मेटा म्हणजे फेसबुक हे सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्मपैकी एक आहे. फेसबुकवरही यूजर्स खूप सक्रिय असतात. अशा परिस्थितीत, युजर्सना अधिक सुविधा देण्यासाठी आणि त्यांचा डेटा सुरक्षित करण्यासाठी फेसबूक आणखी नवीन सुविधा देत आहे. मात्र असं असतानाही फसवणूक करणारे युजर्सचा डेटा चोरण्यासाठी विविध युक्त्या वापरताना दिसून येत आहेत. आपल्या फेसबुक अकाउंटमध्ये अनेक प्रकारचा डेटा जमा होत असतो. म्हणूनच तुमचा डेटा सुरक्षित करणं जितकं महत्त्वाचं आहे तितकंच तुमचे Facebook खातं सुरक्षित करणं देखील महत्त्वाचं आहे. कधी कधी आपण अनेक ठिकाणी आपले फेसबुक अकाउंट लॉग इन करतो आणि लॉगआउट करायला विसरतो. अशा परिस्थितीत कोणीतरी याचाच फायदा घेऊ शकतो. पण फेसबुक आपल्या युजर्सना एक सुविधा देत आहे, ज्यात तुम्ही तुमचं खातं कोणत्या ठिकाणाहून वापरलं जात आहे, हे जाणून घेऊ शकता. चला जाणून घेऊया कसं ते…

optical illusion
Optical Illusion : फोटोमध्ये कॅसेट्स दिसताहेत का? पण त्या कॅसेट्स नव्हे! फोटो एकदा नीट क्लिक करून पाहा
Viral Video elderly woman teach you how to make fresh fruit juice without the help of any electrical appliances
VIDEO: उन्हाळ्यात कलिंगडाचे थंडगार सरबत कसे बनवाल? ‘हा’ पाहा आजीबाईंचा उपाय; कोणत्याही इलेक्ट्रिक वस्तूची गरज नाही
watch jugaad viral video
बजाजवाल्यांनी कधी विचारही केला नसेल की स्कुटरचा असा होईल उपयोग, जुगाड पाहून तुम्हीही व्हाल अवाक्, पाहा व्हिडीओ
how to remove car dent at home
धडाsssम! गाडीला बसली धडक… आता डेन्ट कसा काढणार? एक रुपयाही होणार नाही खर्च, पाहा ही जादू

तुमच्या फेसबुक अकाउंटची अ‍ॅक्टिव्हिटी कशी तपासायची ?
सर्व प्रथम तुम्हाला तुमच्या फोनवर फेसबुक अॅप्लिकेशन उघडावं लागेल. यानंतर तुम्हाला उजव्या बाजूला तीन ओळींचा आयकॉन दिसेल, त्यावर क्लिक करा. त्यानंतर सेटिंग बटणावर क्लिक करा. आता तुम्हाला सर्च बटणाचा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.

येथे Activity Log लिहा आणि सर्च करा. इथे तळाशी, तुम्हाला अनेक पर्याय दिसतील जसं की, Login Log outs, Active sessions, search history इ.

आणखी वाचा : Instagram ने लॉंच केलं नवं फिचर, आता प्रोफाइलची लिंक एम्बेड करता येणार

येथे तुम्ही Active Session पर्यायावर जाऊन तुमचं खातं सध्या कुठे वापरलं जात आहे ते शोधू शकता.

याशिवाय, लॉगिन, लॉग आउट या पर्यायामध्ये तुमचं खातं कधी आणि कुठे उघडलं आहे हे कळेल? ठिकाणासोबतच तुमचे खातं मोबाईल की लॅपटॉपवरून उघडले आहे हे देखील कळेल.

आणखी वाचा : Amazon वर जबरदस्त डील! वर्षाच्या अखेरच्या सेलमध्ये स्वस्तात मोबाईल खेरदी करण्याची संधी

तुमचे खाते अशा प्रकारे सुरक्षित करा
तुम्हाला कोणतीही अनोळखी अ‍ॅक्टिव्हिटी दिसली, तर ती ताबडतोब काढून टाका, तुमच्या खात्याचा पासवर्ड बदला आणि इतर सर्व ठिकाणांहून खाते लॉगआउट करण्याची आज्ञा द्या. यानंतर तुमचे खाते इतर सर्व डिवाइसवरून लॉग आउट केले जाईल.