Tecno एक मोबाईल उत्पादक कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी कंपनी नवनवीन फीचर्स असलेले मोबाईल लॉन्च करत असते. कंपनीने आपली आणखी एक नवीन सिरीज लॉन्च केली आहे. कंपनीने आपली Tecno Camon 20, Camon 20 Pro आणि Camon 20 Pro 5G हे तीन फोन या सिरीज अंतर्गत लॉन्च केली आहे. या फोनच्या किंमतीबद्दल, फीचर्सबद्दल जाणून घेऊयात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Tecno Camon 20 सिरीजमधील स्मार्टफोनमध्ये वापरकर्त्यांना ६.६७ इंचाचा AMOLED डिस्प्ले मिळतो. ज्याचा ब्राईटनेस हा ५०० नीट्स इतका असू शकतो. फोनमध्ये इनबिल्ट फिंगरप्रिंट सेन्सर आणि IP53 इतके रेटिंग देण्यात आले आहे. तीनही स्मार्टफोनमध्ये MediaTek Helio G85 प्रोसेसरचा सपोर्ट देण्यात आला आहे.

हेही वाचा : ChatGPT अ‍ॅप आयफोनवर कसे वापरायचे? जाणून घ्या ‘या’ सोप्या स्टेप्स

फोटोग्राफीसाठी पहिल्या आणि मधल्या व्हेरिएंटमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आले आहेत. ज्यामध्ये ६४+२+२ मेगापिक्सलचे कॅमेरा मिळतात. टॉप व्हेरिएंटमध्ये ५०+१०८+२ मेगापिक्सलचे कॅमेरे मिळतात. तीनही फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी ३२ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

किंमत

Techno Camon 20 हा स्मार्टफोन कंपनीने ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेजमध्ये लॉन्च केला आहे. त्याची किंमत १४,९९९ रुपये आहे. हा फोन तुम्ही Black , blue आणि Glacier Glow या रंगांमध्ये खरेदी करू शकतात. Camon 20 Pro 5G हा फोन कंपनीने दोन व्हेरिएंटमध्ये लॉन्च केला आहे. ज्यामध्ये ८/१२८ जीबी आणि/२५६ जीबी स्टोरेज येते. बेस मॉडेलची किंमत १९,९९९ रुपये तर टॉप मॉडेलची किंमत २१,९९९ रुपये आहे. हे फोन तुम्ही Serenity Blue आणि Dark Welkin या रंगांमध्ये खरेदी करू शकणार आहेत. Tecno Camon 5G Premier या फोनच्या किंमतीबद्दल कंपनीने खुलासा केलेला नाही आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tecno company launch 3 smartphones under camon 20 series with tripple camera setup and check features and price tmb 01
First published on: 28-05-2023 at 15:21 IST