snapchat now also available on microsoft store learn how to use it | Loksatta

Snapchat वापरकर्त्यांसाठी खुशखबर! Snapchat आता PC वरही उपलब्ध; जाणून घ्या कसा करणार वापर

स्नॅपचॅटला मिळणारा वाढता प्रतिसाद बघता कंपनीने भारतातील बाजारपेठेत आपलं लक्ष केंद्रित केलं आहे

Snapchat वापरकर्त्यांसाठी खुशखबर! Snapchat आता PC वरही उपलब्ध; जाणून घ्या कसा करणार वापर
सध्या तरुणाईला स्नॅपचॅट या अ‍ॅपने चांगलीच भुरळ घातली आहे. (Photo : Freepik)

सध्या तरुणाईला स्नॅपचॅट या अ‍ॅपने चांगलीच भुरळ घातली आहे. या अ‍ॅपमध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या फिल्टरमुळे त्याची लोकप्रियता आणखी वाढतं आहे. शिवाय प्रत्येकाला आता फोटो काढण्यासाठी स्नॅपचॅटमधील फिल्टरचा मोह आवरता येत नाही. अशातच या कंपनीने स्नॅपचॅट वापरकर्त्यांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. ती म्हणजे अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर स्नॅपचॅट आता Microsoft Store वर देखील उपलब्ध झाले आहे. त्यामुळे आता हे अ‍ॅप मोबाइलप्रमाणे पीसीवर देखील वापरता येणार आहे.

हेही वाचा- मस्तच! आता व्हॉट्सअ‍ॅपमध्ये स्वत:लाच पाठवता येईल मेसेज, तयार करता येईल नोट्स, ‘असे’ वापरा नवीन फीचर

Microsoft Store हे केवळ Windows PC वर चालणारे अ‍ॅप्स ठेवतं. मात्र, आता स्नॅपचॅट देखील Microsoft Store वर आल्याने मोबाईलच्या तुलनेत पीसीवर जास्त वेळ घालवणाऱ्यांसाठी ते वापरणं सोयीस्कर ठरणार आहे. मायक्रोसॉफ्ट स्टोअरवरील स्नॅपचॅट हे एक प्रोग्रेसिव्ह वेब अ‍ॅप(PWA ) असणार आहे. त्यामुळे तुम्हाला ज्यावेळी हे अ‍ॅप पीसीवर उघडायचे असेल त्यावेळी वेब ब्राउझरची आवश्यकता भासणार आहे. तसंच स्नॅपचॅटची ही सेवा विंडोज 10 किंवा विंडोज 11 या पीसींवर उपलब्ध असून Microsoft Edge ब्राउझरद्वारेही तुम्हाला स्नॅपचॅटचा अक्सेस मिळणार आहे.

Snapchat बाबत आणखी अधिकची माहिती Microsoft Store देण्यात आली आहे. तर Microsoft Store वरील माहितीनुसार स्नॅपचॅटची पीसीवरील सेवा ८ नोव्हेंबर रोजी सुरु झाली असून ती सध्या फक्त इंग्रजीला सपोर्ट करत आहे. तसंच हे अ‍ॅप सध्या 1.4 MB चे आहे. तर स्नॅपचॅट मायक्रोसॉफ्ट स्टोअरच्या तपशीलानुसार तुमच्या इंटरनेट कनेक्शनमध्येही प्रवेश करू शकते.

हेही वाचा- iphone आणि Android युजर्ससाठी मोठी बातमी! एलॉन मस्क बनवणार Smartphone, जाणून घ्या सविस्तर प्लान

स्नॅपचॅटचा इंटरफेस हा व्हाट्सअ‍ॅप आणि इंस्टाग्रामसारखा असून इतर अॅप्सप्रमाणे या अ‍ॅपमध्येही तुम्हाला चॅटींग, व्हिडीओकॉलसह फोटो पाठविण्याचा पर्याय उपलब्ध असणार आहे. तसंच तुम्ही तुमच्या Microsoft अकाउंटमध्ये साइन इन केल्यानंतर तुम्ही 10 Windows वर PWA इंस्टॉल करू शकणार आहात.

स्नॅपचॅटने सुरु केली Snapchat+ सेवा –

हेही वाचा- Tips To Reduce Electricity Bill: मस्तच! वीजबिल येईल कमी; ताबडतोब घरात बसवा ‘हे’ डिव्हाइस

स्नॅपचॅटला मिळणारा वाढता प्रतिसाद बघता कंपनीने भारतातील बाजारपेठेत आपलं लक्ष केंद्रित केलं आहे. शिवाय वाढत्या लोकप्रियतेच्या पार्श्वभूमीवर कंपनीने Snapchat+ नावाची सशुल्क सेवा देखील सुरु केली आहे. ती भारतासह इतर अनेक देशांमध्ये उपलब्ध आहे. तर Snapchat+ हे Snapchat सारखेच असले तरीदेखील मोफत वापरकर्त्यांपेक्षा पैसे देऊन हे अॅप वापरणाऱ्यांसाठी कंपनीकडून अधिकचे फायदे आणि आकर्षक सेवा देण्यात येत आहे.

महिन्याला मोजावे लागणाप ४९ रुपये –

सशुल्क स्नॅपचॅटचे सबस्क्रिप्शन घेण्यासाठी भारतामधील वापरकर्त्यांना सध्या एका महिन्यासाठी ४९ रुपये मोजावे लागत आहेत. दरम्यान, जे ग्राहक महिन्याला पैसे भरुन स्नॅपचॅट वापरणार आहेत त्यांना मोफत स्नॅपचॅट वापरणाऱ्यांच्या तुलनेत अधिकची आणि भन्नाट फिचर्स दिली जाणार आहेत.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-11-2022 at 18:57 IST
Next Story
‘CHARACTER LIMIT’ १ हजार असावी, युजरने सूचवलेल्या पर्यायावर मस्क म्हणाले, त्यावर..