‘पैसा आज आहे उद्या नाही’ ही म्हण तुम्ही ऐकली असेलच. मात्र, प्रवास करायचा म्हटल्यास पैसा तर लागणारचं ना! काळजी अजिबात करू नका कारण तुमच्या पैश्यांचा जुगाड IRCTC नं केलाय. तुम्हाला संपूर्ण कुटुंबासह ट्रेनच्या फर्स्ट क्लासमध्ये प्रवास करायचा असेल किंवा देशातील कोणत्याही प्रीमियम ट्रेनने प्रवास करायचा असेल तर विभागानं ‘ट्रॅव्हल नाऊ पे लेटर’ ही सुविधा अंमलात आणली. ज्याचा उद्देश ‘पहिले प्रवास नंतर पैसे’ असा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

IRCTC नं काय नेमकं केलं ?

ट्रॅव्हल नाऊ पे लेटर या सुविधेअंतर्गत तुम्ही कोणतेही पैसे न भरता रेल्वे तिकीट बुक करू शकता, त्यानंतर तुम्ही हे पैसे तुमच्या स्वतःच्या हिशोबाने देऊ शकता. ट्रॅव्हल नाऊ पे लेटर सुविधेअंतर्गत, तुम्हाला तुमचे तिकीट बुक करताना रक्कम भरण्याऐवजी ही सुविधा निवडावी लागेल. यासाठी CASHe ने IRCTC सोबत भागीदारी केली आहे. जेव्हा तुम्ही भाडे भरताना या सुविधेची निवड करता तेव्हा तुम्हाला भाडे भरण्यासाठी ३ ते ६ ईएमआयचा पर्याय मिळतो.

आणखी वाचा : स्मार्टफोन खरेदी करायचाय, मग आत्ताच करा! पुढचा महिना असेल महागडा! काय आहे समीकरण? जाणून घ्या…

अरे व्वा! इथं ईएमआयची सुविधा देखील मिळेल

यामध्ये प्रवासाचे पैसे तुम्हाला एकाच वेळी देण्याची गरज नाही. ईएमआय निवडून तुम्ही त्या वेळी तुमचे तिकीट न भरता पैसे देऊ शकता आणि भाडे नंतर देऊ शकता. प्रवाशांना ही सुविधा तत्काळ आणि सर्वसाधारण आरक्षणासाठी वापरता येणार आहे. यासोबतच ही सुविधा नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, यूपीआय सारखे पेमेंटचे आणखी एक पर्याय देखील सिद्ध होऊ शकते. Amazon सारख्या ई-कॉमर्स कंपनीच्या पेमेंट सुविधांमध्ये Buy Now Pay Later हा एक अतिरिक्त पर्याय आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, यासाठी एआय आधारित तंत्रज्ञानाचा वापर केला जातो आणि अशा लोकांनाही कर्ज दिले जाऊ शकते ज्यांना सामान्य पद्धतीने कर्ज मिळणे शक्य नाही.

ही सुविधा कोणासाठी ?

ज्यांना रेल्वेचा प्रवास करायचा आहे. कुटुंबाला एखाद्या यात्रेला घेऊन जायचं आहे, मात्र त्यांच्याकडे पैसा नाही. असे लोक ज्यांच्या खात्यात कोणत्याही कारणाने तिकीट बुक करण्यासाठी पैसे नाहीत.अशा परिस्थितीत प्रवाशांना या सुविधेचा लाभ घेता येईल आणि प्रवासादरम्यान भाड्याच्या तणावातून ते मुक्त होऊ शकतात.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Travel first pay later this plan of railways will make your journey pleasant pdb
First published on: 19-10-2022 at 20:16 IST