजारपेठांमध्ये लॉंच केला जाईल. २३ जून रोजी YouTube वर लाइव्ह स्ट्रीम इव्हेंटमध्ये फोनचे सादरीकरण केले जाईल. लाईव्ह इव्हेंटचे थेट प्रसारण IST संध्याकाळी ५.३० वाजता सुरू होईल.

टीझर्स आणि लीक झालेल्या रिपोर्ट्सनुसार, Poco F3 5G चा हा अपग्रेड केलेला व्हेरिएंट Remi K40S ची रीब्रँडेड वर्जन असेल. पण त्याच्या प्रायमरी रिअर कॅमेऱ्यात फरक असेल. फोनच्या महत्त्वाच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 870 प्रोसेसर, डॉल्बी व्हिजनसह ६.६७ इंच फुलएचडी + १२० Hz AMOLED डिस्प्ले असू शकतो. Dolby Atmos आणि ६७ W फास्ट चार्जिंगसह ड्युअल स्टीरिओ स्पीकर फोनमध्ये उपलब्ध असतील.

VC लिक्विड कूलिंग  टेक्नोलॉजी, ६४ MP प्रायमरी कॅमेरा, ८ मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड, २ मेगापिक्सेल मॅक्रो सेन्सरसह ट्रिपल रिअर कॅमेऱ्यांसह डिव्हाइस लॉंच केले जाऊ शकते. फोनमध्ये २० मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा असण्याची शक्यता आहे. याशिवाय हँडसेटमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर, IR ब्लास्टर, IP 53 रेटिंग आणि ४५०० mAh बॅटरी दिली जाईल.

५. Poco X4 GT

Poco X4 GT स्मार्टफोन देखील २३ जून रोजी Poco F4 5G सोबत लॉंच केला जाईल. नवीन Poco फोन Redmi Note 11T Pro ची थोडी सुधारित वर्जन असेल. यात MediaTek Dimensity 8100 प्रोसेसर, ६.६ इंच १२० Hz LCD स्क्रीन, ६४ मेगापिक्सेल प्रायमरी, ८ मेगापिक्सेल आणि २ मेगापिक्सेल सेन्सर्ससह ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. याशिवाय, फोनमध्ये २० मेगापिक्सलचा सेल्फी सेन्सर असण्याची शक्यता आहे. फोनमध्ये ५०८० mAh बॅटरी असेल जी ६७ W फास्ट चार्जिंगसह येईल.

Poco X4 GT भारतात रिलीज होण्याची अपेक्षा नाही. हा फोन देशात Redmi K50i नावाने आणला जाऊ शकतो.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Smartphones launch in india next week tecno pova 3 realme c30 samsung galaxy f13 poco f4 5g poco x4 gt specifications details prp
First published on: 18-06-2022 at 21:39 IST