५ जानेवारीला ‘टायटन आयप्लस’ने (Titan Eye Plus) आपल्या नवीन स्मार्ट ग्लासचा सेट लॉन्च केला. टायटन आयएक्स (Titan EyeX) फिटनेसच्या ट्रेकिंग सिस्टीम सोबतच ओपन एअर स्पिकर्स आणि टच कंट्रोल सुविधेचा सुद्धा समावेश आहे. टायटनचे हे नवीन स्मार्ट ग्लासेस अँड्रॉइड (Android) आणि आयओएस (iOS) डिव्हाईससोबत सुसंगत असून ब्लूटूथ व्ही५ सोबत कनेक्ट केले जाऊ शकतात. स्मार्ट ग्लासेसचा धूळ आणि पाण्यापासून बचाव करण्यासाठी यामध्ये एक इनबिल्ट ट्रेकर आणि आयपी ५४ रेट बिल्ट देखील देण्यात आला आहे. एकदा चार्जिंग केल्यानंतर हे ग्लासेस ८ तासांपर्यंतची बॅटरी लाईफ देतात. या स्मार्ट ग्लासेसमध्ये एक क्वालकॉम प्रोसेसर (Qualcomm processor) बसवण्यात आला असून ओपन एअर स्पिकर्स (open-ear speakers) हे व्हॉइस बेस नेव्हिगेशन आणि फिचर व्हॉइस नोटिफिकेशनची सुविधासुद्धा प्रदान करतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

टायटन आयएक्सचे खास फीचर्स :

वर सांगितल्याप्रमाणे, टायटन आयएक्समध्ये अँड्रॉइड आणि आयओएस डिव्हाईस कनेक्ट करण्यासाठी ब्लूटूथ व्ही५ ची सुविधा आहे. चष्म्यांना दोन्ही ओएससाठी एक अ‍ॅपसुद्धा तयार करण्यात आलं आहे. टायटन आयएक्स एका अज्ञात क्वालकॉम प्रोसेसरद्वारे संचालित आहे. या स्मार्ट ग्लासेसमध्ये ट्रू वायरलेस स्टीरियो (TWS) क्षमतेसह ओपन-इअर स्पीकर्स आहेत. यामुळे टायटन आयएक्स आऊटडोर वापरासाठी सोपे होते. आजूबाजूच्या परिस्थितीची जाणीव ठेवूनही वापरकर्ते संगीत ऐकू शकतात, असा दावा कंपनीने केला आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Titan launches new titan eyex with fitness tracking touch control these are attractive features pvp
First published on: 10-01-2022 at 10:42 IST