टेलीग्राम वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी आहे. माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी सर्वाधिक पसंतीत उतरलेल्या टेलिग्राममध्ये एक महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. टेलिग्रामने आपल्या प्रिमियम ग्राहकांना सुखद धक्का दिला आहे. टेलीग्रामने दर महिन्याला भरावयाच्या सब्सक्रिप्शन फीसमध्ये कपात केली आहे. 

नवीन किंमत

प्रिमियम ग्राहकांना अगोदर महिन्याला ४६९ रूपये भरावे लागत होते त्याऐवजी आता ग्राहकांना १७९ रूपये भरावे लागणार आहेत. TechARC च्या रिपोर्टनुसार जागतिक बाजारात भारतातील ग्राहकांमुळे टेलिग्रामचा फायदा होत असतो. टेकक्रचंने दिलेल्या माहितीनुसार देशात दर महिन्याला १२० मिलीयन भारतीय नागरिक टेलिग्रामचा वापर करतात.

या आकडेवारीनुसार ३२ टक्के लोग टेलिग्राम वर महत्त्वाचे आणि सिक्रेट मेसेज पाठवतात. गेल्या महिन्यात टेलिग्रामने अपने नवीन अपडेट दिले. ज्यामध्ये अनेक नव्या इमोजींचा समावेश होता. वापरकर्त्यांचा या नवीन अपडेट ला भरपूर प्रतिसाद मिळाला.

अपडेटेड फीचर

टेलिग्राम प्रीमियर वापरकर्ते आता अनलिमिटेड इमेजेस स्टेटस या नव्या अपडेटचा आनंद घेऊ शकतात. टेलेग्राम वापरकर्ते आता महत्त्वाचे आणि सिक्रेट मेसेज सोबतच या इमोजिंचा वापर करू शकतात.

टेलिग्राम प्रीमियमची सदस्यता कशी घ्यावी?

  • टेलीग्राम अॅपची नवीनतम आवृत्ती डाउनलोड करा किंवा आपल्याकडे आधीपासूनच असल्यास अॅप अपडेट करा.
  • टेलीग्राम अॅप अँड्रॉइड आणि आयओएस दोन्ही वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे.
  • अॅपच्या तळाशी उजव्या कोपर्यात असलेल्या सेटिंग्ज पर्यायावर टॅप करा.
  • आणखी खाली स्क्रोल करा आणि Telegram Premium पर्यायावर टॅप करा.
  • रु. १७९ रुपयांमध्ये सदस्यत्व घेण्यासाठी पर्यायावर टॅप करा.
  • तुम्हाला पेमेंट करण्यासाठी पुनर्निर्देशित केले जाईल.