गुगल असिस्टंट सारख्या व्हर्च्युअल असिस्टंटने लाखो स्मार्ट डिव्हाइस युजर्सचे जीवन सोपे केले आहे. हे युजर्सना हँड्सफ्री पद्धतीने अनेक कामे करण्याची मोकळीक देते, ज्यामुळे दैनंदिन कामे करणे सोपे होते. या कामांमध्ये रोबोट व्हॅक्यूम क्लिनर नियंत्रित करणे, दिवे बंद करणे यासारख्या दैनंदिन कामांचा समावेश होतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गुगल असिस्टंटबद्दल बोलायचं झालं तर, साधारणपणे आपण गुगलचे आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) आधारित स्मार्ट असिस्टंट एकाच आवाजात ऐकतो. पण जर तुम्हाला रोज तोच आवाज ऐकण्याचा कंटाळा आला असेल आणि तुम्हाला गुगल असिस्टंटच्या आवाजात बदल करायचा असेल तर तुम्ही याचा आवाज बदलू शकता. आज आपण गुगल असिस्टंटचा आवाज बदलण्याची प्रक्रिया स्टेप-बाय-स्टेप जाणून घेऊया.

गुगल अ‍ॅप वापरून गुगल असिस्टंट व्हॉइस कसा बदलायचा?

  • गुगल अ‍ॅपवरून गुगल असिस्टंटचा आवाज बदलण्यासाठी गुगल अ‍ॅपच्या वरच्या उजव्या कोपर्‍यात तुमच्या प्रोफाइल आयकॉनवर टॅप करा.
  • आता सेटिंग्ज बटणावर टॅप करा. यानंतर खालील स्क्रीनमध्ये गुगल असिस्टंट निवडा. आता ऑल सेटिंग्ज सेक्शनमध्ये असिस्टंट व्हॉईस आणि साउंड्स पर्यायावर टॅप करा.
  • येथे सर्व आवाज ऐकण्यासाठी, व्हॉइस प्रीसेटमधून स्क्रोल करा आणि तुम्हाला वापरू इच्छित असलेल्या आवाजावर टॅप करा.

Photos : WhatsApp वर चॅट करणे होणार आणखीनच सुरक्षित; नव्या फीचरमुळे युजर्स खुश

स्मार्ट डिस्प्लेवर गुगल असिस्टंट व्हॉइस कसा बदलायचा?

  • सर्वप्रथम तुमच्या गुगल असिस्टंट पॉवर्ड स्मार्ट डिस्प्लेवर गुगल होम अ‍ॅप उघडा. नंतर डिस्प्लेच्या वरच्या उजव्या कोपऱ्यात असलेल्या तुमच्या प्रोफाइल फोटोवर टॅप करा.
  • आता असिस्टंट सेटिंग्ज पर्यायावर टॅप करा. ऑल सेटिंग्ज सेक्शनमध्ये, असिस्टंट व्हॉइस पर्यायावर टॅप करा.
  • त्यानंतर खाली स्क्रोल करून तुम्हाला वापरायचा असलेला आवाज निवडण्यासाठी टॅप करा.

अँड्रॉइडवर गुगल असिस्टंटचा आवाज कसा बदलायचा?

  • अँड्रॉइड स्मार्टफोनवर गुगल असिस्टंटचा आवाज बदलण्‍यासाठी, आधी ‘हे गुगल’ (Hey Google) बोलून किंवा तुमच्या फोनच्या बाजूला असलेले गुगल असिस्टंट बटण दाबून तो तुमच्या स्मार्टफोनवर सक्रिय करा.
  • आता ‘आवाज बदला’ म्हणा. यानंतर तुमच्या स्मार्टफोनच्या स्क्रीनवर मॅनेज व्हॉईस सेटिंग्जच्या बटणावर टॅप करा.
  • आता, सर्व आवाज ऐकण्यासाठी व्हॉइस प्रीसेटमधून स्क्रोल करा आणि तुम्हाला वापरायचा असलेल्या आवाजावर टॅप करा.

Smartphone Tips : तुम्हीही ‘या’ पद्धतीने स्वच्छ करता आपला स्मार्टफोन? होऊ शकते स्क्रीनचे नुकसान

आयफोन किंवा आयपॅडवर गुगल असिस्टंटचा आवाज कसा बदलायचा?

  • सर्वप्रथम, तुमच्या आयफोन किंवा आयपॅडवर गुगल असिस्टंट अ‍ॅप उघडा. त्यानंतर अ‍ॅपच्या वरच्या उजव्या कोपऱ्यात असलेल्या तुमच्या प्रोफाइल फोटोवर टॅप करा.
  • यानंतर, सेटिंग्ज मेनूवर जा आणि येथे असिस्टंट व्हॉइस पर्यायावर टॅप करा. आता सर्व उपलब्ध व्हॉइसवर स्क्रोल करा आणि तुम्हाला वापरायचा असलेला आवाज निवडण्यासाठी टॅप करा.
मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tired of hearing the same google assistant voice every day change the sound using these steps pvp
First published on: 17-08-2022 at 14:58 IST