scorecardresearch

ChatGpt चा नवा विक्रम, फेसबुक आणि गुगलला मागे टाकत कमी वेळात मिळवले १०० मिलियनहून अधिक यूजर्स

ChatGPT सध्या Google Play Store आणि Apple च्या App Store वर उपलब्ध आहे.

chatgpt- 4 latest news
Chatgpt- (Photo-indianexpress)

ChatGpt हे सध्या खूप चर्चेत असलेला विषय आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स रिसर्च कंपनी OpenAI ने AI आधारित चॅटबॉट ChatGPT सादर केला आहे. हे माध्यम असे आहे की, तुम्ही जे त्याला विचाराल त्याचे त्याच्याकडे असलेल्या माहितीवरुन तो आपल्याला उत्तर देईल. सध्या ते इंग्रजी भाषेवर काम करते. हे भविष्यात इतर भाषांमध्ये जोडले जाऊ शकते. हा चॅटबॉट मशीन लर्निंग आणि GPT-३.५ नावाचे भाषा मॉडेल वापरून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देतो. सध्या हा चॅटबॉट लिखित स्वरूपात प्रश्नांची उत्तरे देतो. आता ‘चॅट जीपीटी’ने जानेवारीमध्ये १०० मिलियन युजर्सचा टप्पा गाठला असून चॅट जीबीटी हे एआय जगातील पहिले असे साधन बनले ज्याने इतक्या कमी वेळात १०० मिलियनचा आकडा गाठला आहे.

महत्वाचे म्हणजे, गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये लाँच झालेल्या ChatGPT ने दोन महिन्यांच्या अल्प कालावधीत ही कामगिरी केली आहे. फेसबुकला चार वर्षे, स्नॅपचॅट आणि मायस्पेस तीन वर्षे, इंस्टाग्राम दोन वर्षे आणि गुगलला १०० दशलक्ष वापरकर्ते पार करण्यासाठी जवळपास एक वर्ष लागले. नवीन विकासामुळे ChatGPT हे इंटरनेट अॅप्लिकेशन्सच्या इतिहासातील सर्वात वेगाने वाढणारे ग्राहक अॅप्लिकेशन बनले आहे.

(हे ही वाचा : कोका-कोला ‘या’ दिवशी देशात लाँच करणार १०८ मेगापिक्सलचा कॅमेरा असलेला स्मार्टफोन, किंमत फक्त…)

चॅटबॉट ३० नोव्हेंबर रोजी सादर करण्यात आला होता. ChatGPT सध्या Google Play Store आणि Apple च्या App Store वर उपलब्ध आहे. या AI आधारित चॅटबॉटच्या मदतीने अनेक प्रकारची कामे सहज करता येतात आणि कोडही लिहिता येतात. चॅटबॉट अनेक प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासही सक्षम आहे. युजर्स सध्या Open AI च्या वेबसाइटवर ChatGPT चॅटबॉटमध्ये प्रवेश करू शकतात. हे GPT-3 API वर आधारित आहे. अँड्रॉईड युजर्स स्मार्टफोनवर इन्स्टॉल केलेल्या ब्राउझरच्या मदतीने हा चॅटबॉट वापरू शकतात.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-02-2023 at 13:06 IST
ताज्या बातम्या