Tecno Spark 9T अखेर भारतात लॉंच झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून टेक्नोच्या या बजेट फोनबद्दल बातम्या येत होत्या. आता अखेर गुरुवारी नवीन Tecno फोनची घोषणा करण्यात आली. Tecno Spark 9T गेल्या महिन्यात नायजेरियामध्ये लॉंच झाला होता. पण, भारतात लॉंच केलेल्या व्हेरिएंटमध्ये काही फीचर्स भिन्न आहेत. Tecno Spark 9 सीरीजमध्ये येणारा कंपनीचा हा दुसरा फोन आहे, जो या महिन्यात लॉंच झाला होता. यापूर्वी Tecno Spark 9 देशात उपलब्ध करून देण्यात आला होता.

Tecno Spark 9T price
कंपनीने Tecno Spark 9T स्मार्टफोन ९,२९९ रूपयांच्या स्पेशल लॉंचिंग प्राईजमध्ये लॉंच केला आहे. टॉर्क सायन, अटलांटिक ब्लू, आयरिश पर्पल आणि गोल्ड कलरमध्ये फोन घेण्याची संधी आहे. अॅमेझॉन इंडियावर ६ ऑगस्टपासून स्मार्टफोनची विक्री सुरू होणार आहे.

आणखी वाचा : ५० MP कॅमेरा असलेल्या Moto G32 स्मार्टफोनवरून अखेर पडदा उठला, जाणून घ्या किंमत आणि सर्व फीचर्स

Tecno Spark 9T specifications
Tecno Spark 9T मध्ये ६.६ इंचाचा डिस्प्ले आहे. स्क्रीनचे रिझोल्यूशन फुलएचडी + आहे. स्क्रीनवर वॉटरड्रॉप नॉच देण्यात आला आहे. फिंगरप्रिंट सेन्सर स्मार्टफोनच्या काठावर असलेल्या पॉवर बटणामध्ये आढळतो. हँडसेटच्या मागील पॅनलवर क्षैतिज कॅमेरा मॉड्यूल आणि वर्टिकल स्ट्रिप्स दिल्या आहेत.

Tecno Spark 9T मध्ये ६४ GB इनबिल्ट स्टोरेज आहे. स्टोरेज मायक्रोएसडी कार्डद्वारे वाढवता येते. फोनच्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे. हँडसेटमध्ये ५० मेगापिक्सेल प्रायमरी, २ मेगापिक्सेल पोर्ट्रेट आणि मागील बाजूस AI लेन्स आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

आणखी वाचा : Easyfone Marvel+ Review: खास आजी-आजोबांसाठी बनवलाय हा फोन, आपत्कालीन SOS बटणाचं खास फीचर

टेक्नोच्या या बजेट फोनमध्ये MediaTek चा Helio G35 प्रोसेसर आहे. फोनमध्ये ४ GB रॅम व्यतिरिक्त ३ GB व्हर्चुअल रॅम सपोर्ट देण्यात आला आहे. स्मार्टफोनला पॉवर देण्यासाठी ५००० mAh बॅटरी देण्यात आली आहे जी १८ W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हा फोन Android 11 आधारित HiOS 7.6 स्किनसह येतो. कनेक्टिव्हिटीसाठी, ब्लूटूथ, वाय-फाय, जीपीएस, ए-जीपीएस, ३.५ मिमी हेडफोन जॅक यासारखे सर्व फीचर्स प्रदान करण्यात आली आहेत.