TRAI on pesky calls : आर्थिक फसवणूक थांबवण्यासाठी भारतीय दूरसंचार नियामक (TRAI) प्राधिकरण नवीन उपयायोजनांवर काम करत आहे. याबाबत सोमवारी प्राधिकरणाने माहिती दिली. आर्थिक फसवणूक थांबवण्यासाठी इतर नियमकांसह सयुक्त कारवाई करण्यासह त्रासदायक कॉल्स आणि संदेश शोधण्यासाठी आपण विविध तंत्रज्ञानावर काम करत असल्याचे प्राधिकरणाने सांगितले.

यूसीसी कॉल्स चिंतेचा विषय

importance of rest for airline pilots
विश्लेषण : वैमानिकांची विश्रांती का महत्त्वाची?
LinkedIn, top companies, india
वित्तीय, तंत्रज्ञान क्षेत्राची आघाडी; लिंक्डइनकडून देशातील मोठ्या २५ कंपन्यांची यादी जाहीर
ie think our cities
IE THINC Second Edition: “लवकरच असमानता आणि हवामान बदल ही आपल्या शहरांसमोरची सर्वात मोठी आव्हानं ठरतील!”
indigrid cio meghana pandit talks about future Investment flow in invit
‘इन्व्हिट्स’मध्ये गुंतवणूक ओघ वाढत जाणार ! इंडिया ग्रिड ट्रस्टच्या मुख्य गुंतवणूक अधिकारी पंडित यांचे प्रतिपादन  

अनसॉलिसिटेड कमर्शियल कम्युनिकेशन (UCC) किंवा त्रासदायक संप्रेषण हे लोकांसाठी गैरसोयीचे प्रमुख स्त्रोत असून ते त्यांच्या गोपनीयतेवर परिणाम करते, असे दूरसंचार नियामक प्राधिकरणाने सांगितले. तसेच, अनोंदणीकृत टेलीमार्केटर्स (UTM) विरुद्ध तक्रारी नोंदवल्या जात आहेत. विविध प्रकारचे यूसीसी एसएमएस पाठवण्यात मोठी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. यूसीसी कॉल्स देखील चिंतेचा विषय ठरले आहेत, असे प्राधिकरण म्हणाले.

(जुने गेम्स खेळून कंटाळा आला? नेटफ्लिक्सने सादर केले ‘हे’ ३ नवीन गेम्स, जाणून घ्या माहिती)

दूरसंचार नियामक प्राधिकरण विविध भागधारकांच्या समन्वयाने अनोंदणीकृत टेलीमार्केटर्सकडून त्रासदायक संप्रेषन केले जात आहे की नाही, हे तपासण्यासाठी आवश्यक पवाले उचलत आहे. यामध्ये यूसीसी शोध प्रणालीची अंमलबजावणी, डिजिटल संमती संपादनाची तरतूद आणि आर्टिफिशियल इंटेलिजेन्स आणि मशीन लर्निंगचा वापर करून मेसेज टेम्पलेट्स आणि हेडर्सचे स्क्रबिंग करणे या चरणांचा समावेश आहे, असे प्राधिकरणाकडून सांगण्यात आले.

टेलिकॉम कमर्शियल कम्युनिकेश कस्टमर प्रेफरेन्स रेग्युलेशन २०१८

त्रासदायक कॉल्स आणि मेसेजेसना आळा घालण्यासाठी प्राधिकरणाने टेलिकॉम कमर्शियल कम्युनिकेश कस्टमर प्रेफरेन्स रेग्युलेशन २०१८ जारी केले. याने ब्लॉकचेनवर आधारित इकोसिस्टम तयार झाले आहे. या रेग्युलेशननुसार, सर्व कमर्शयिल प्रमोटर्स आणि टेलिमार्केटर्सना डीएलटी प्लाटफॉर्मवर नोंदणी करणे अनिवार्य आहे. तसेच, त्यांना मेसेज पाठवण्यासाठी ग्राहकाची संमती घेणे गरजेचे आहे. या अंतर्गत ६ लाख हेडर्स आणि जवळपास ५५ लाख मंजूर मेसेज टेम्पलेटसह सुमारे २.५ लाख प्रमुख संस्थांची नोंदणी करण्यात आली आहे, जी डीएलटी प्लाटफॉर्मचा वापर करून नोंदणीकृत टेलिमार्केटर आणि टीएसपीद्वारे ग्राहकांपर्यंत पोहोचवली जात आहे.

(आकर्षक दिसतो Google pixel 7a, लूक झाले लिक; मिळू शकते वायरलेस चार्जिंग, पाहा फोटो)

या उपयामुळे नोंदणीकृत टेलिमार्केटर्सच्या विरोधात ग्राहकांच्या तक्रारी कमी झाल्या आहेत. परंतु, नोदणी न झालेले पेस्की किंवा त्रासदायक कॉलर्स अजूनही ग्राहकांना स्पॅम करत असल्याचे दूरसंचार नियामक प्राधिकरणाने सांगितले.

आर्थिक फसवणूक थांबवण्यासाठी हा उपाय

दूरसंचार संसाधनांचा वापर करून आर्थिक फसवणूक थांबवण्यासाठी प्राधिकरणाने रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) आणि ग्राहक व्यवहार मंत्रालय यांचा समावेश असलेली नियमकांची संयुक्त समिती तयार करण्यासाठी पुढाकार घेतला आहे, असे प्राधिकरणाने सांगितले.