प्रत्येकाची इच्छा असते की आपण एकदातरी विमान प्रवास करावा. मात्र कधी कधी तिकीट दर जास्त असल्यामुळे आपल्याला ते शक्य होत नाही. मात्र आता ट्रेनच्या तिकिटापेक्षा विमानाचे तिकीट स्वस्त झाले आहे. टाटा समूहाच्या मालकीची असणारी विस्तारा एअरलाईन्स आपला ८ वा वर्धापन दिन साजरा करत आहे. वर्धापनदिनानिमित्त विस्तारा एअरलाईन्सने आपल्या ग्राहकांसाठी खास ऑफर आणली आहे.

या ऑफरमध्ये ग्राहकांना विमानाचे बुकिंग आणि अतिरिक्त लगेजवर २३ टक्के सूट देण्यात येणार आहे. इकॉनॉमी क्लाससाठी देशांतर्गत विमानाचे तिकीट हे १८९९ रुपयांपासून सुरु होते. बिझनेस क्लाससाठी ६,९९९रुपये आणि प्रीमियम इकॉनॉमी क्लासमध्ये तुम्ही २,६९९ रुपयांत तुमचे तिकीट मिळवू शकता. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी इकॉनॉमी क्लास १३,२९९ रुपये, प्रीमियम इकॉनॉमी क्लासमध्ये १६,७९९ रुपये आणि बिझनेस क्लासचे तिकीट हे ४३,६९९ रुपये इतके आहे.

india demand of land marathi news
कार्यालयीन जागांच्या मागणीत ४३ टक्के वाढ, पहिल्या तिमाहीत १.६२ कोटी चौरस फुटांचे व्यवहार; बंगळूरुचा सर्वाधिक वाटा
pilots missing What happened to Vistara
३८ हून अधिक उड्डाणे रद्द, तासभराचा उशीर, वैमानिक गायब; ‘विस्तारा’चं काय बिनसलं?
indigrid cio meghana pandit talks about future Investment flow in invit
‘इन्व्हिट्स’मध्ये गुंतवणूक ओघ वाढत जाणार ! इंडिया ग्रिड ट्रस्टच्या मुख्य गुंतवणूक अधिकारी पंडित यांचे प्रतिपादन  
mutual funds
SEBI ने म्युच्युअल फंडांना विदेशी ETF मध्ये गुंतवणूक करण्यापासून रोखले, आता नवे पर्याय काय?

हेही वाचा : CES 2023: L’Oreal कंपनीने लाँच केले ‘हे’ नवीन मेकअप अ‍ॅप्लिकेशन

तिकिटांचे बुकिंग कुठे कराल ?

तुम्ही तुमचे तिकीट एअरलाईन्सच्या अधिकृत वेबसाईटवर बुक करू शकता. तसेच विमानतळावरील ऑफिसमध्ये सुद्धा तुम्हाला तिकीट बुक करता येणार आहे. तिकीट बुकिंगसाठी तुम्ही कॉल सेंटरद्वारे त्यांच्याशी संपर्क साधू शकता. बुकिंग करण्याची अंतिम तारीख ही १२ जानेवारी असणार आहे.या बुकिंगसाठी कोणतेही व्हाउचर उपयोगी येणार नाही. या ऑफरमध्ये मर्यादित जागा उपलब्ध असणार आहेत.