व्हाट्सअ‍ॅप हे एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. व्हाट्सअ‍ॅप हे मेटाच्या मालकीचे आहे. यावरून आपण एकमेकांशी संवाद साधू शकतो.व्हाट्सअ‍ॅप ने गेल्या महिन्यातील वापरकर्त्यांच्या सुरक्षेसंदर्भात महिन्याचा रिपोर्ट जाहीर केला आहे. यामध्ये व्हाट्सअ‍ॅपने तब्बल २९ लाख इतकी भारतीयांची व्हाट्सअ‍ॅप अकाउंट्स बॅन केली आहेत. १ जानेवारी ते ३१ जानेवारी दरम्यान अशी १०,२९,००० अकाउंट्स होती जी भारत सरकार आणि कंपनीने व्हाट्सअ‍ॅपच्या नियम मोडल्यामुळे बॅन केली होती. तुम्ही सुद्धा जर का चुकीच्या कामांसाठी व्हाट्सअ‍ॅपचा वापर करत असाल तर तुमच्या अकाउंटवर देखील अशी कारवाई होऊ शकते.

प्रत्येक महिन्यामध्ये व्हाट्सअ‍ॅप वापरकर्ते अनेक अकाउंट्सबद्दल तक्रार करत असतात. व्हाट्सअ‍ॅप त्याची सत्यता तपासत असते व त्यामध्ये तक्रारीत तथ्य आढळल्यास व्हाट्सअ‍ॅप ते अकाउंट बॅन किंवा कायमस्वरूपी ब्लॉक करत असते. जगभरात २ अब्जापेक्षा जास्त लोकं व्हाट्सअ‍ॅपचा वापर करतात. म्हणून हा प्लॅटफॉर्म अधिक कसा सुरक्षित करता येईल यासाठी व्हाट्सअ‍ॅप अशा प्रकारची पावले उचलत असते.

More than average rainfall this year Know the weather forecast of monsoon rains
Monsoon Season Update : यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस… जाणून घ्या मोसमी पावसाचा हवामान विभागाचा अंदाज
Is this waitress serving at a restaurant in China robot or human Find out
भारताला ‘कॅन्सर कॅपिटल ऑफ द वर्ल्ड’ का म्हटले जाते? तज्ज्ञांकडून जाणून घ्या कारण…
Hero Pleasure Plus Xtec Sports launch
Activa, Jupiter समोर तगडं आव्हान; ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह देशात आली हिरोची नवी स्कूटर, ८० हजारांहून कमी किंमत
monsoon forecast in india
बळीराजासाठी आनंदाची बातमी; भारतात यंदा सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज!

हेही वाचा : मोठी बातमी! माजी सीईओच देत आहेत Twitter ला टक्कर; जॅक डोर्सीने लॉन्च केले Bluesky अ‍ॅप, वाचा सविस्तर

सोशल मीडिया हा आपल्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा भाग बनला आहे. सोशल मीडियावर आपण दिवसातील बराचसा वेळ घालवतो. फेसबुक, इंस्टाग्राम , ट्विटर आणि व्हाट्सअ‍ॅप वर घालवत असतो. मात्र सोशल मीडियावर आपले अकाउंट आणि इतर गोष्टी सुरक्षित राहाव्यात म्हणून सरकार नवीन नियम आणत असते.

केंद्रीय आयटी मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी मंगळवारी एक (तक्रार अपील समिती) Grievance Appeal Committee ची स्थापना केल्याची घोषणा केली आहे. ही कमिटी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे घेण्यात आलेल्या निर्णयांविरुद्ध वापरकर्त्यांनी केलेल्या तक्रारींची तपासणी करणार आहे. मंत्री चंद्रशेखर यांनी सांगितले की, हे एक डिजिटल प्लॅटफॉर्म असून, ज्याला तक्रार अपील समिती (GAC) असे नाव देण्यात आले आहे. हे एक शक्तिशाली साधन म्हणून काम करणार आहे.