व्हॉट्सॲप आपल्या आयुष्यातील एक महत्वाचा हिस्सा बनला आहे. कारण, व्हॉट्सॲपमुळे आपणाला कोणतीही अपडेट काही क्षणात मिळते. शिवाय, मित्र मैत्रीणींशी संवाद साधायला तरुणाई सर्वाधिक प्राधान्य व्हॉट्सॲपलाच देते. शिवाय एखाद्या कार्यक्रमाचं निमंत्रण, ऑफिसमधील कामाबाबतच्या, मुलांच्या शाळेतील काही सूचना असतील तर त्या देखील आता व्हॉट्सॲपवरच कळवल्या जातात. व्हॉट्सॲप वापरकर्त्यांसाठी एक नवं आणि भन्नाट फीचर कंपनीकडून देण्यात आलं आहे. या फीचरमुळे तुम्हाला एकाच वेळी जवळपास अनेक लोकांना मेसेज पाठवता येणार आहे.

एका क्लिकमध्ये ‘इतक्या’ लोकांना पाठवा मेसेज –

How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
heavy traffic jam for two hours in dombivli
डोंबिवली दोन तासांपासून अभूतपूर्व वाहतूक कोंडीत; रविवारी खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना फटका
Indian youth abroad
भारतीय तरुणांना परदेशात डांबून ठेवणाऱ्यांना अटक
Garbage picker to video journalist Maya Khodve Journey
कचरा वेचक ते व्हिडिओ जर्नलिस्ट! माया खोडवे यांच्या जिद्दीचा प्रवास

आणखी वाचा- संगणक, लॅपटॉपची गती कमी झाली? डिलीट करा ‘हा’ डेटा, कार्यक्षमता वाढण्यास होईल मदत

आतापर्यंत व्हॉट्सॲपवर एकाचवेळी अनेक लोकांना मेसेज पाठवण्यासाठीच्या काही मर्यादा होत्या. पण आता व्हॉट्सॲपने आणलेल्या कम्युनिटी फीचरमुळे या मर्यादा संपुष्टात आल्या आहेत. कम्युनिटी फीचरमुळे तुम्हाला एकावेळी ५० ग्रुप एकत्र जोडता येणार आहेत. तर जवळपास ५००० व्हॉट्सॲप वापरकर्त्यांना तुम्ही कम्युनिटीमध्ये जोडू शकणार आहात, ते पण केवळ एका क्लिकमध्ये. व्हॉट्सॲपने आणलेल्या या नव्या कम्युनिटी फीचर कसं वापारायचं जाणून घेऊयात.

नव्या फीचरचा ‘असा’ करा वापर

सर्वात आधी तुम्हाला व्हॉट्सॲप उघडावं लागेल, त्यानंतर चॅटलिस्टच्या शेजारी कम्युनिटीचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर कम्युनिटीचे नाव, डिस्क्रिप्शन आणि तुम्ही बनवत असलेल्या कम्युनिटीसाठी योग्य असा फोटो निवडा. महत्वाचं म्हणजे कम्युनिटीला जे नाव देणार आहात ते केवळ २४ अक्षरांचं असावे याची काळजी घ्या.

दरम्यान, तुम्हाला पाहिजे त्या ग्रुपला किंवा लोकांना कम्युनिटीमध्ये अ‍ॅड शकता. पण तुम्ही त्याच ग्रुपमधील सदस्यांना अ‍ॅड करु शकता ज्या ग्रुपचे तुम्ही अ‍ॅडमिन आहात. या फीचरनुसार तुम्ही इतर ग्रुपमधील सदस्यांनाही कम्युनिटीमध्ये येण्यासाठी आमंत्रित करु शकता. पण तुम्ही ज्या ग्रुपला आमंत्रित करणार आहात, त्या ग्रुपच्या अ‍ॅडमिनने तुमची रिक्वेस्ट स्विकारली तरच तुमच्या कम्युनिटीमध्ये त्या ग्रुपचे सदस्य अ‍ॅड होऊ शकतील.

आणखी वाचा- कोणत्याही अ‍ॅपशिवाय QR Code स्कॅन करता येणार; फक्त वापरा ही सोपी ट्रिक

कम्युनिटी फीचरचे ‘असे’ आहेत जबरदस्त फायदे

सदस्य काढण्याचा अ‍ॅडमिनला अधिकार –

नवीन सदस्य अ‍ॅड झाल्यानंतर अ‍ॅडमिन कम्युनिटीमध्ये त्याला हवं त्या सदस्याला काढू देखील शकणार आहे. त्याचबरोबर ग्रुप अ‍ॅडमिनला ग्रुपमधील मेसेज डिलीट करता येणार आहेत. त्यामुळे तुम्हाला जर तुमच्या आवडीच्या लोकांसोबत नवी कम्युनिटी तयार करायची असेल तर लगेच करा व्हॉट्सॲपच्या नव्या फीचरचा आनंद घ्या.

अ‍ॅडमिनला ग्रुप मॅनेज करणे होणार सोपे –

या फीचरचा उद्देश ग्रुप चॅट पूर्वीपेक्षा अधिक चांगला करणे हा आहे. फीचरच्या मदतीने अ‍ॅडमिनला ग्रुप मॅनेज करण्यात खूप मदत होईल. तसेच, याद्वारे तुम्ही एका ग्रुपमध्ये वेगवेगळे ग्रुप ॲड करू शकता. या फीचरची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते वेगवेगळ्या गरजांनुसार वापरलं जाऊ शकणार आहे.

अँड्रॉइड आणि आयएसओ फोन वापरकर्ते वापरू शकणार –

अँड्रॉइड आणि आयओएस फोन वापरकर्ते व्हॉट्सॲपचे हे नवीन फीचर वापरू शकतात. या फीचरच्या माध्यमातून नवीन ग्रुप बनवता येतो तसेच जुना ग्रुप वाढवता येतो. यासह, ग्रुपमध्ये असलेली व्यक्ती त्यांच्या गरजेनुसार ग्रुप बदलू शकते. तसेच, अ‍ॅडमिन ग्रुपच्या सर्व सदस्यांना आवश्यक अपडेट्स किंवा माहिती देऊ शकतो.