Increase Life Of Old Apple Iphone : अ‍ॅपलने या वर्षी आयफोन १४ सिरीज लाँच केली आहे. पुढील वर्षी अ‍ॅपल आयफोन १५ लाँच करण्याची शक्यता आहे. अ‍ॅपल दर वर्षी नवीन ओएस देखील उपलब्ध करतो. नवीन ओएसमुळे फोनला नवीन फीचर्स मिळतात आणि फोनच्या यूआयमध्ये देखील बदल दिसून येते. सुरक्षा फीचर्स मिळाल्याने फोन सुरक्षित राहतो. नवीन फोन घेणाऱ्यांना तीन वर्षांपर्यंत नवीन फीचर्स आणि अपडेट मिळतात. जुना फोन असल्यास त्यामध्ये नवीन फीचर्स टाकून त्यास अपडेट करू शकता आणि काही उपाय करून तुम्ही त्याची लाइफ वाढवू शकता. यासाठी पुढील ट्रिक्स फॉलो करा.

१) सॉफ्टवेअर अपडेट

tax harvesting in marathi
Money Mantra: टॅक्स हार्वेस्टिंग म्हणजे काय? त्याचा वापर कसा कराल? केव्हा टाळाल?
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
Vote From Home Eligibility and Procedure for Lok Sabha Election 2024 in Marathi
Vote From Home: घरबसल्या मतदान करण्यासाठी कोण पात्र? त्यासाठीचा फॉर्म 12D नेमका कसा भरायचा? जाणून घ्या
Bhastrika Pranayama
Bhastrika Pranayama VIDEO : स्वत:ला उत्साही ठेवण्यासाठी चहा किंवा कॉफी घेताय? त्यापेक्षा नियमित करा भस्त्रिका प्राणायाम

अ‍ॅपलच्या सॉफ्टवेअर अपडेटमध्ये नवीन फीचर्सही मिळतात. आयफोनला कमीत कमी ४ आओएस अपडेट मिळतात जे त्यास सुरक्षित आणि अद्ययावत ठेवण्यात मदत करतात. अपडेटमुळे फोनमध्ये सुरक्षेसंबंधी सुधारणा आणि बग देखील दुरुस्त करता येतात. म्हणून आयफोनमध्ये नवीन अपडेट इन्स्टॉल केला पाहिजे. यासाठी सर्वात आधी आयफोनच्या सेटिंग्समध्ये जा, नंतर जनरल पर्यायावर टॅप करा आणि नंतर सॉफ्टवेअर अपडेटमध्ये जा आणि नवीन आयओएस व्हर्जन डाऊनलोड करा.

(७७९०० रुपयांमध्ये घरी आणा Apple MacBook Air लॅपटॉप, १६ जीबी रॅमसह अनेक फीचर्स, कुठे मिळतोय? जाणून घ्या)

२) बॅटरी बदलू शकता

तुमच्या जुन्या आयफोनची बॅटरी दीर्घकाळ चालत नसल्यास त्यास बदलणे हा चांगला पर्याय ठरू शकतो. बॅटरी फोन कंपनीच्या अधिकृत सेंटरवरूनच बदली करा. आयफोनची बॅटरी हेल्थ जाणून घेण्यासाठी सेटिग्समध्ये जा, नंतर बॅटरीवर टॅप करा, त्यानंतर बॅटरी हेल्थमध्ये जा. येथे तुम्ही बॅटरीच्या स्थितीबाबत माहिती मिळवू शकता. बॅटरीची क्षमता ८० टक्क्यांपेक्षा कमी असल्यास आयफोन बदलण्याचा सल्ला दिला जातो.

३) फोन रिसेट करा

जुना फोन वर्षातून एकदा रिसेट केला पाहिजे. फोन रिसेट केल्याने त्यातील कॅशे, टेम्प फाइल डिलीट होतात. याने आयफोन फास्ट चालतो आणि हँग होत नाही.