scorecardresearch

Tecno Festive Carnival: स्मार्टफोन फक्त ५,३०९ रुपयांना, रंग बदलणाऱ्या फोनवरही डिस्काउंट

Tecno Mobile ने देखील सणासुदीच्या निमित्ताने आपल्या स्मार्टफोन्सवर सूट जाहीर केली आहे.

Tecno Festive Carnival: स्मार्टफोन फक्त ५,३०९ रुपयांना, रंग बदलणाऱ्या फोनवरही डिस्काउंट

Tecno Mobile ने देखील सणासुदीच्या निमित्ताने आपल्या स्मार्टफोन्सवर सूट जाहीर केली आहे. अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमध्ये टेक्नो फेस्टिव्ह कॅरिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. या सेलमध्ये Tecno Spark 9, Tecno Spark 8T, Tecno Camon 19 Pro Mondrian Edition स्मार्टफोन सवलतीसह उपलब्ध करून दिले जातील. Amazon वर आयोजित या सेलमध्ये वीकली लकी ड्रॉची देखील संधी असेल.

लकी ड्रॉसाठी यूजर्स टेक्नोच्या वेबसाइट, अॅमेझॉन, प्रिंट जाहिराती, सोशल मीडिया इत्यादी ठिकाणी भेट देऊन प्रमोशनल बॅनरवर प्रदर्शित केलेला QR कोड स्कॅन करून नोंदणी करू शकतात. यानंतर ते टेक्नोच्या अधिकृत व्हॉट्सअॅप खात्यावर रीडायरेक्ट केले जातील. त्यानंतर युजरला टेक्नोच्या अधिकृत व्हॉट्सअॅप नंबर 9355070200 वर हाय पाठवावा लागेल.

टेक्नोच्या मते, टेक्नो फेस्टिव्ह कार्निव्हल २३ सप्टेंबरपासून सुरू होईल आणि ३१ सप्टेंबरपर्यंत चालेल. आम्ही तुम्हाला Amazon वर Techno च्या स्मार्टफोनवर उपलब्ध असलेल्या ऑफर्सबद्दल माहिती सांगणार आहोत…

Tecno Festive Carival: Discount offers on Smartphones
सेलमध्ये Tecno Pop 5 LTE ८०९९ रुपयांऐवजी ५,३०९ रुपयांच्या ऑफरसह खरेदी करता येईल. या स्मार्टफोनमध्ये ८ मेगापिक्सेलचा ड्युअल रियर कॅमेरा आहे.

Tecno Spark 9 चे ४ GB RAM आणि ६४ GB स्टोरेज व्हेरिएंट ११,४९९ रुपयांऐवजी बँक ऑफरसह ७,१९९ रुपयांच्या परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध केले जाईल.

आणखी वाचा : तयार व्हा! Flipkart Big Billion Days Sale 2022 मध्ये मोटोरोला स्मार्टफोन्सवर जबरदस्त ऑफर्स

Tecno Spark 9 मध्ये ७ GB पर्यंत एक्सपांडेबल रॅम, ६.६ इंच HD+ ९० Hz रिफ्रेश रेट डिस्प्ले, १३ मेगापिक्सेल AI ड्युअल कॅमेरा, ५००० mAh बॅटरी आणि Android 12 पॅक आहे.

Tecno Spark 9 चे ६ GB रॅम आणि १२८ GB स्टोरेज व्हेरिएंट ८,५४९ रुपयांना सेलमध्ये उपलब्ध असेल. ही किंमत बँक ऑफर लागू झाल्यानंतर आहे.

Tecno Spark 8T स्मार्टफोन १२,९९९ रूपयांऐवजी बँक ऑफरसह ७,६४९ मध्ये खरेदी केला जाऊ शकतो. Tecno Spark 8T मध्ये ६.६ इंचाचा फुलएचडी + डॉट डिस्प्ले, ५० मेगापिक्सेल ड्युअल रिअर कॅमेरा आणि ५००० mAh बॅटरी आहे.

Tecno Spark 8 Pro बद्दल बोलायचे झाले तर हा फोन १३,४९९ रुपयांऐवजी ८०९९ रुपयांना खरेदी करण्यासाठी उपलब्ध असेल. या स्मार्टफोनमध्ये ४८ मेगापिक्सेल्सचा प्रायमरी रियर सेंसर उपलब्ध आहे.

ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमध्ये TECNO CAMON 19 Pro Mondrian Edition १७,९९९ रूपयांऐवजी १६,७४९ रूपयांमध्ये खरेदी करण्याची संधी आहे. हा फोन कलर चेंजिंग बॅक पॅनल सह येतो आणि यात ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी रियर सेंसर आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या