सणासुदीचे दिवस सुरू होण्यापूर्वीच फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉन सारख्या ई-कॉमर्स कंपन्या ऑनलाइन सेलचे आयोजन करत आहेत. याशिवाय देशातील इलेक्ट्रॉनिक ब्रँड आणि स्मार्टफोन कंपन्यांनीही नवीन प्रोडक्ट लॉंच करण्याची तयारी केली आहे. फ्रान्सचे कंझ्यूमर इलेक्ट्रॉनिक्स ब्रँड थॉमसनने गुरुवारी आपली नवीन QLED टीव्ही सीरिज लॉंच केली. थॉमसनची नवीन स्मार्ट टीव्ही सीरिज Google TV सोबत येते आणि ५० इंच, ५५ इंच आणि ६५ इंच स्क्रीन आकाराच्या तीन मॉडेलमध्ये उपलब्ध आहे.

Thomson QLED TV Price In India
थॉमसनचे क्यूएलईडी टीव्ही देशात परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ५० इंच स्क्रीन टीव्हीची किंमत ३३,९९९ रुपये आहे. ५५ इंचाचा टीव्ही ४०,९९९ रुपयांमध्ये येतो. तर ६५ इंच स्क्रीनसह थॉमसन QLED टीव्ही ५९,९९९ रुपयांना खरेदीसाठी उपलब्ध असेल. हे टीव्ही बाजारात उपलब्ध असलेल्या इतर ब्रँडच्या 4K टीव्हीच्या किमतीत उपलब्ध करून देण्यात आल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.

आणखी वाचा : Airtel चा जबरदस्त प्लॅन! ४९९ रुपयांमध्ये अनलिमिटेड कॉल, ७५ GB डेटा, प्राइम व्हिडीओ आणि हॉटस्टार सबस्क्रिप्शन फ्री

हे लक्षात घेण्यासारखे आहे की, इलेक्ट्रॉनिक ब्रँड थॉमसन आपल्या स्मार्ट टीव्ही सीरिजसह भारतात ४ वर्षे पूर्ण करत आहे. थॉमसन क्यूएलईडी टीव्ही ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर दरवर्षी आयोजित होणाऱ्या बिग बिलियन डेजमध्ये विक्रीसाठी उपलब्ध करून दिला जाईल.

Thomson QLED TV Specifications
नवीन थॉमसन QLED टीव्ही ५० इंच, ५५ इंच आणि ६५ इंच स्क्रीन आकारात येतात. HDR10+ सह नवीन टीव्हीमध्ये डॉल्बी व्हिजन सपोर्ट उपलब्ध आहे. स्पीकरबद्दल बोलायचे झाले तर या टीव्हीमध्ये ४० W डॉल्बी ऑडिओ स्टीरियो बॉक्स स्पीकर आहेत. स्पीकर्स डॉल्बी अॅटमॉस, डॉल्बी डिजिटल प्लस आणि डीटीएस ट्रूसराऊंडसह येतात. या टीव्हीमध्ये २ जीबी रॅम आणि १६ जीबी इनबिल्ट स्टोरेज आहे. टीव्ही MT9062 प्रोसेसर आणि ग्राफिक्ससाठी Mali-G52 GPU सह येतात.

आणखी वाचा : ७९९ रूपयांचा Jio चा पोस्टपेड-प्रीपेड प्लॅन: Netflix, Prime Video आणि Hotstar मोफत, अनलिमिटेड कॉल, डेटा

थॉमसनचा नवीन QLED TV ड्युअल-बँड GHz Wi-Fi आणि Google TV सारखी फीचर्स ऑफर करतो. नवीन थॉमसन क्यूएलईडी टीव्ही एकाच काळ्या रंगात उपलब्ध आहेत. यामध्ये अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ, नेटफ्लिक्स, हॉटस्टार, अॅपल टीव्ही, वूट यांसारख्या प्री-इंस्टॉल केलेल्या अॅप्सचा समावेश आहे. हे टीव्ही बेझेल कमी डिझाइन देतात.

थॉमसनच्या या नवीन QLED टीव्हीमध्ये डिजिटल नॉईज फिल्टर, ब्लूटूथ 5.0, गुगल असिस्टंट यांसारखी फीचर्स आहेत.

नवीन थॉमसन क्यूएलईडी टीव्ही लाँच करण्याबद्दल भाष्य करताना थॉमसन इंडियाची परवानाधारक कंपनी एसपीपीएलचे सीईओ अवनीत सिंग मारवाह म्हणाले की, “आम्हाला थॉमसनकडून बहुप्रतिक्षित नवीन QLED सीरिज लाँच करताना खूप आनंद होत आहे. या टीव्हींना उत्कृष्ट फीचर्स आणि हार्डवेअर डिझाइन देण्यात आले आहे, जेणेकरून भारतीय ग्राहकांना परवडणाऱ्या किमतीत सर्वोत्तम तंत्रज्ञान आणि डिझाइन मिळू शकेल. आम्ही २०२२ मध्ये आणखी प्रोडक्ट्स लॉंच करणार आहोत. थॉमसनला आघाडीवर ठेवल्याबद्दल आम्ही आमच्या ग्राहकांचे आभारी आहोत.”