scorecardresearch

Flipkart sale : 5 हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतोय ‘हा’ एलईडी टीव्ही, इतर टीव्हींवरही ६५ टक्क्यांपर्यंत सूट, जाणून घ्या ऑफर

फ्लिपकार्ट सेलमध्ये एक टीव्ही चक्क ४ हजार ५९९ रुपयांना मिळत आहे. चला तर या टीव्हीबद्दल जाणून घेऊया. तसेच १० हजारांपेक्षा कमी किंमतीत कोणते एलईडी टीव्ही मिळत आहेत याबद्दल देखील जाणून घेऊया.

Flipkart sale : 5 हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतोय ‘हा’ एलईडी टीव्ही, इतर टीव्हींवरही ६५ टक्क्यांपर्यंत सूट, जाणून घ्या ऑफर
टीव्ही

काल फ्लिपकार्ट बिग बिलियन डे सेल सुरू झाला. या सेलमध्ये प्रिमियम फोन्स, टीव्ही आणि इतर उपकरणे हे कमी किंमती मिळणार असल्याने अनेक दिवसांपासून नागरिक उत्सुक्तेने या सेलची वाट पाहात होते. आता ही वाट थांबली आहे. सेल सुरू झाला आहे. महत्वाचे म्हणजे, या सेलमध्ये एक एलईडी टीव्ही चक्क ४ हजार ९९९ रुपयांना मिळत आहे.

सेलमध्ये सर्वात स्वस्त टीव्ही हा ४ हजार ९९९ रुपयांना मिळत आहे. विशेष म्हणजे, डिस्काउंट व्यतिरिक्त हा टीव्ही तुम्ही आकर्षक बँक ऑफर्स आणि एक्सचेंज ऑफरमध्ये देखील खरेदी करू शकता. याने तुमची अधिक बचत होईल. चला तर या टीव्हीबद्दल जाणून घेऊया. तसेच १० हजारांपेक्षा कमी किंमतीत कोणते एलईडी टीव्ही मिळत आहेत याबद्दल देखील जाणून घेऊया.

१) मार्क क्यू एलईडी टीव्ही

MarQ Led tv (24HDNDQPPAB) हा फ्लिपकार्ट सेलमध्ये ४ हजार ९९९ रुपायांना मिळत आहे. या टीव्हीची मूळ किंमत १४ हजार ९९९ रुपये इतकी आहे. तसेच, अ‍ॅक्सिस बँकेच्या कार्डने पेमेंट केल्यावर तुम्हाला ५ टक्के कॅशबॅक देखील मिळेल. तसेच टीव्हीवर एक्सचेंज ऑफर देखील आहे. यात जुन्या टीव्हीच्या बदल्यात तुम्हाला किंमत ४ हजार ४५० रुयांपर्यंत कमी होऊ शकते. हा टीव्ही २४ इंचचा असून त्याचे पिक्सेल रेझोल्युशन १३६६x७६८ इतके आहे. टीव्हीमध्ये दमदार आवाजासाठी २४ वॉटचा साउंड आउटपूट देण्यात आला आहे.

२) इन्फिनिक्स एचडी रेडी एलइडी स्मार्ट टीव्ही

Infinix (32 inch) HD LED Smart TV (32Y1) या टीव्हीची मूळ किंमत १६ हजार ९९९ रुपये इतकी आहे. सेलमध्ये सूट नंतर हा टीव्ही तुम्ही ७ हजार ९९९ रुपयांमध्ये घेऊ शकता. तसेच, आयसीआयसीआय बँक कार्डलेस इएमआय पर्यायासोबत घेतल्यास तुमची १ हजार ७५० रुपयांची बचत होऊ शकते. अ‍ॅक्सिस बँकेच्या कार्डने पेमेंट केल्यास तुम्हाला १० टक्के अधिक सूट मिळू शकते. तसेच हा टीव्ही ६ हजार रुपयांच्या एक्सचेंड बोनससह येतो. टीव्ही कंपनी एचडी रेडी डिस्प्ले आणि २० वॉट स्पीकरसह ग्राहकांसाठी उपलब्ध आहे.

३) कोडॅक एचडी एलईडी टीव्ही

KODAK (24 inch) HD Ready LED TV (24HDX100S) हा टीव्ही फ्लिपकार्टवर केवळ ५ हजार ९९९ रुपयांना मिळत आहे. टीव्हीची मूळ किंमत १० हजार ४९९ रुपये आहे. अ‍ॅक्सिस कार्ड क्रेडिट कार्डच्या माध्यमातून हा टीव्ही घेतल्यास त्यावर १० टक्के सूट मिळते. त्याचबरोबर क्रेडिट कार्ड ईएमआय पर्यायासोबत घेतल्यास १ हजार ७५० रुपयांची बचत होऊ शकते. तसेच आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट कार्डवर १० टक्क्यांची सूट मिळू शकते. एक्सचेंज ऑफरमध्ये ही टीव्ही ५ हजार १७५ रुपयांपर्यत मिळू शकते. हा टीव्ही २४ इंचचा असून त्याचे पिक्सेल रेझोल्युशन १३६६x७६८ इतके आहे. टीव्हीमध्ये दमदार आवाजासाठी २४ वॉटचा साउंड आउटपूट देण्यात आला आहे.

४) रियल मी निओ टीव्ही

Realme NEO 32 inch HD led tv (RMV2101) २१ हजार ९९९ रुपयांचा हा टीव्ही केवळ ८ हजार ९९९ रुपयांमध्ये मिळत आहे. अ‍ॅक्सिसी बँकेचे डेबिड कार्ट वापरल्यास तुम्हाला किंमतीवर १० टक्क्यांची अतिरिक्त सूट मिळू शकते, तसेच क्रेडिट कार्ड ईएमआय ट्रान्झॅक्शनने देखील १ हजार ७५० रुपयांची बचत होऊ शकते. आयसीआयसीआय बँकेचे क्रेडिट कार्ड वापरल्यासही टीव्हीच्या किंमतीत १० टक्क्यांची सूट मिळू शकते. टीव्ही लिनक्स ऑपरेटिंग सिस्टिमवर चालतो. टीव्हीला युट्यूब सपोर्ट आहे. २० वॉटचा साउंड आउटपूट देण्यात आला आहे. हा टीव्ही २४ इंचचा असून त्याचे पिक्सेल रेझोल्युशन १३६६x७६८ इतके आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या