Apple iPhone 13, iPhone 14 Price Drop: बाजारात Apple iPhone स्मार्टफोनची वेगळीच क्रेझ आहे. सर्वांची इच्छा असते की, आपल्याकडेही Apple iPhone असावा. मात्र, किमती जास्त असल्यामुळे अनेकजण आयफोन खरेदी करणे टाळतात. पण आता अशा लोकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. नवीन आयफोन लाँच झाल्यानंतर कंपनीने अनेक आयफोनच्या किमती कमी केल्या आहेत. तुम्ही आता स्वस्तात आयफोन खरेदी करू शकता. Apple ने आपल्या नवीन iPhone 15 सीरीज लाँच केल्यानंतर लगेचच आपल्या जुन्या iPhone 13, iPhone 14 आणि iPhone 14 Plus च्या किमतीत कपात केली आहे. चला तर पाहूया किमतीत किती रुपयांनी कपात करण्यात आली आहे. iPhone 14 Plus च्या किमतीत किती रुपयांची कपात? Apple ने अलीकडेच आपल्या iPhone 14 Plus ची किंमत १० टक्क्यांनी कमी केली आहे. आता हा फोन ७९,९०० रुपयांना उपलब्ध आहे, जो आधी ८९,९०० रुपयांना विकला जात होता. Amazon वर या फोनवर आणखी डिस्काउंट दिले जात आहेत. iPhone 14 Plus Amazon वर ७६,९९० रुपयांना उपलब्ध करून दिला जात आहे. याशिवाय, तुम्ही एक्सचेंजवर ₹४०,७५० पर्यंत सूट देखील मिळवू शकता. iPhone 14 च्या किमतीत किती रुपयांची कपात? Apple ने अलीकडेच आपल्या iPhone 14 च्या किमतीत मोठी कपात केली आहे. आता हा फोन ६९,९०० रुपयांना उपलब्ध आहे, जो आधी ७९,९०० रुपयांना विकला जात होता. Amazon वर या फोनवर आणखी डिस्काउंट दिले जात आहेत. iPhone 14 Amazon वर ६५,९९९ रुपयांना उपलब्ध करून दिला जात आहे. याव्यतिरिक्त, तुम्ही ICICI क्रेडिट कार्ड धारकांसाठी Amazon Pay वर नो-कॉस्ट EMI पर्यायाचा लाभ घेऊ शकता. (हे ही वाचा: आपले स्वतःचे WhatsApp चॅनेल कसे तयार करावे? ‘या’ सोप्या ट्रिक्सने होईल झटपट काम) iPhone 13 च्या किमतीत किती रुपयांची कपात? Apple ने आपल्या iPhone 13 च्या किमतीत कपात केली आहे. आता हा फोन ५९,९०० रुपयांना उपलब्ध आहे, जो आधी ६४,९९९ रुपयांना विकला जात होता. Amazon वर या फोनवर आणखी डिस्काउंट दिले जात आहेत. iPhone 13 Amazon वर ५५,९९९ रुपयांना उपलब्ध करून दिला जात आहे. याशिवाय, तुम्ही एक्सचेंजवर ₹४०,७५० पर्यंत सूट देखील मिळवू शकता. iPhone 14 Pro ऑफर कंपनीने iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max बंद केले आहेत. म्हणजेच ते अॅपल स्टोअर किंवा अधिकृत वेबसाइटवरून खरेदी केले जाऊ शकत नाही. पण तरीही ते ईकॉमर्स वेबसाइट Amazon वर खरेदीसाठी उपलब्ध आहे. Amazon वर iPhone 14 Pro वर ९,९०१ रुपयांची सूट दिली जात आहे. आता हा फोन १२९,९०० रुपयांऐवजी ११९,९९९ रुपयांना उपलब्ध आहे. याव्यतिरिक्त, HDFC बँकेचे ग्राहक त्यांचे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरून अतिरिक्त ३,००० रुपये सूट घेऊ शकतात.