तरुणाईमध्ये आजकाल विविध गडांवर किंवा पठारांवर ट्रेकिंगला जाण्याचा ट्रेंड मोठ्या प्रमाणात सुरु आहे. मात्र, जेव्हा तुम्ही ट्रेकिंगसाठी किंवा काही कामानिमित्ताने ग्रामीण किंवा जंगलाच्या भागात जाता त्यावेळी तुम्हाला फोन करण्यास अडचणी येतात. कारण अशा भागात मोबाईल नेटवर्कची समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवते. त्यामुळे तुम्ही कोणाला कॉल मेसेज करू शकत नाही. त्यामुळे आपली अनेक महत्वाची कामे खोळबंतात. मात्र, तुम्हाला अशा परिस्थितही महत्वाचे फोन करता येऊ शकतात. त्यासाठी मोबाईलपेक्षा कमी किमतीचे एक उपकरण बाजारात उपलब्ध आहे.

उपकरणाचे नाव –

Can eggs help diabetic patient to control blood sugar
मधुमेही व्यक्तींनी अंडी खाल्ल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते का? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात..
Vipreet Rajyog
विपरीत राजयोगामुळे या राशींना मिळेल छप्परफाड पैसा! उघडेल नशिबाचे दार
my portfolio, small cap fund
‘माझा पोर्टफोलियो’ : स्मॉल आणि मिडकॅपमधील अस्थिरतेची झळ, पहिला त्रैमासिक आढावा- २०२४
Before blaming diabetes drugs understand What chemicals are used in medicines
मधुमेहावरल्या औषधांना दोष देण्याआधी समजून तरी घ्या…

जे तुम्हाला ट्रेकिंगला गेल्यावरती उपयोगी पडू शकते. ज्याची किंमत कोणत्याही स्मार्टफोनपेक्षा खूप कमी आहे. आज आम्ही तुम्हाला या उपयोगी उपकरणाबाबत माहिती सांगणार आहोत. Baofeng BF-888S वॉकी टॉकी टू वे रेडिओ 16CH 400-470MHZ लाँग रेंज WT01 वॉकी टॉकी आहे. हे एक खरं तर रेडिओ कम्युनिकेशन डिव्हाइस आहे. या उपकरणाचा वापर करून, तुम्ही ६ किलोमीटरच्या परिसरातील कोणत्याही व्यक्तीशी सहज बोलू शकता. पण त्यासाठी अट एवढीच आहे की तुम्ही ज्या व्यक्तीशी बोलणार आहात त्या व्यक्तीकडेही हा वॉकीटॉकी असायला हवा.

हेही वाचा-थंडीपासून तुमचा बचाव करणारी इलेक्ट्रिक शाल बाजारात उपलब्ध; जाणून घ्या किमंत आणि फीचर्स

मोबाईलपेक्षाही स्वस्त –

हा वॉकीटॉकी फ्लिपकार्टवर सहज उपलब्ध असून तो तुमच्या बजेटमध्ये आहे. जर तुम्ही ते विकत घेण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला खालील सविस्तर माहिती जाणून घ्या. जर या वॉकी-टॉकीच्या किंमतीबद्दल सांगायचं तर ग्राहक फ्लिपकार्टवरून फक्त १,८२९ रुपयांमध्ये खरेदी करू शकता. या उपकरणाची किंमत कोणत्याही स्वस्त स्मार्ट फोनपेक्षा कमी आहे. त्यामुळे तुम्हाला जर ट्रेकिंगची आणि भटकंतीची आवड असेल तर तुमच्यासाठी ही वॉकी-टॉकी अत्यंत फायद्याची असणार आहे.