ट्रू कॉलर (Truecaller) हे सर्वात लोकप्रिय ॲप आहे, जे आजकाल लाखो लोकं वापरतात. ट्रू कॉलर तुम्हाला कॉल करणाऱ्या व्यक्तीची ओळख पटवून देण्यासाठी असतो, जरी तुमच्या फोन बुकमध्ये तो नंबर सेव्ह केलेला नसला तरीही. याशिवाय ट्रू कॉलर तुम्हाला अनोळखी नंबरचे तपशील मिळवण्यात मदत करतो. पण, आता ट्रू कॉलर युजर्ससाठी एक आनंदाची बातमी घेऊन आला आहे.

इंडिया टुडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रू कॉलरने भारतातील वापरकर्त्यांसाठी एआय पॉवर्ड (AI) कॉल रेकॉर्डिंग लाँच करण्याची घोषणा केली आहे, जी आयओएस आणि अँड्रॉइड या दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. नवीन AI पॉवर्ड फीचर वापरकर्त्यांना ट्रू कॉलर ॲपमध्ये थेट इनकमिंग आणि आउटगोइंग कॉल रेकॉर्ड करण्यास सक्षम असेल. महत्त्वाची संभाषणे रेकॉर्ड आणि सेव्ह करण्यासाठी एक सोयीस्कर पर्याय प्रदान करते आहे.

Yamaha introduces vibrant new color options across the MT15 V2 Fascino and Ray ZR portfolios Know Features And price
ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह यामाहा इंडियाने ‘या’ दुचाकींना केलं उपडेट; पाहा कलर ऑप्शन…
restaurant inside metro coach nmrc introduces unique metro coach restaurant at sector 137 station know seating capacity read all details
आता मेट्रोमध्ये करु शकता पार्टी अन् मीटिंग; ‘या’ ठिकाणी सुरू होतेय मेट्रो कोच रेस्टॉरंट
Airtel Xtreme
लाईट्स, कॅमेरा, XStream : तुमचं वन स्टॉप एन्टरटेन्मेंट हब
fake coca cola cold drinks making and packing video goes viral people got angry after watching
कोल्ड्रिंक्सच्या नावाखाली विकले जातेय विष? व्हायरल VIDEO मध्ये पाहा बनावट कोल्ड्रिंक्सचा काळाबाजार

ट्रू कॉलरच्या मते, नवीन फीचर आर्टिफिशियल इंटेलिजन्स टेक्नॉलॉजीचा या वापरामुळे कॉल सुरू असताना तुम्हाला माहिती लिहून घेत बसण्याची युजर्सना गरज भासणार नाही. नवीन टूल तुम्हाला तुमचे फोन संभाषण थेट ट्रू कॉलर ॲपमध्ये रेकॉर्ड करू देते आणि त्यासाठी ट्रान्सक्रिप्ट, सारांश तयार करू देते. हेच या नवीन फीचरचे उद्दिष्ट असणार आहे.; तर आयओएस आणि अँड्रॉइड युजर्स कशाप्रकारे या फीचरचा उपयोग करू शकतील हे पाहू.

हेही वाचा…व्हॉट्सॲप घेऊन येतंय तुमच्यासाठी भन्नाट फीचर; आता युजर्सना आवडत्या व्यक्ती अन् संपर्कांना देता येणार प्राधान्य

आयफोनवर कॉल रेकॉर्ड करण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा :

 • समजा तुम्ही इनकमिंग कॉलला उत्तर देत आहात किंवा आउटगोइंग कॉल सुरू आहे.
 • कॉल केल्यानंतर तुमच्या आयफोनवर ट्रू कॉलर ॲप उघडा.
 • ट्रू कॉलर ॲपमध्ये सर्च या टॅबवर टॅप करा.
 • ‘कॉल रेकॉर्ड करा’ हा पर्याय शोधा आणि तो निवडा. ही क्रिया तुम्हाला ट्रू कॉलरद्वारे प्रदान केलेल्या विशेष रेकॉर्डिंग लाइनशी जोडेल.
 • एकदा रेकॉर्डिंग लाइनशी कनेक्ट झाल्यानंतर, कॉलवरील संभाषण मर्ज करण्यासाठी एक पर्याय दिसेल त्यावर टॅप करा.
 • रेकॉर्डिंग तयार झाल्यावर तुम्हाला नोटिफिकेशन (सूचना) प्राप्त होईल. यात तुमचा कॉल यशस्वीरित्या रेकॉर्ड केला गेला आहे, असे लिहिण्यात येईल.
 • तसेच पूर्वी रेकॉर्ड केलेले कॉल ॲक्सेस करण्यासाठी ट्रू कॉलर ॲपवर नेव्हिगेट करा. सर्व रेकॉर्ड केलेले कॉल तुमच्या डिव्हाइसवर संग्रहित केले जातील.
 • सुरक्षिततेच्या अतिरिक्त स्तरासाठी, वापरकर्त्यांकडे आयक्लाऊडवर रेकॉर्ड केलेल्या कॉलचा बॅकअप तयार करण्याचासुद्धा पर्याय आहे.

अँड्रॉइड फोनवर कॉल रेकॉर्ड करण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा :

 • तुमच्या अँड्रॉइड डिव्हाइसवर ट्रू कॉलर ॲप उघडा.
 • ट्रू कॉलर ॲपमधील डायलर विभागात नेव्हिगेट करा.
 • ट्रू कॉलर डायलरमध्ये रेकॉर्डिंग बटण दिसेल. हे बटण तुम्हाला एका टॅपने रेकॉर्डिंग सुरू किंवा थांबवण्याची परवानगी देईल.
 • तुम्ही वेगळे डायलर ॲप वापरत असल्यास तुम्हाला रेकॉर्डिंग सुरू करण्यासाठी किंवा थांबवण्यासाठी डिझाइन केलेले ‘फ्लोटिंग’ बटण मिळेल. चालू असलेल्या कॉलदरम्यान हे बटण शोधा.
 • नंतर तुमचा कॉल रेकॉर्ड करणे सुरू करण्यासाठी रेकॉर्डिंग बटणावर टॅप करा. तुम्ही कॉलदरम्यान कोणत्याही वेळी हे करू शकता.
 • एकदा कॉल संपल्यानंतर ट्रू कॉलर तुम्हाला रेकॉर्डिंग आणि ट्रान्सक्रिप्शन तयार असल्याची सूचना देण्यासाठी तुम्हाला नोटिफिकेशन ( सूचना) पाठवेल.
 • ट्रू कॉलर ॲपमध्ये रेकॉर्ड केलेले कॉल्स ॲक्सेस करा. तुम्ही त्यांना ऐकू शकता, रेकॉर्डिंगचे नाव बदलू शकता, कोणतीही रेकॉर्डिंग डिलीट करू शकता किंवा तुमच्या डिव्हाइसवरील इतर ॲप्सवर ते शेअरसुद्धा करू शकता.
 • तुमचे रेकॉर्डिंग सेव्ह होण्यासाठी फक्त ट्रू कॉलर ॲपमधील रेकॉर्डिंग विभागात नेव्हिगेट करा. तेथून तुम्ही तुमच्या रेकॉर्ड केलेल्या कॉल्सवर आवश्यकतेनुसार विविध क्रिया करू शकता.

ट्रू कॉलरचा हा फीचर कोणत्या युजर्ससाठी उपल्बध असेल?

कॉल रेकॉर्डिंग फीचर सध्या ट्रू कॉलर प्रीमियमच्या सदस्यांनाच उपलब्ध असणार आहे. हे फीचर प्रीमियम सबस्क्रिप्शन पॅकेजमध्ये समाविष्ट केले आहे, जे प्रति महिना ७५ रुपये किंवा प्रति वर्ष ५२९ रुपयांपासून सुरू होते. कंपनीने नमूद केले की, हे फीचर हळूहळू आयओएस आणि अँड्रॉइड दोन्ही प्लॅटफॉर्मवर सर्व युजर्ससाठी सादर करेल. सध्या केवळ इंग्रजी आणि हिंदी भाषांसाठी ट्रान्सक्रिप्शन सपोर्ट करते आहे, तर लवकरच सर्व युजर्स ट्रू कॉलरच्या या फीचरचा लाभ घेऊ शकणार आहेत.