scorecardresearch

जगभरात भारताचा डंका! टाटा बनवणार Apple चे मोबाईल

ब्लूमबर्गच्या अहवालानुसार टाटा हे अधिग्रहण यावर्षीच्या मार्चपर्यंत बंद करण्याची योजना आखत आहे.

जगभरात भारताचा डंका! टाटा बनवणार Apple चे मोबाईल
Apple- संग्रहित छायाचित्र / लोकसत्ता

कर्नाटकमधील तैवान आधारित विस्ट्रॉनच्या उत्पादन सुविधेवर टाटा समूहाने लक्ष ठेवले आहे. ही उत्पादन सुविधा अनेक महिन्यांपासून iPhones असेंबल करते.ब्लूमबर्गच्या अहवालानुसार टाटा हे अधिग्रहण यावर्षीच्या मार्चपर्यंत बंद करण्याची योजना आखत आहे. गेल्या वर्षीपासून कर्नाटकमधील आयफोन उत्पादन प्रकल्प विकत घेण्यासाठी भारतीय समूह विस्ट्रॉनशी चर्चा करत आहे. परंतु आता टाटा समूह या उपक्रमातील बहुसंख्य भागधारक असल्याने भारतातील तैवान उत्पादन कंपनीचे कर्नाटकमधील प्लँट विकत घेणार आहे.

टाटा समूह कर्नाटकमधील ४४ एकर जागेतील उत्पादन सुविधेतील कामाची देखरेख करेल ज्यात ८ आयफोन उत्पादन लाईन्स असून तिथे १०,००० कामगारांना रोजगार मिळाला आहे. दरम्यान, विस्ट्रॉन हाय्यक भागीदार म्हणून काम करेल आणि देशात Apple साठी सेवा भागीदार म्हणून काम करणार आहे.

हेही वाचा : प्रतीक्षा संपली! भारतात आजपासून Redmi Note 12 5G ची विक्री सुरु; जाणून घ्या खासियत

ही योजना मार्चअखेरपर्यंत पूर्ण करण्याचा टाटा समूहाचा प्रयत्न आहे. एकदा ही योजना पूर्ण झाली की, टाटा इलेक्ट्रॉनिक्स प्रा.लिमिटेड औपचारिकपणे भारतात विस्ट्रॉनची जवाबदारी स्वीकारणार आहे. यामुळे टाटाला सरकारकडून प्रोत्साहन मिळेल. जर तैवानच्या करार उत्पादकाने प्रोत्साहनासाठी सरकारच्या गरजा पूर्ण केल्या तर, संपादनाची किंमत ५,००० कोटींपेक्षा जास्त असू शकते.

अमेरिकेतील राजकीय तणाव आणि कोविड-संबंधित अडथळ्यांमुळे धोक्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक्समधील चीनच्या वर्चस्वाला आव्हान देण्यासाठी स्थानिक स्पर्धक तयार करण्याच्या भारताच्या प्रयत्नांना टाटाचा करार पुढे नेईल. तैवानच्या कंपनीने चालू आर्थिक वर्षासाठी अपेक्षित प्रोत्साहने प्राप्त करण्यासाठी आवश्यक असलेली आवश्यकता पूर्ण केल्यास विस्ट्रॉनच्या भारतातील एकमेव आयफोन उत्पादन ऑपरेशनचे मूल्य ६०० दशलक्षपेक्षा जास्त असू शकते.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 11-01-2023 at 17:29 IST

संबंधित बातम्या