Here is how to enable DND services on Jio network : तुम्ही कोणतंही सिम कार्ड वापरत असाल, तरी सर्व टेलिकॉम कंपन्यांच्या सततच्या कॉल्सने अनेक जण हैराण होतात. कंपन्या कॉल करून ऑफर्सची माहिती, त्याशिवाय प्लॅन वॅलिडिटी संपल्यानंतर त्याबाबतची माहिती सतत मेसेज आणि कॉलवरून देत असतात. तसंच इतरही कारणांसाठी कंपन्यांचे सतत कॉल येत असतात, अशा ग्राहकांच्या अनेक तक्रारी असतात. जर तुमचीसुद्धा अशी तक्रार असेल आणि तुम्ही जिओ सिम वापरत असाल तर ही बातमी अगदी शेवटपर्यंत वाचा.

आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग तुम्हाला यापासून वाचवेल असं तुम्हाला वाटत असेल तर हे चुकीचे ठरेल. कारण आता गुन्हेगारसुद्धा अशा तंत्रज्ञानाचा वापर करतात. तुम्ही Jio युजर असाल तर MyJio ॲपद्वारे फक्त एक बटण क्लिक करून “fully blocked” स्पॅम कॉल आणि एसएमएस ब्लॉक करण्याचा एक सोपा मार्ग तुमच्याकडे आहे. त्याचवेळी युजर्स ओटीपीसह, ब्रँड्सकडून महत्त्वाचे संदेश, अपडेट्स, पार्टीअली (partially) ब्लॉक करू शकतात, जेणेकरून काही जाहिराती कॉल्स येणं बंद होणार नाही…

ban or restrictions on deepseek in India why many countries against deepseek
भारतात ‘डीपसीक’वर बंदी की बंधने? अनेक देश डीपसीकच्या विरोधात कशासाठी?
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
पुण्याच्या पाण्याचे पालकत्व कुणाकडे?
Mumbais Water for All policy provided 7868 new water connections by December 2024
कळवा, मुंब्रा आणि दिव्यात शुक्रवारी पाणी नाही, एमआयडीसीच्या जलवाहिनीवर तातडीची दुरुस्ती
pune Due to rising GBS cases municipal corporation sent water samples from 23 locations for testing
पिंपरीत १३ ठिकाणचे पाणी दूषित; जलशुद्धीकरण केंद्रात कशी होते पाण्यावर प्रक्रिया?
Thane Water Cut Supply Disrupted Due to Power Outage at Temghar Pumping Station
ठाणेकरांपुढे पाणी संकट; टेमघर पाणी पुरवठा केंद्रातील वीज यंत्रणेत बिघाड 
pimpri chinchwad municipal corporation
पिंपरी : नळजोड तोडणीबाबतचे ‘एसएमएस’ फसवणुकीचे; महापालिकेने केले ‘हे’ आवाहन
Housing societies should test borewell and well water before using it as there is a possibility of spread of GBS disease Pune news
‘जीबीएस’चा धोका! गृहनिर्माण सोसायट्यांनी बोअरवेल, विहिरीचे पाणी तपासून वापरावे; पिंपरी महापालिकेचे आवाहन

जिओ नेटवर्कवर स्पॅम कॉल्स, एसएमएस ब्लॉक करण्यासाठी, डू नॉट डिस्टर्ब (DND) सेवा एनेबल करणे आवश्यक आहे (How To Enable DND Services). पण, यामुळे स्पॅम कॉल आणि एसएमएससह ते काही टेलिमार्केटिंग कॉल्सदेखील ब्लॉक करेल.

हेही वाचा…Jio AI Cloud Welcome Offer : जिओ युजर्स तुम्हालाही हा एसएमएस आला आहे का? आता फोटो, व्हिडीओ सेव्ह करण्यासाठी मिळणार 100GB फ्री स्टोरेज

वापरकर्ते ब्लॉक करण्यासाठी कॉल आणि मेसेजची अचूक श्रेणी (exact category ) निवडून DND सेवादेखील कॅस्टमाइज करू शकतात. यामध्ये बँकिंग, रिअल इस्टेट, शिक्षण, आरोग्य, पर्यटन आणि बऱ्याच पर्यायांचा समावेश असणार आहे. तुम्ही जरी full block option पर्याय एनेबल केला तरीही तुम्हाला ट्रान्सक्शनल कॉल आणि सरकारी संस्थांकडून व्यवहार कॉल/एसएमएस येत राहतील.

Jio वर DND सर्विस कशी एनेबल करायची (How To Enable DND Services) ?

MyJio ॲप उघडा आणि More वर क्लिक करा. त्यानंतर Do Not Disturb वर क्लिक करा आणि “fully blocked” किंवा “promotional communication blocked” एनेबल करा. तसेच आम्ही सर्व युजर्सना फुल्ली ब्लॉक (fully blocked) पर्याय एनेबल करण्याची शिफारस करतो आहे. कारण बहुतेक स्पॅम कॉल आणि एसएमएस यामुळे वेळीच बंद केले जाऊ शकतात.

Story img Loader