तुम्ही येणाऱ्या काळामध्ये स्मार्टटीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर Flipkart वर स्मार्टटीव्हीवर एक ऑफर सुरु आहे. होळीनिमित्त किंवा होळीच्या दिवशी Flipkart कडून एक जबरदस्त ऑफर काढण्यात आली आहे. या ऑफरमध्ये ग्राहकांना ३३,००० रुपयांचा Thomson 9R Pro Smart TV केवळ ६,९९९ रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे. या ऑफरबद्दल आणि या स्मार्टटीव्हीबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
Thomson 9R Pro Smart TV या स्मार्टटीव्हीमध्ये वापरकर्त्यांना ४३ इंचाचा स्क्रीन मिळणार आहे. तसेच या टीव्हीमध्ये अल्ट्रा HD 4K सपोर्ट देण्यात आला आहे. हा अँड्रॉइड स्मार्ट टीव्ही आहे. जो जेमतेम अर्ध्या किंमतीमध्ये खरेदी केला जाऊ शकतो. तुम्ही जर का ही ऑफर चुकवली तर तुम्हाला पुन्हा अशी ऑफर मिळणार नाही.
Thomson 9R PRO या स्मार्ट टीव्हीची किंमत ही ३३,९९९ रुपये इतकी आहे. जो फ्लिपकार्टवर १९,४९९ रुपयांना खरेदीसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. टीव्ही खरेदीवर ११,००० रुपयांची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. त्यामुळे यानंतर या टीव्हीची किंमत ही ८,४९९ रुपये होणार आहे. PNB च्या क्रेडिट कार्डवर १,५०० रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे.
यानंतर थॉमसनच्या ४३ इंचाच्या स्मार्ट टीव्हीची किंमत ही ६,९९९ होऊ शकते. मात्र एक्सचेंज व्हॅल्यू ही तुमच्याकडे असणाऱ्या टीव्हीच्या सध्याच्या स्थितीवर अवलंबून असते. तसेच हा स्मार्ट टीव्ही ३,२५० च्या EMI वर देखील खरेदी करता येईल. तसेच तुम्हाला हा टीव्ही आवडला नाही तर तो ७ दिवसांच्या कालावधीत रिप्लेस केला जाऊ शकतो.