Truecaller ने आपल्या बाराव्या अ‍ॅडिशनचं लॉन्चिंग केलं आहे. नव्या अ‍ॅपमध्ये काही नविन फिचर्स देण्यात आले आहेत. त्याचबरोबर याची डिझाइनदेखील बदलण्यात आली आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून कॉल अलर्ट, कॉलचं ठिकाण, फुल स्क्रिन कॉलर आयडी, इनबॉक्स क्लिनर, एसएमएस आणि कॉन्टॅक्ट बॅकअप आणि स्मार्ट एसएमएससारखे फीचर्स आहेत. तसेच या अ‍ॅपला ४६ भाषांचा सपोर्ट मिळाला आहे. आता व्हिडिओ कॉलर आयडीसह नवं इंटरफेस, कॉल रेकॉर्डिंग, घोस्ट कॉल आणि कॉल घोषणा यासारखे नवे फिचर्स आले आहेत. येत्या आठवड्यात भारतासहीत अनेक देशातील अँड्रॉइड युजर्ससाठी अपडेट जारी केला जाणार आहे.

ट्रूकॉलमधील नवे फिचर्स

व्हिडिओ कॉलर आयडी- व्हिडिओ कॉलर आयडी नवं फिचर आहे. यात एक छोटा व्हिडिओ सेट करण्याची परवानगी आहे. मित्र आणि कुटुंबियांना कॉल केल्यानंतर प्ले होईल. बिल्ट इन व्हिडिओ टेम्प्लेटमधून निवडू शकता किंवा स्वत: सेट करून रिकॉर्ड करू शकता.

स्ट्रीमलाइन न्यू इंटरफेस- १५ कोटीहून अधिक लोक एसएमएससाठी ट्रूकॉ़लरचा वापर करतात. वेगळ्या टॅबसह, तुम्ही आता फक्त एका टॅपने तुमचे सर्व SMS, Truecaller ग्रुप चॅट्स आणि वैयक्तिक चॅट्स मिळवू शकता.

कॉल रेकॉर्डिंग – कॉल रेकॉर्डिंग सुरुवातीला केवळ प्रीमियम फिचर म्हणून होते. मात्र आता ते विनामूल्य जारी करण्यात येणार आहे. आता कोणताही अँड्राईड युजर ट्रूकॉलरवर मोफत कॉल रेकॉर्ड करू शकतो. कॉल रेकॉर्डिंगद्वारे तुम्ही सर्व इनकमिंग आणि आउटगोइंग कॉल रेकॉर्ड करू शकता. सर्व रेकॉर्डिंग डिव्हाइस स्टोरेजमध्ये संग्रहित केले जातील आणि ट्रूकॉलरद्वारे एक्सेस होऊ शकत नाही.

घोस्ट कॉल – घोस्ट कॉल हे ट्रूकॉलरमधील प्रँक कॉल फिचर आहे. घोस्ट कॉलद्वारे तुम्ही तुमच्या मित्रांसोबत मजा करू शकता. घोस्ट कॉलसह, आपण त्या व्यक्तीकडून कॉल येत असल्याचे दिसण्यासाठी कोणतेही नाव, नंबर आणि फोटो सेट करू शकता. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही तुमच्या फोनबुकमधून फक्त एक नंबर निवडू शकता. घोस्ट कॉल्स फक्त ट्रूकॉलर प्रीमियम आणि गोल्ड सदस्यांसाठी उपलब्ध असणार आहे.

कॉल अनाउन्स – फिचरद्वारे इनकमिंग कॉल्स आल्यावर Truecaller तुम्हाला कळवेल. तुम्ही स्क्रीन न पाहता कोण कॉल करत आहे हे जाणून घेऊ शकता. हे फीचर नॉर्मल व्हॉईस कॉल्स किंवा ट्रूकॉलर एचडी व्हॉइस कॉल या दोन्हींवर काम करेल. हे वैशिष्ट्य वायरलेस हेडफोनला देखील सपोर्ट करेल.