Tech Tips: ‘ब्लू टिक’ बंद न करता गुपचूप वाचा कोणताही WhatsApp मेसेज; पाठवणाऱ्यालाही लागणार नाही पत्ता

आज आपण अशा ट्रिकबद्दल जाणून घेणार आहोत ज्याद्वारे तुम्ही तुमच्या फोनवरील व्हॉट्सअ‍ॅप मेसेज गुपचूप वाचू शकाल आणि समोरच्या व्यक्तीला ते कळणारही नाही.

Tech Tips: ‘ब्लू टिक’ बंद न करता गुपचूप वाचा कोणताही WhatsApp मेसेज; पाठवणाऱ्यालाही लागणार नाही पत्ता
आज आपण व्हॉट्सअ‍ॅपशी निगडित एक अतिशय रंजक ट्रिक जाणून घेणार आहोत. (File Photo)

इंटरनेट आणि सतत विकसित होत असलेल्या तंत्रज्ञानाच्या या युगात, एकमेकांशी जोडलेले राहणे खूप सोपे झाले आहे. आज आपल्याकडे अशी अनेक अ‍ॅप्स आहेत जी आपण चॅटिंग आणि व्हॉईस-व्हिडीओ कॉलिंगसाठी वापरतो. या अ‍ॅप्समधील एक नाव जे प्रत्येकाच्या मनात येईल ते म्हणजे व्हॉट्सअ‍ॅप. तुम्हीही नक्कीच व्हॉट्सअ‍ॅपवर चॅट करत असाल. आज आपण व्हॉट्सअ‍ॅपशी निगडित एक अतिशय रंजक ट्रिक जाणून घेणार आहोत.

तसे, आपण व्हॉट्सअ‍ॅपवर अनेक फीचर्स वापरतो. पण प्रामुख्याने अ‍ॅपचा वापर चॅटिंगसाठी केला जातो. आज आपण अशा ट्रिकबद्दल जाणून घेणार आहोत ज्याद्वारे तुम्ही तुमच्या फोनवरील व्हॉट्सअ‍ॅप मेसेज गुपचूप वाचू शकाल आणि समोरच्या व्यक्तीला ते कळणारही नाही. विशेष म्हणजे व्हॉट्सअ‍ॅप रीड रिसिप्ट किंवा ब्लु टिक्स बंद करताही आपल्याला हे मेसेजेस वाचता येणार आहेत.

युजर्सची सुरक्षा वाढवण्यासाठी Whatsapp ने उचलले महत्त्वाचे पाऊल; ‘हे’ नवे फीचर करणार मदत

कोणतीही ट्रिक न करता कोणालाही न कळवता संदेश कसा वाचता येईल, हे आपण जाणून घेणार आहोत. सामान्यतः व्हॉट्सअ‍ॅप रीडिंग रिसीप्ट्स बंद करण्याचा पर्याय असतो जेणेकरून तुम्ही मेसेज पाहता तेव्हा तुमच्या मेसेजजवळील ‘डबल टिक्स’ निळ्या होत नाहीत. पण जर तुम्ही रीडिंग रिसीट्स बंद केले तर तुम्हाला इतर कोणाच्या मेसेजवर ब्लू टिक दिसत नाहीत.

सर्वप्रथम, तुमच्या स्मार्टफोनवर व्हॉट्सअ‍ॅप ओपन करा, त्यानंतर तुम्हाला जो मेसेज गुपचूप वाचायचा आहे तो ओपन करण्यापूर्वी स्मार्टफोनचा फ्लाइट मोड चालू करा. त्यानंतर तो मेसेज ओपन करून वाचा, त्यानंतर अ‍ॅप बंद करा. फ्लाइट मोडमधून फोन काढून टाकण्यापूर्वी, मल्टी टॅबमधून देखील व्हॉट्सअ‍ॅप काढण्यास विसरू नका. आता फोनचा फ्लाइट मोड बंद करा. अशाप्रकारे मेसेज वाचल्यानंतरही समोरच्या व्यक्तीच्या मेसेजवर निळ्या रंगाची टिक होणार नाही आणि तुम्ही गुपचूप मेसेज सहज वाचू शकता.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
Samsung चे लाख रुपयांचे महागडे स्मार्टफोन खरेदी करण्याची सुवर्णसंधी, ३०४२ रुपयांत घरपोच मिळणार
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी