Otp Delivery Scam : देशात सायबर गुन्हेगारीचे अनेक प्रकार समोर आले आहेत. काही दिवसांपूर्वीच सायबर भामट्यांनी बंगळुरूतील एका व्यक्तीकडून वीज बिल थकित असल्याचे सांगत ४ लाख रुपये लुटले. अशा अनेक घटना घडल्या आहेत, म्हणून नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे. ऑनलाइन व्यवहार करताना तर फार काळजी घ्यावी, कारण अशा व्यवहारात आर्थिक फसवणूक होण्याची मोठी शक्यता असते. ग्राहकांना सुरक्षित डिलिव्हरी मिळावी यासाठी फ्लिपकार्ट आणि अमेझॉनसारख्या कंपन्यांनी वन टाइम पासवर्ड डिलिव्हरी प्रक्रिया केली. मात्र, घोटाळेबाज या प्रक्रियेलाही भेदत ग्राहकांच्या बँक खात्यातून पैसे चोरत आहेत.

अशी करतात फसवणूक

Competition among 7 companies under incentive scheme for ACC production
‘एसीसी’ उत्पादनासाठी प्रोत्साहन योजनेअंतर्गत ७ कंपन्यांमध्ये चढाओढ
stock market, 3 7 crore dmat accounts
सरलेल्या आर्थिक वर्षात ३.७ कोटी डिमॅट खात्यांची भर
ED Seizes Assets more than Rs 24 Crore from VIPS Group Owner Vinod Khute
व्हीआयपीस् ग्रुपच्या विनोद खुटे याच्याशी संबंधित मालमत्तेवर ईडीची टाच, ५८ बँक खात्यातील रक्कम व ठेवींचा समावेश
indigrid cio meghana pandit talks about future Investment flow in invit
‘इन्व्हिट्स’मध्ये गुंतवणूक ओघ वाढत जाणार ! इंडिया ग्रिड ट्रस्टच्या मुख्य गुंतवणूक अधिकारी पंडित यांचे प्रतिपादन  

अलीकडेच बनावट डिलिव्हरी एक्झिक्युटिव्ह ग्राहकांकडून ओटीपी गोळा करत असल्याचे समोर आले होत. ज्यांना अनेकदा डिलिव्हरी पॅकेज मिळतात अशा लोकांवर फसवणूक करणारे टपून बसतात आणि डिलिव्हरी एजंट असल्याचा बनाव करत ग्राहकांच्या दारावर येऊन त्यांना ओटीपी मागतात.

(४५ हजारांत घरी आणा Iphone 13, इअर एण्ड सेलचा घ्या लाभ, जाणून घ्या माहिती)

कॅश ऑन डिलिव्हरी असल्याचे म्हणत ते ग्राहकांकडून ऑर्डरची रक्कम माहीत करून घेतात. जर ग्राहकाने डिलिव्हरी पॅकेज घेण्यास नकार दिला तर ते डिलिव्हरी रद्द करत असल्याचे सांगतात. ऑर्डर रद्द करण्यासाठी फसवूक करणारे ग्राहकांना मुर्ख बनवून त्यांच्याकडून ओटीपी घेतात. ओटीपी मिळाल्यानंतर ते ग्राहकाचे सेलफोन हॅक करतात आणि पैसे चोरी करतात.

ओटीपी घोटाळ्यापासून सुरक्षित राहण्यासाठी हे करा

(कॅमेरा टेस्टचा धक्कादायक निकाल, ‘या’ फोनने IPhone 14 Pro आणि Galaxy S22 Ultra स्मार्टफोनला पछाडले)

  • कोणालाही ओटीपी शेअर करू नका.
  • जो कोणी कोणत्याही प्रकारचा ओटीपी मागत असेल त्याची पडताळणी करा.
  • पैसे देण्यापूर्वी डिलिव्हरी पॅकेज उघडू तपासा आणि डिलिव्हरीची पुष्टी करा.
  • वैयक्तिक माहिती मागणाऱ्या लिंक्स, संकेतस्थळ किंवा व्यक्तीवर विश्वास ठेवू नका.
  • डिलिव्हरीवर पेमेंट करताना क्यूआर कोड स्कॅन करणे टाळण्यासाठी सत्यापित प्लॅटफॉर्म वापरून ऑनलाइन पेमेंट करण्याचा प्रयत्न करा.