दुचाकी, कार असो की सिम कार्ड प्रत्येक ठिकाणी हटके क्रमांक असावा असे प्रत्येकांनाच वाटते. अशा आगळ्यावेगळ्या क्रमांकासाठी लोक लाखो रुपये खर्च करतात. तसेच आपला मोबाईल क्रमांकही हटके व व्हीआयपी असावा असेही अनेकांना वाटते. अनेकांना स्वत:साठी व्हीआयपी मोबाईल क्रमांक घ्यायचा असतो. व्हीआयपी मोबाईल क्रमांक किंवा फॅन्सी क्रमांक हे विशेष क्रमांक आहेत, जे सहज लक्षात ठेवता येतात. मात्र, असे आकडे बाजारात सहजासहजी मिळत नाहीत. यासाठी पैसे खर्च करावे लागतात. मात्र, आता भारतातील दोन टेलिकॉम कंपन्या व्हीआयपी क्रमांक निशुल्क देणार आहेत.

सरकारी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) आणि व्होडाफोन आयडिया (व्हीआय) या दोन कंपन्यांनी व्हीआयपी मोबाईल क्रमांकासाठी नविन ऑफर सुरू केली आहे. तुम्हालाही व्हीआयपी मोबाईल क्रमांक सहजासहजी मिळू शकेल. असा व्हीआयपी क्रमांक मिळवणं फारच सोप आहे. अवघ्या तीन सोप्या स्टेप्समध्ये तुम्ही सुद्धा असा क्रमांक मिळवू शकता कसं ते जाणून घेऊयात…

( हे ही वाचा : मोबाईलमध्ये का असतो हा लहान होल? काय असते याचे महत्त्व जाणून घ्या )


अशाप्रकारे मिळवा व्हीआयपी क्रमांक मोफत
१. यासाठी सर्वप्रथम तुम्हाला कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल. यानंतर, तुम्हाला वरच्या बाजूला दिलेल्या पर्यायातून न्यु कनेक्शन हा पर्याय निवडावा लागेल.
२. यानंतर तुम्हाला अनेक पर्याय दिसतील. यामध्ये तुम्हाला फॅन्सी क्रमांकाचा पर्याय निवडावा लागेल. त्यानंतर गरजेनुसार तुम्ही पोस्टपेड (Postpaid) किंवा प्रीपेड (Prepaid) क्रमांक निवडू शकता. यानंतर तुम्हाला एरिया कोड द्यावा लागेल.
३. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी, तुम्हाला तुमचा सक्रिय मोबाईल क्रमांक देखील द्यावा लागेल. यानंतर, व्हीआयच्या वतीने व्हीआयपी मोबाईल क्रमांक तुमच्या घरी पोहोचवला जाईल. जो तुम्ही नियमित क्रमांक म्हणून वापरू शकता.