Tata will manufacture semiconductor in india : अनेक व्यवसाय जसे, कार निर्मिती, हॉटेल, स्टिल निर्मितीसह इत्यादी क्षेत्रांमध्ये पाय रोवून बसलेले आणि यशस्वीरित्या हे व्यवसाय हातळणारे टाटा ग्रुप आता आणखी एक उत्पादन तयार करणार आहे. अलीकडे या उत्पादनाची जगात कमतरता असल्याने त्याचा फटका ऑटो सेक्टरसह अनेक क्षेत्राला बसला आहे.

टाटा ग्रुप काही वर्षांत भारतात सेमिकंडक्टर तयार करणार, असे टाटा सन्सचे चेअरमन नटराजन चंद्रशेखरन यांनी ८ डिसेंबरला निक्की एशियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. टाटाची ही वाटचाल भारताला जागतिक चिप पुरवठा साखळीचा एक महत्वाचा भाग बनवू शकते, जी अजूनही कोविडमुळे आलेल्या व्यत्ययातून अद्याप पूर्णपणे सावरलेली नाही.

Aamir Khan announcement that Pani Foundation will implement group farming experiment in the state pune news
पाणी फाउंडेशन राज्यात गटशेतीचा प्रयोग राबवविणार; आमिर खान यांची घोषणा
Maha Metro, Nagpur, decrease, Metro fare, 33 percent, March 1 2024,
नागपूरकरांसाठी गुड न्यूज, मेट्रोचा प्रवास होणार स्वस्त
mpsc exam preparation guidance mpsc exam preparation tips
MPSC मंत्र : भूगोल मूलभूत अभ्यास
Analysis of adulterated food will be expedited report will be available within 14 days
भेसळयुक्त खाद्यपदार्थांचे विश्लेषण वेगात होणार, १४ दिवसांमध्ये मिळणार अहवाल

(REALME 10 Pro + 5G आणि REALME 10 Pro 5G भारतात लाँच; 108 एमपी कॅमेरा, फास्ट चार्जिंग; काय आहे किंमत? जाणून घ्या)

इलेक्ट्रिक वाहनांसारख्या उद्योन्मुख क्षेत्रात नवीन व्यवसाय सुरू करण्याची कंपनीची योजना आहे, असे चंद्रशेखरन यांनी मुलाखतीत म्हटले. आम्ही टाटा इलेक्ट्रॉनिक्सचे निर्माण केले आहे. त्या अंतर्गत सेमिकंडक्टर असेंबली टेस्टिंगचा व्यवसाय सुरू करू. आम्ही अनेकांशी चर्चा करू, असे चंद्रशेखरन म्हणाले, ज्यावरून विद्यमान चिप निर्मात्यांबरोबर भागीदारीची शक्यता उद्भवली आहे.

चंद्रशेखर यांनी भूतकाळातही सेमीकंडक्टर उत्पादनात उतरण्याची समुहाची इच्छा व्यक्त केली आहे. टाटा अपस्ट्रिम चीप फॅब्रिकेशन प्लाटफॉर्म लाँच करण्याबाबत विचार करेल, असेही चंद्रशेखरण म्हणाले.

(कमी टायपिंग स्पीडमुळं काम अडलय? करा ‘हा’ उपाय, वेळेची होईल बचत)

सेमीकंडक्टर निर्मिती ज्यामध्ये चिपसेट बनवले जाते त्यासाठी मोठ्या गुंतवणुकीची आवश्यकता असते. पुढील पाच वर्षांमध्ये ९० अब्ज गुंतवणूक करण्याची योजना असल्याचे चंद्रशेखरण यांनी निक्की एशियाला सांगितले.

या वर्षीच्या सुरुवातील चंद्रशेखर यांनी आयएमसी चेंबर ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्री एजीएम येथे बोलताना भारतासाठी मोठी संधी असल्याचे म्हटले होते. कोविड महामारी आणि भू राजकीय बदलानंतर चीनवर अवलंबून असणाऱ्या जागतिक पुरवठा साखळीतील बदलांमुळे व्यवसाय इतर देशांवर अवलंबून राहातील आणि ही भारतासाठी मोठी संधी असेल, चंद्रशेखर म्हणाले होते.