वाढत्या उष्णतेमुळे अंगाची लाही लाही होतेय. यापासून दिलासा मिळावा यासाठी आपण सर्वजण वेगवेगळे फंडे वापरतो. घरी असो किंवा कारमध्ये, फक्त चांगला कूलिंग एअर कंडिशनर (AC) उष्णतेपासून आराम देतो. उन्हाळ्यात एसीशिवाय गाडीतून प्रवास करणे खूपच अवघड आहे. जर तुमच्या गाडीचा एसीही उन्हाळ्यात नीट काम करत नसेल तर तुम्ही काही टिप्स वापरून त्याची कूलिंग वाढवू शकता. कार एसीची क्षमता वाढवण्यासाठी आम्ही तुम्हाला प्रभावी टिप्स सांगत आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गाडीचा एसी चालू करण्यापूर्वी काच उघडा
लक्षात ठेवा कारचा एसी चालू करण्यापूर्वी तुमच्या कारला हवेशीर करा. म्हणजेच, कारची खिडकी उघडा आणि आत असलेली उष्णता बाहेर जाऊ द्या. असे केल्याने कारचे तापमान कमी होईल आणि एसी लवकर थंड होईल.

तुमच्या कारची एसीची नियमितपणे सर्व्हिसिंग करा
एसी चांगली थंड होण्यासाठी तुमच्या कारच्या एसीची नियमितपणे सर्व्हिसिंग करणे आवश्यक आहे. असे केल्याने एसी चांगली कूलिंग देईल.

आणखी वाचा : हे लहान रोबोटिक खेकडे आहेत जगातील सर्वात छोटे रोबोट, मुंगीपेक्षाही बारीक

गलिच्छ फिल्टर कूलिंग कमी करेल
एसी फिल्टर्स गलिच्छ असल्यास एयर इन्टेक ब्लॉक होते. त्यामुळे एसी थंड व्हायला वेळ लागेल आणि इंधनही जास्त खर्च होईल. त्यामुळे एसीचे फिल्टर स्वच्छ असावेत हे लक्षात ठेवा. त्यांची वेळोवेळी स्वच्छता करत राहणे गरजेचे आहे. याशिवाय एसीचे तापमान ऑप्टिमम लेवलवर ठेवा.

एसी कंडेन्सरच्या स्वच्छतेची काळजी घ्या
कारच्या एसीचे कंडेन्सर कूलिंगसाठी जबाबदार आहे आणि कंडेन्सरच्या वायुप्रवाहात धूळ किंवा घाण असल्यास, कूलिंग इफेक्टवर परिणाम होईल. त्यामुळे कारच्या एसीचे कंडेन्सर नियमितपणे स्वच्छ केले पाहिजे हे लक्षात ठेवा.

रीक्रिक्युलेशन मोड चालू करा
कारमधील एसी चालू केल्यानंतर, रीक्रिक्युलेशन मोड चालू करा. असे केल्याने एसी फक्त कारच्या केबिनमध्ये असलेली हवा वापरेल, बाहेरची हवा घेणार नाही. हा मोड वापरल्याने एसी कार लवकर थंड करते. याशिवाय एसी सुरू असताना कारच्या खिडक्या व्यवस्थित बंद आहेत याची खात्री करा. यामुळे कार केबिन लवकर थंड होईल.

थेट सूर्यप्रकाशापासून कारचे संरक्षण करा आणि सावलीत पार्क करा
थेट सूर्यप्रकाशात कार पार्क न करण्याचा प्रयत्न करा. गाडीच्या एसीपेक्षा पाणी चांगले असेल तर गाडी सावलीत पार्क करण्याचा प्रयत्न करा. यामुळे कार कमी गरम होईल आणि एसी चांगले कूलिंग करेल. जर गाडी उन्हात उभी असेल तर एसी आधीच गरम होईल आणि गाडी थंड होण्यासाठी जास्त वेळ लागेल.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tips to boost efficiency speed of your cars ac know all about it prp
First published on: 26-05-2022 at 20:05 IST